नेतोजी पालकर - धर्मांतर ते धर्मांतर

नेताजी पालकर म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांचं नाव मुळात नेतोजी. त्याचं नेताजी कसं झालं हे माहित नाही. पण त्यांच्या पत्रातून मात्र नेतोजी असंच नाव येत.

तर हे नेतोजी पालकर शिवाजी महाराजांचे सरनौबत. महाराजांनी त्यांना हाकलून दिल्यावर ते आधी आदिलशाहीला आणि नंतर मुगलांना सामिल झाले. महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबाने नेतोजी पालकरला कैद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नेतोजीला धारुर इथं दग्याने पकडण्यात आलं आणि आग्र्याला पाठविण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर करण्यात आलं. मुहम्मद कुलीखान असं नाव आणि तीन हजाराची मनसब त्यांना देण्यात आली. आणि मग त्यांना काबूल-कंदहारला पाठविण्यात आलं. तेथून पळून जाण्याचा त्यांनी दोनदा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळेस त्यांना पकडण्यात आलं. 1676मध्ये दिलेरखानाच्या सैन्याबरोबर ते दक्षिणेत आले. आणि संधी मिळाली तसे ते मुगलांकडून शिवाजी महाराजांकडे परतले. नंतर त्यांची शुद्धी करण्यात आली आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आलं. "जेधे शकावली'नुसार ""शके 1598 नळ संवत्सर, आषाढ वद्य चतुर्दशी (11 जून 1676) नेताजी पालकर याने प्रायश्‍चित्त घेतले आणि ते शुद्ध झाले.''

शिवाजीने नेतोजीची शुद्धी केली ही कथा जाणीवपूर्वक उच्चरवाने सांगितली जाते. पण शुद्धी महाराजांनीच केली याला कसलाही कागदोपत्री पुरावा नाही! की नेतोजी मुगलांकडून परतल्यानंतर महाराजांनी त्यांना आपल्या नोकरीत ठेवल्याबद्दल कोणतीही कागदपत्रं उपलब्ध नाहीत! "शिवचरित्र साहित्य' खंड 3 मधील काही पत्रांनुसार इ.स. 1690च्या सुमारास, म्हणजे संभाजीराजांच्या मृत्युनंतर स्वराज्य संकटात सापडले असताना नेतोजी परत मुगलांना सामील झाल्यासारखा दिसतो. शिवाजीराजांनी इंदापूरच्या मशिदींची वतनं बंद केली होती. ती त्यांनी परत सुरू केली. यावेळी ते मुगल मनसबदार झालेले असावेत.

राजवाडे खंडात एका पत्रात नेतोजीबद्दल आणखी माहिती मिळते. शंकराजी नारायण सचिव यांनी बाजी सर्जाराव जेध्याला लिहिलेल्या या पत्रात असं म्हटलं आहे, की ""औरंगजेब पातशहाने या देशीचे कित्येक मुसलमान करावे ऐसे केले आहे. त्याउपर नेतोजीराजे.... घाटगे, जानोजीराजे यासहित कित्येक ब्राह्मणांसही मुसलमान केले आहे.'' हे पत्र 1690 मधील आहे. यातील नेतोजीराजे म्हणजे नेतोजी पालकर आणि जानोजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे जावई जानोजीराजे पालकर!

म्हणजे काय तर खुद्द शिवाजी महाराजांचे व्याही आणि जावई हे दोघे धर्मांतर करून मुसलमान झाले होते!!

नेतोजी पुढे नांदेडजवळ वारले. त्यांच्या वारसांकडे अनेक मुगल फर्मानं मिळाली आहेत.

संदर्भ -
- इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998.
- छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी, एनबीटी, सहावी आवृत्ती 2004, पृ. 79.

नेतोजी पालकर यांच्या जन्मगावाविषयी - http://www.giridarshan.com/forts/Irshalgad/Irshalgad2.html

7 comments:

Anonymous said...

