वाघ्याच्या स‌माधीची गोष्ट


छत्रपती शिवाजी महाराजांचा कृष्णा घोडी आणि वाघ्या कुत्र्यावर फार जीव होता. ही दोन्ही जीवाला जीव देणारी इमानी जनावरं. त्यातही वाघ्याच्या स्वामीनिष्ठेची कथा काय वर्णावी! महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर दुःखाने वेड्यापिश्‍या झालेल्या वाघ्याने राजांच्या चितेवर झेप घेतली आणि आपलं जीवन संपवलं. मराठ्यांच्या इतिहासात या मुक्‍या जनावराची स्वामिनिष्ठा सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. आजही धन्यावरील इमानाचा, श्रद्धेचा दाखला देताना वाघ्या कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं. धन्य तो वाघ्या! (यासंदर्भातील एक बातमी आहे. जरूर पाहा - http://dogsinthenews.com/issues/0207/articles/020705b.htm)

पण ही वाघ्याची कथा खरोखरच खरी आहे? खरेच असा कुत्रा महाराजांकडे होता? त्याने खरेच महाराजांच्या चितेवर झेप घेऊन प्राणार्पण केलं? आणि हे जर खरं नसेल, तर मग रायगडावर दाखविली जाते ती समाधी कोणत्या कुत्र्याची आहे? या सवालांचे जवाब मोठे विस्मयकारक आहेत. वाघ्या, त्याचं प्राणार्पण आणि त्याचं स्मारक ही सगळीच एक मिथ आहे. महाराजांच्या अंतकाळच्या वर्णनात ही गोष्ट नाही. या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. शिवकालीन, शिवपूर्व वा शिवोत्तरकालीन कागदपत्रांत कधीही, कुठेही, कोणत्याही कुत्र्याने आपल्या धन्याच्या मृतदेहाबरोबर स्वतःला जाळून घेतल्याचा उल्लेख नाही.

ही कथा आली कोठून? तर कविवर्य राम गणेश गडकरी यांच्या कविकल्पनेतून ही अचाट कहाणी निर्माण झाली. तीही केव्हा, तर राजांच्या निर्वाणानंतर दोन-अडीचशे वर्षांनी. गंमत म्हणजे कुत्र्याच्या समाधीवर जो मजकूर आहे, त्यातच ही कथा गडकऱ्यांच्या "राजसंन्यास' या नाटकावरून घेतली असल्याचा उल्लेख "संदर्भ' म्हणून केलेला आहे.

आता असं जर असेल, तर मग कुत्र्याचे स्मारक तिथं आलं कुठून? याचीही एक (सत्य)कथा आहे. 1918 मध्ये इंग्रजांनी रायगड जिंकला. त्यावेळी त्यांच्या तोफांच्या भडिमाराने गडावरील सर्व इमारती जमीनदोस्त झाल्या. गडाची वाताहत झाली. त्याच वर्षी पेशवाई बुडाली आणि मराठी साम्राज्याचा हा मणिहार, रायगड विस्मृतीच्या काळोखात बुडाला तो पुढील तब्बल 67 वर्षे. 1885 साली इंग्रज गव्हर्नरने रायगडाला प्रथम भेट दिली. त्यावेळी राजांच्या समाधीची दुरवस्था पाहून तो इंग्रज अधिकारी कळवळला. म्हणाला, ""अरे, तुमचा राजा केवढा थोर होता. आणि त्याच्या समाधीची ही अवस्था?'' त्याने समाधीच्या तेलवातीसाठी पाच रुपये काढून दिले. त्यानंतर दरवर्षीच पाच रुपये अनुदान त्याकामी मंजूर करण्यात आलं.

ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या कानावर गेली. त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं. त्यासंदर्भात 1896 मध्ये एक सर्वपक्षीय सभा घेतली. पण पुढं ते काम थंडावलं. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा स्मारक समितीने उचल खाल्ली. स्मारकासाठी निधी जमवायला काही मंडळी इंदूरला होळकरांकडे गेली. पण शिवस्मारकाच्या कामासाठी पैसे देणं हे इंग्रज स्वामींना आवडणार नाही या भयाने हे संस्थानिक स्मारक समितीच्या सभासदांची भेट घेण्याचं टाळू लागले. भेट टाळायची, तर त्यासाठी कारण काय; तर "महाराज सुतकात आहेत'. सुतक कसलं, तर महाराणीसाहेबांचे लाडके कुत्रे साहेब मेले होते त्याचे! समितीच्या सभासदांना तोवर महाराजांची नेमकी काय अडचण आहे हे बरोबर लक्षात आलं होतं. तेव्हा त्यांनी त्यावर एक अफलातून तोडगा सुचविला, की महाराजांनी त्यांच्या लाडक्‍या कुत्र्याच्या स्मारकानिमित्त देणगी द्यावी आणि त्या देणगीचा काही अंश खर्चून समितीने त्या कुत्र्याचा पुतळा उभारावा.

