विठ्ठल कोण होता?


अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. संतांनी तो विष्णुकृष्णरूप मानलेला आहे. पण गंमत म्हणजे श्रुती-स्मृती-पुराणांनी कोठेही विठ्ठलाचा निर्देश केलेला नाही की विष्णुच्या अवतारगणनेत आणि नामगणनेत त्याचा समावेश नाही. मग इसवीसनाच्या अकराव्या-बाराव्या शतकापासून वैष्णवप्रतिष्ठा प्राप्त झालेला हा विठ्ठल आला कोठून?

विठ्ठल आणि पंढरपूर याविषयीचे पौराणिक प्रकृतीचे तीन संस्कृत ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत. त्यातील सर्वात आधीचा ग्रंथ आहे स्कंदपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. दुसरा आहे पद्मपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य' आणि तिसरा आहे विष्णुपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. स्कांद पांडुरंगमाहात्म्य निवृत्ती-ज्ञानदेव आदी संतांच्या उदयापूर्वी, हेमाद्री पंडिताच्या काळापूर्वी रचले गेलेले आहे. त्या ग्रंथामुळे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसांभार दृढ पायावर स्थिर झालेला आहे.

विठ्ठल या नावाची समाधानकारक व्युत्पत्ती अद्याप सांगता आलेली नाही. त्याचे पांडुरंग हे नाव मात्र पंढरपूरपासून तयार झालेले आहे. पंढरपूरचे मूळ कन्नड नाव आहे पंडरगे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर होयसळ नृपती सोमेश्वराचा लेख (शके 1159) आहे. त्यात या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या पंडरगेपासूनच पांडुरंग हे देवनाम आणि पांडुरंग-पंढरपूर-पंढरी हे क्षेत्रनाम आणि पुंडरीक हे भक्तनाम कृत्रिम संस्कृतीकरणातून साधले गेले आहे. पुन्हा विठ्ठल या नावाची स्पष्टिकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहिल्याची कथा ठोकून देण्यात आलेली आहे.

विठ्ठलाचे पांडुरंग हे संतप्रिय नाव आहे; पण या नावामुळे एक विसंवाद निर्माण झालेला आहे. कारण पांडुरंग हे नाव दृश्‍यतः शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूरगौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक आहे. असे हे नाव सावळ्या विठ्ठलाला देण्यात आले आहे, ही मोठीच गंमत आहे.

संतांनी विठ्ठलाला "कानडा विठ्ठलु कर्नाटकू' असे म्हटलेले आहे. म्हणजे महाराष्ट्राचे हे दैवत कानडी आहे. भौगोलिकदृष्ट्याही यात तथ्य असल्याचे दिसून येते. कारण पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरच आहे. पंढरपूर जवळचे मंगळवेढे तर बसवेश्‍वराचे आद्य कार्यक्षेत्र होते. वर सांगितल्याप्रमाणे पंढरपूरचे पुरातन पंडरगे हे नाव पूर्णपणे कन्नड आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीय आहेत आणि त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातलेच आहेत. या व अशा अन्य काही लहान-सहान बाबींवरून विठ्ठलाचे कानडेपण निःसंदिग्धपणे स्पष्ट होते.

पंढरपूरच्या या कानडी विठ्ठलाचा आद्य भक्त आहे पुंडलिक. जर विठ्ठलाचे मूळ रूप काही वेगळेच होते; तर मग हा पुंडलिक आला कोठून? तर पुंडलिक म्हणजे पुंडरिक. पंडरगे या क्षेत्रनामाच्या कृत्रिम संस्कृतीकरणातून पुंडरिक हे नाव सिद्ध झाले आहे. पंढरपूर हे पुंडरिकपूरही आहे. पुंडरिक हा मूळचा पुंडरिकेश्‍वर आहे आणि पंडरगे या गावाचा तोच मूळचा अधिष्ठाता देव आहे. पंढरपुरात विठ्ठलाची विष्णु-कृष्ण म्हणून नव्याने प्रतिष्ठा वाढविण्याऱ्या वैष्णवांनी, वैष्णव क्षेत्रोपाध्यांनी पंढरपुरातील मूळच्या लोकप्रिय दैवताचे वैष्णवीकरण करून त्यांना विठ्ठल परिवारात समाविष्ट केले. त्यातीलच पुंडरिकेश्‍वर हा देव. त्याला त्यांनी भक्तराज पुंडरिकाचे नवे वैष्णवचरित्र देऊन विष्णुदास बनविले. आज सांगितली जाणारी पुंडलिक कथा ज्ञानेश्‍वरांच्या काळापासून जनमानसाने स्वीकारलेली आहे; पण त्यात काडीमात्र ऐतिहासिकता नाही. ती विठ्ठलाची शुद्ध पौराणिक अवतरण कथा आहे.