नेटवर थोडा तपास केला असता रियासतकार सरदेसाईंच्या एका लिखाणात छत्रपती संभाजीनी शहजादा अकबरास आश्रय देतेवेळी नेताजींच्या मुग़ल दरबारातील अनुभवामुळे त्यांची अकबरासोबत नेमणूक केल्याचा उल्लेख मिळाला.
"Netaji Palkar, the only elderly person who had knowledge of the imperial life and manners of the Court was posted to remain with Akbar"
New History of the Marathas - Page 306 by Govind Sakharam Sardesai - 1968
तसेच १६९० पर्यंत तरी नेताजी स्वराज्यातच राहीले असावेत. वा. सी. बेंद्रे यांच्या छत्रपती राजाराम महाराजांवरील चरित्र ग्रंथात पुढील टिप आढळली:
१४ नवम्बर १६८९ च्या फोर्ट सेंट जॉर्जच्या सभेच्या अहवालातील मजकूर:
"...We having certain advice that Ram Rajah, King of the Marathas is come privately from the kingdom of Punnarree (Panhala)...leaving his uncle (Netoji Palkar) in charge of the kingdom and family to manage the war against the Mogul."
पण इंग्रजांकडील माहीतीची खात्री देणे अवघड आहे.

जरी शिवाजी महाराजानीच शुद्धीकरण घडवल्याचा पुरावा नसला तरी नेताजींसारख्या लायक मनुष्यास त्यानी सेवेत ठेवलेच नसेल असे वाटत नाही. मात्र त्यांचा जुना दरारा मात्र उरला नसावा.

बजाजी नाइक-निंबाळकरांच्या धर्मांतर व शुद्धीकरणाबाबत काही पुरावा उपलब्ध आहे का?

प्रसाद मुळे said...

Mrunmay:
Vishwas Patil yaanchya "Sambhaji" ya pustakat ashach prakarchya mugal anubhavamule "Kondaji Farjand" yana akabarabarobar thevalyache sangitale aahe.
Awantar:
He kondaji frjand mhanaje Agryahun sutakechya veli shivaji maharajanche rup ghetalele imandar paaik, yaanich pudhe ashtpradhananbarobar milun sambhaji maharajanbarobar band pukarale hote.

Anonymous said...

श्री. आनंदयात्री,
>> Vishwas Patil yaanchya "Sambhaji" ya pustakat ashach prakarchya mugal anubhavamule "Kondaji Farjand" yana akabarabarobar thevalyache sangitale aahe.
शक्यता कमी वाटते, कारण कोंडाजी फर्ज़ंद यांची ईतिहासात नोंद झालेली ठळक कामगिरी म्हणजे ई.स. १६७३ ची यशस्वी पन्हाळा मोहीम. त्यांचा अन्यत्र नामोल्लेख कमी आहे. त्यांना मुग़ल दरबाराचा व अन्य रिवाजांचा अनुभव असण्याची शक्यता कमी वाटते.

अवांतर १: नेताजींचेच एक चुलते कोंडाजी पालकर यांनाही नेताजीं समवेत बंदिवान करून उत्तरेत पाठवून त्यांचेही धर्मांतर घडविल्याचा मात्र उल्लेख आढळतो.

अवांतर २:
>> He kondaji frjand mhanaje Agryahun sutakechya veli shivaji maharajanche rup ghetalele imandar paaik, yaanich pudhe ashtpradhananbarobar milun sambhaji maharajanbarobar band pukarale hote.
मला वाटते की आपण हिरोजी फर्ज़ंद यांच्या संदर्भात बोलता आहात.

प्रसाद मुळे said...

Mrunmay:
Aaple barobar, mala Hiroji Farjand asech mhanayache hote. Chuk bhul dyavi ghyavi.

Anonymous said...

You are sambhaji brigedian

मृण्मय said...

बजाजीराजे नाईक-निंबाळकरांच्या धर्मांतर व शुद्धीकरणाबाबत: http://goo.gl/BLlCu

Yes it's u....! said...

खूप छान माहिती