त्यानुसार त्या पैशातील काही भाग खर्चून रायगडावर कुत्र्याचा पुतळा उभारण्यात आला. महाराजांची समाधी म्हणून 1926पूर्वी जो अष्टकोनी चबुतरा दाखविला जातो, ज्यावर नंतर मेघडंबरी बांधली, त्या चबुतऱ्याजवळ जो चौकोनी चौथरा दुर्लक्षिलेल्या अवस्थेत पडलेला होता, त्याची पुनर्रचना करून त्यावर हा होळकरांच्या कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला.

संदर्भ -
- "इतिहास - सत्य आणि आभास' - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 98
- "शिवरायांची समाधी आहे कोठे?' - रविवार सकाळ, 28 मे 1995

7 comments:

Anonymous said...

waah kya baat hai ..
hyaala mhanatata itihaas majeshir ahe

Nitien said...

this is not logical

santya said...

मला एकाच गोष्टीचे नवल वाटते जातीपातीच्या संदर्भात या महान आत्म्याला गोवून संभाजी ब्रिगेड काय साध्य करतेय ? शिवाजी महाराज काय एकाच जातीचे नेते होते ? त्यांच्या तरुणांसमोर असलेल्या आदर्शाला या तर्हेने धक्का लावणे म्हणजे शिवद्रोहच होय .

Anonymous said...

>>>> हा तर "मराठा व धनगर" समाजात वाद निर्माण करण्याचा घाट..!! <<<<<
वाघ्या कुत्रा या सर्व प्रकारात एक मजेशीर गोष्ट आहे... संभाजी बिर्गेड म्हणते राम गणेश गडकरी यांच्या कल्पनेतून ही अचाट कहाणी निर्माण झाली. तर काही जणांचे म्हणणे आहे कि.. वाघ्या शिवाजी महाराजांचा इमानदार कुत्रा होता.. महाराजांचं निधन झाल्यानंतर दुःखाने वेड्यापिश्‍या झालेल्या वाघ्याने राजांच्या चितेवर झेप घेतली आणि आपलं जीवन संपवलं......आणि कालांतराने होळकरांच्या देणगीतून त्याचे समारक बांधण्यात आले..
यात महत्वाचा मुद्दा हा कि "धनगर" समाजाचा या वादात जास्त संबध येत नाही .. कारण तो जर खरच महाराजांचा कुत्रा असेल तर "त्याची चिंता मराठ्यानाच असायली हवी" आणि हा कुत्रा गडकरी यांच्या कल्पनेतला असेल तर कुणीच वाद करायचे काम नाही...
माझ्या मते तरी हा समाजकंटाकांचा "मराठा व धनगर" यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयतन आहे..

शिवजागर said...

हा घ्या वाघ्याचा शिवकालीन पुरावा!

... इ.स.१६७८ साली शिवाजी महाराजांनी दक्षीण दिग्विजय केला, परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला होता. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवले होते. बेलव
डीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. तथापि त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढाई सुरुच ठेवली. तिने पुढे शिवरायांसोबत तह केला. शिवरायांनी तिचे राज्य तिला परत दिल
े आणि तिला सावित्रीबाई या किताबाने गौरवले. शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरुपी कोरून ठेवण्यासाठी सावित्रीबाईने अनेक गावांच्या दरवाज्यांत व मंदिरांसमोर शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षीनाभिमुख देवळाच्या पस्चिमेस असून त्याची उंची ३ फुट व रुंदी अडीच फुट आहे. शिल्पाचे दोन भाग असून खालच्या भागात शिवरायांनी मांडीवर बसवले आहे. शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार असलेली शिवरायांची प्रतिमा आहे. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. हे शिल्प शिवरायांच्याच हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.

२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.

याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या"राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.

Thanks to Sanjay Sonavani Sir

mavala movie trailor Balaji sirsat patil said...

चुकीचा इतिहास वाचून कोन्हाला दोष देन्या पेक्षा स्वत खरा इतिहास वाचा म्हणजे हरवलेली बुद्दी जागी येईल.
आणि एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा संभाजी ब्रिग्रेड आज ही 18 पगड़ जाती सोबत घेऊन चालते, आणि संभाजी ब्रिगेड त्यालाच दोष देते ज्या जातीने चुकीचे पाऊल उचलून खोटारडा इतिहास मांडला. बाकी जातींना का नाव बोट ठेवत नाही. उलट उपकार मानते त्या जातींचा त्याच जातींच्या मावळ्यांचा ज्यांनी है हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.

आता ठरवा तुम्हीच कोण आहे शिवभक्त आणि कोण आहे शिवद्रोही...?

जय शिवराय, जय शंभुराजे...

mavala movie trailor Balaji sirsat patil said...

मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्या चा उल्लेख का नाही आहे?