तर विठ्ठल हा मूळचा लोकदेव आहे. तो गोपजनांचा, गवळी-धनगरांचा देव आहे. विठ्ठल हे दैवत गोपजनांच्या, गवळी-धनगरांच्या परंपरेत आजही आले आदिम रूप सांभाळून आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने संबोधतात. त्यांच्या मंदिरात दोन पिंडी ठेऊन ते या जोडदेवाची पूजा-अर्चा करतात. बीरप्पा किंवा बिरोबा हा धनगरांचा मुख्य देव आहे. बहुसंख्य कथांमध्ये विठ्ठल हा बीरप्पाचा निकटतम सहयोगी देव किंवा भाऊ म्हणून येतो. विठ्ठल आणि तिरूमलैचा वेंकटेश या दोघांच्याही उन्नत रूपाचं आदिबीज गोपजनांच्या, गवळी-धनगर-कुरूबांच्या विठ्ठल-बीरप्पा नामक जोडदेवात आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट. बिरोबा अथवा बीरप्पाचे अनेक ठिकाणी वीरभद्रात रूपांतर झालेले आहे. वीरभद्र हा शैव आहे; तर विठ्ठल विष्णु. नरहरी सोनाराच्या कथेत त्याला विठ्ठल मंदिरात शिवलिंगाचे दर्शन होते असे दाखविण्यात आले आहे. त्या कथेचा सांधा येथे नीट जुळतो.


विठ्ठल आणि वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णुच्या पुरामप्रसिद्ध रूपांशी, अवतारांशी संबंध नसलेले आहेत आणि तरीही ते विष्उरूप पावलेले आहेत. एवढेच नव्हे; तर संपूर्ण दक्षिण भारतात पुरातन विष्णुरूपांहून अधिक लोकप्रियता लाबलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण नावाने ओळखला जातो; तर वेंकटेशाला बालाजी म्हणतात. विठ्ठल-बिरोबा आणि विठ्ठल-वेंकटेश यांच्यातील साम्यही पाहण्यासारखे आहे. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सागून दिंडिरवनात रूसून बसलेली आहे; तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सहन केल्यामुळे तिरूमलैपा,ून पूर्वेस तीन मैलावर वेगळी राहिलेली आहे. वेंकटेशाच्या पत्नाचे नाव पद्मावती; तर विठ्ठलाच्या प्रेयसीचे पद्मा. विठ्ठल-बीरप्पाच्या पत्नीचे नाव पदूबाई आहे आणि तीही पतीवर रूसलेली आहे. किंबहुना तीच पंढरपुरात रुक्‍मिणी होऊन प्रकटली आहे, अशी धनगरांची धारणा आहे.

विठ्ठलाला प्रिय असलेला गोपाळकाला; तसेच विठ्ठलभक्त संतांनी रचलेली भारूडे यांचा संबंधही गोपजन-धनगर संस्कृतीशी येतो. काही अभ्यासकांनी गोपाळकाल्याचा संबंध वैदिक "करंभा'शी जोडलेला आहे. करंभ हे खाद्य गोपाळकाल्याचेच पूर्वरूप असावे, कारण "करंभः दधिसक्तवः' असे त्याचे स्पष्टिकरम वेदज्ञांनी दिलेले आहे. हा पदार्थ सातूचे पीठ आणि दही एकत्र कालवून बनवितात. वैदिक पूषन्‌ देवाला तो खास आवडतो. हा देव वृषभमुखाची काठी हाती धारण करणारा, कांबळे पांघरणारा, गायागुरांची खिल्लारे राखणारा आणि गोपजनांना वाटा दाखविणारा आहे. तो गोपजनांचा देव आहे. तो अहिंसकही आहे. त्याला दही आणि पीठ आवडते. तर पंढरपूरचा विठ्ठल ताक आणि पीठाने संतुष्ट होतो. त्याच्या या प्रेमाची स्मृती "ताकपिठ्या विठोबा'च्या रूपाने पाहावयास मिळते.
दुसरी गोष्ट भारूडाची. या शब्दाचा मूळ अर्थ धनगर असा आहे. गुजरातमध्ये आजही भरवाड या नावाची पशुपालक जमात आहे. तिचे नाव भारूड या धनगरवाचक नावाशी जवळचे आहे.

पुन्हा पंढरपूर हे स्थानही प्राचीन काळी धनगरांचा जो स्थलांतराचा मार्ग होता, त्या मार्गावरच येते, हे प्रा. कोसंबी यांनी दाखवून दिले आहे. पंढरपूर हे या फिरत्या जमातीचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे. तिचा वैष्णव विठ्ठलाशी मूळात संबंध नाही.

(संदर्भ ः
विठ्ठल ः एक महासमन्वय - रा. चिं. ढेरे, श्रीविद्या, प्रथमावृत्ती 1984
An Introduction to the study of Indian History - Prof. D. D. Kosambi)

30 comments:

Anonymous said...

Dear Visoba,
Please use your precious time in some work which will be helpful to our society rather than wasting it like this !!!
Thank You.

Anonymous said...

विठलाला कर्नाटकी म्हंटले जाते कारण ज्या दगडा पासून विठलाची मूर्ती तयार करण्यात आली तो दगड कर्नाटकातून आणला होता .

विशाल विजय कुलकर्णी said...

अप्रतिम लेख ! हा लेख फ़ेसबुकवर शेअर केला तर चालेल का?

RK said...

छान आहे., पण भगवान गौतम बुद्धांचा इतिहास कोणी सांगेल का?

Anonymous said...

गो -पालन करणे - मुख्यत्वे हे काम ब्राह्मणांचे होते ब्राह्मण समाज गायींचे पालन करीत असे हा इतिहास का बदलला जातो ???

Kumar Rao said...

हा लेख पूर्णपणे बावळटपानाचे लक्षण आहे.आणि कमीतकमी वाचणाऱ्याच्या वेळेचा अपव्यय आहे.सदर लेखकाला स्वताची बुद्धी नाही..केवळ Copy -paste आहे.विठ्ठलाचे रूप हे भगवान बुद्धाचे वैष्णवीकरण आहे.तो एक बौध माठ होता..प्रत्यक्ष मूर्तीसुद्धा जुन्या शैलीतली मूर्ती आहे..वाचकांनी स्वतः संशोधन करावे..बावळट ब्लॉग्स वर विश्वास ठेवू नये..भारताचा खरा धार्मिक इतिहास जाणायला इतका सोपा नाही..

Kumar Rao said...

हा लेख पूर्णपणे बावळटपणाचे लक्षण आहे.आणि कमीतकमी वाचणाऱ्याच्या वेळेचा अपव्यय आहे.सदर लेखकाला स्वतःची बुद्धी नाही..केवळ Copy -paste आहे.विठ्ठलाचे रूप हे भगवान बुद्धाचे वैष्णवीकरण आहे.तो एक बौध मठ होता..प्रत्यक्ष मूर्तीसुद्धा जुन्या शैलीतली बुद्धाची मूर्ती आहे..वाचकांनी स्वतः संशोधन करावे..बावळट ब्लॉग्स वर विश्वास ठेवू नये..भारताचा खरा धार्मिक इतिहास जाणायला इतका सोपा नाही..

Anonymous said...

डोळ्यांवर एखाद्या विचाराची पट्टी बांधली की काय होते याचा ही कोणा कुमार राव याची प्रतिक्रिया म्हणजे खासा नमुना.
या नमुन्याच्या हेही लक्षात आले नाही की विठ्ठल एक महासमन्वय या अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन ग्रंथाचा संदर्भ या लेखाला आहे. परंतु एकदा आंधळेपण स्वीकारला की मग या लोकांना विठ्ठलाच्या मूर्तीतही बौद्धाची मूर्ती दिसणार आणि धार्मिक इतिहास जाणायला इतका सोपा नाही असा वैचारिक माज अंगी येणार.

Anonymous said...

Please use your precious time in some work which will be helpful to our society rather than wasting it like this !!!

बाळ अमेय, हेही काम समाजोपयोगी आहे. कारण या समाजात आपल्यासारखे अनेक रेम्याडोक्याचे प्राणी आहेत. त्यांच्यामुळे खरा इतिहास राहतो बाजूला आणि खोट्यावरून भांडणे होतात. हा ब्लॉग आपणास माहित असलेल्या इतिहासाची आणि मिथकांची दुसरी बाजू ससंदर्भ सांगतोय बाळा.

Satish said...


आणखी एक दृष्टीकोण
महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल म्हणजे कोण?
http://sanjaysonawani.blogspot.in/2011/07/blog-post_04.html

smshinde said...

He is not Shepard god.

smshinde said...

He is not Shepard god.

Unknown said...

मी धनगर आहे. माझे कुलदैवत आरेवाडी चा बिरोबा आहे. या बिरोबा मंदिरात तीन देव आहेत. एक बिरोबा, दुसरा विठोबा,तिसरा बिरोबा शिष्य महालिंगराया.यांच्या कथा हजारो वर्षे धनगर धनगरी ओवीच्या रुपाने ढोल बडवून गात आला आहे. एकदा धनगरी ओवी ऐका.बर्षानुवर्षै पिढ्यान पिढ्या कथा धनगर सांगतो ती खोटी असेल का. ??? जर कथा खोटी असेल तर त्याचं कारण सांगितले पाहिजे.

Unknown said...

मी धनगर धुळा थोरबोले

Unknown said...

मी धनगर आहे. माझे कुलदैवत आरेवाडी चा बिरोबा आहे. या बिरोबा मंदिरात तीन देव आहेत. एक बिरोबा, दुसरा विठोबा,तिसरा बिरोबा शिष्य महालिंगराया.यांच्या कथा हजारो वर्षे धनगर धनगरी ओवीच्या रुपाने ढोल बडवून गात आला आहे. एकदा धनगरी ओवी ऐका.बर्षानुवर्षै पिढ्यान पिढ्या कथा धनगर सांगतो ती खोटी असेल का. ??? जर कथा खोटी असेल तर त्याचं कारण सांगितले पाहिजे.

Watchdog said...

जून्या काळी पूजा अर्चा,शिवाशिव,देवधर्मावर ऐका विशिष्ट समहाचा हक्क ईत्यादीने समाज पिसला होता ,सोपे काम हेतू पूर्ण कठीण करून सामान्यसामान्याना त्या पासून दूर ठेवले होते व या विरोधात बोलणारे संत तुकाराम,जनाबाई ई.ना त्रास देण्यात आला.तेव्संा बहजन संतानी दरवर्षी ऐकत्र येण्यासाठी वारी सुरू केली.हे सर्व संत देशभर फिरणाऱ्या धनगरांचा निरोप देण्यासाठी वापर करत आणि धनगर पावसाळ्यात वाखारीच्या माळरानावर ऐकत्र येत तेथे हितगूज साधत.मुळात वारी हे बहूजनांचे get-together च होते.R.C.Dhere चा या विषयावर दांंडगा अभ्यास आपण तारे तोडन्यात,विरोधाला विरोध करण्यात मजा नाही,ईतिहास सोयी प्रमाणे लिहिल्या गेला,बदलल्या गेला हे जगजाहीर आहेच.आज आपण जाती धर्मा पलीकडे गेलो आहोत.

Unknown said...

मला फक्त एवढे सांगा विठ्ठलाचं जन्म कधी झाला. त्यांच्या कुटुंबविषयी माहिती सांगा. संदर्भ देणे आवश्यक. धन्यवाद नवे बाळ

Unknown said...

कोल्हापूर जिल्हात हातकणंगले तालुक्यात पट्टणकोडोली नावाचे धनगर लोकसंख्या जास्त असलेले गाव आहे. तिथं पुरातन विठ्ठल बिरदेव या देवतेचे मंदिर आहे.

Unknown said...

भगवान गौत्तम बुद्धांचा जन्म इसवी सन पाचशे शतकातील आणि तुमच्या माहीतीनुसार अकराव्या बाराव्या शतकामधे श्रीहरी विठ्ठल किंवा विठ्ठल भक्त उदयास आले. याचा अर्थ असा घायचा का की इसवी सन पाचशे ते अकराशे - बाराशे म्हणजे सहाशे ते सातशे वर्षे वैष्णव श्री हरी विठ्ठलाला कस प्रेझेंट करायच याचा आभ्यास करत होते.

Unknown said...

संजय ससाणे जी,
बौद्ध हे पाचशे शतकातील नसून ते ई. स . पू . ५६३ ते ४८३ असे होऊन गेलेले.

Unknown said...

सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे गावी धनगरांचा देव आहे विठोबा, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथील धनगर चा देव विठ्ठल बिरदेव

Unknown said...

खरी जन्मतारीख सांगा

Unknown said...

फुकट चि चर्चा आहे

Unknown said...

Engage your self in devotion of Lord Vitthal.

Unknown said...

वरील संवाद होणे सहाजिकच हितवह्या आहे......कोणाचेच संवाद चुकीचे नाही......तरी पण तुम्हाला सर्वांनाच एक प्रश्न विचारतो....... जीव उत्पत्तीचा जनक कोण आहे....? याचे योग्य उत्तर जर तुमचा कडून मिळाले तर नक्कीच तुमच्या शंकाचे समाधान करण्याचा प्रयत्न करीन....🙏

The 7 MECHANIC said...

भाऊ देव आणि इतिहास ह्याचापुढे विचार केला तर वारकरी संप्रदाय आणि विठल या दोघांनी महाराष्ट्राला खूप महात्मे दिले आहेत ह्याला तुम्ही नाकारू शकत नाही.संत नामदेव,संत तुकाराम,संत एकनाथ,संत ज्ञानेश्वर आणि संत गाडगेबाबा ह्या लोकांनी खरं समनातेच बिज आपल्या समाजात पेरल हे अधिक महत्त्वाचं आहे.आणि आपण ज्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे ती त्या व्यक्ती ची तशी समज किवा योगायोग असावा नाहीतर अशीही आपल्याला ही सवय लागलीच आहे की हिंदू धर्मात असून सुधा आपले देव वाटून घ्यायचे.आणि सामाजिक असमांतेची सुरुवात करायची देव सगळ्यांचा असतो तो कुणाला पांडुरंग दिसतो कुणाला पांडुरंग.आणि जर इतकाच इतिहास उकरून काढायची सवय असेल तर पूर्ण ग्रंथ वाचावेत त्यामध्ये तेनालिरम आणि शंकराचार्य महाराजांचे सुधा लेख वा पुस्तके आहेत.

Unknown said...

Sir,but Marathi serial vithu mauli var dusrich Katha dakhvli ahe

KKK Inform Data Services said...

https://youtu.be/KxAEqB9oyp8

Rajratna said...

छान माहिती

MURLIDHAR GOPAL DAS said...

द्वारिकेची अवगी घेऊनी संपत्ती विठुराया आले पंढरीसी। मूर्ती जे घडविले म्हणी त्याच्या मुखात, प्रति किडे पडो।
संत तुकाराम