'गोब्राह्मण प्रतिपालक' हे कोठून आलं?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या बिरूदावल्या लावल्या जातात त्यात "गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस' ही खूपच प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराज हे गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारे होते असं हे बिरूद सांगतं.
शिवरायांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रं उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःस "गोब्राह्मण प्रतिपालक' म्हणवून घेतलेलं नाही. शिवरायांच्या समकालिनांनी त्यांना लिहिलेली पत्रं आहेत. त्या पत्रांपैकीसुद्धा एकाही पत्रात कुणी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाही. महाराजांची राज्याभिषेक शक असलेली 29 पत्रं उपलब्ध झाली आहेत. या सर्व पत्रांत महाराज स्वतःस "क्षत्रिय कुलवतंस श्रीराजा शिवछत्रपती' असं म्हणवून घेतात. ते स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत नाहीत. मग हे प्रकरण आलं कोठून?

स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत असं बाबासाहेब पुरंदरे लिहितात. त्यासाठी त्यांनी शिवचरित्र साधने खंड 5, क्र. 534 व 537 असा आधार दिला आहे. परंतु या सर्व पत्रांची आणि आधारांची छाननी करून शेजवलकरांनी निर्वाळा दिला आहे, की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी महाराज स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत नाहीत, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण महाराजांस तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गोब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही! म्हणजे हे सर्वच झूट आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यांना तसं म्हणणं यातलं अंतर स्पष्ट आहे.

सर्व मराठे ज्याप्रमाणे महाराजांच्या बाजूने नव्हते, त्याचप्रमाणे सर्व ब्राह्मणही त्यांच्या बाजूने नव्हते. अनेक जण विरूद्धही होते. म्हणूनही शिवाजी महाराज "ब्राह्मण प्रतिपालक' अशी पदवी घेणे शक्‍य नव्हते. आणखी एक गमतीची बाब म्हणजे मिर्झाराजे जयसिंह शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांना शिवाजीविरूद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील काही ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ केला होता! महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदाने महाराजांना राज्याभिषेक करण्यास विरोध केला होता, हे सत्य तर सर्वांनाच माहित आहे.

(शिवाजी कोण होता? - गोविंद पानसरे, प्रकाशक स्वतः लेखक, चौथी आवृत्ती, 1991, पृ. 34-35.)

34 comments:

स्वाती आंबोळे said...

तुम्ही मांडत असलेले मुद्दे आणि तदनुषंगिक पुरावे(?) interesting आहेत खरेच. ज्याला आपण 'इतिहास' म्हणतो ते बखरींचं collectionच असतं शेवटी. मुळात घडलं त्यातलं document किती केलं गेलं, ते कोणी आणि कोणत्या दृष्टीकोनातून/उद्देशाने document केलं, त्यापैकी किती आज आपल्याला उपलब्ध झालेलं आहे/नाही, आणि जे उपलब्ध आहे ते कोण आणि कोणत्या उद्देशाने उधृत करतं हे कळायला काय मार्ग आहे नाहीतरी?

Anonymous said...

रा. रा. विसोबा, "मिर्झाराजे जयसिंह शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांना शिवाजीविरूद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील काही ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ केला होता" हे विधान काहीसे दिशाभूल करणारे वाटते. माझ्या समजुतीप्रमाणे यज्ञ केला मिर्झा राजांनी, ब्राह्मणांनी पौरोहीत्य केले. चु.भू.दे.घे.

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
कोहम said...

आपलं म्हणणं पटलं. माझुया मनातही हा विचार आला होता. पण पडताळा कुठे करून बघायचा हे माहीत नव्हतं. माझ्या माहितीतली आण्खी एक बिरुदावली म्हणजे "प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतांस महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज". गो ब्राह्मण प्रतिपालक ह्यात येत नाही आणि हीच बिरुदावली योग्य असावी असं मला वाटतं. हा आपला मायोपिझम.

Anonymous said...

this is also non sense. gobrahman pratipaalak haa shabd purandarenni shodhun kaadhalelaa naahi.mi purandaryanchyaa aadhi (1935-40) daramyaan shivrayanvar lihileli pustake vaachali aahet (english)jyaat gobrahman pratipaalak asaa shabdprayog kelelaa aahe

dipak40 said...

waa
aapaN thor aahaat aaNi babasaahebapexaa tumachaa abhyaas
jaast disatoy abhinanadan

dipak40 said...

marathit kas lihaayach he koni saangel kaa?

Unknown said...

Go brahman prati palak ha shabd maharajansathi Ramdasani vaprala ahe hi kuthli padvi nahi

Anonymous said...

brigedi dukra

sanjay kshirsagar said...

हि माहिती खरी असावी कारण, शिवाजीचा नातू , संभाजी पुत्र पहिला शिवाजी उर्फ शाहू हा देखील आपल्या पत्रात ' क्षत्रिय कुलवतंस ' हि बिरुदावली लावताना आढळतो. सातारा येथे राज्याभिषेक करून घेतल्यावर हि बिरुदावली त्याने लावून घेतली. जर शिवाजी स्वतःला ' गोब्राम्हण.....' म्हणवून घेत असेल तर त्यांचा नातू देखील तीच बिरुदावली मिरवणार हे स्पष्टच आहे. कारण ' क्षत्रिय......' हे पद फक्त घेणार आणि त्याटेल ' गोब्राम्हण...' हा भाग वगळणार असा पंक्तिप्रपंच करण्याची शाहूला काय गरज होती ?
संदर्भ :- मराठी रियासत भाग -३
लेखक :- गो.स.सरदेसाई

sachin patil said...

farach chan

vaibhav8947 said...

jya kalat gayinchi srras kattal keli jat kinwa aplya aai bahininchi abru lutli jat ase tya kali shivaji maharajani he samrajya sthapan kele tyamule tyani ekprakare aplya sarvanche parkiyanchya atyacharapasun sourakshan kele mhanun gobrhman pratipalak he birud mala tari ayogya vatat nahi

सुरज महाजन said...

'गोब्राह्मण प्रतिपालक' असा उल्लेख रामचंद्रपंत आमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये शिवरायांबद्दल आला आहे.

Pratik Patil said...

राजश्रीयाविराजित सकळगुणमंडलिक रणनीतीधुरंदर क्षत्रियकुलावंतश सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज राजा शिवछत्रपती महाराज कि जय...

Unknown said...

तुमची काहीतरी गफलत होत आहे, ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केल्याचा पुरावा कुठेही नाही, मिर्झा राजाने केलेला यज्ञ महाराष्ट्रात केला कि बाहेर केला हे नक्की सांगता येत नाही,

गोब्राह्मणप्रतिपालक -
विजापूर मध्ये गायीला मारणाऱ्या एका मुसलमानाचा हात महाराजांनी कापला व गायीचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत आहे असे उद्गार काढले होते,
तसेच बाकरे स्वामींना दिलेल्या पत्रात संभाजी महाराज म्हणतात मी देव-ब्राह्मण प्रतिपालक मालोजी राजेंचा नातू आहे,
राजाराम महाराज रामदासी लोकांशी संबंधित लिहिलेल्या पत्रात म्हणतात "हे महाराष्ट्र राज्य म्हणजे देवा-ब्राह्मणाचे राज्य आहे"

संभाजी राजांनी लिहिलेल्या बुधभूषणमधील दहावा श्लोक:

येन क्शितितले कलावविकलं बुद्धावतारं गते
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छै: समादिते
भूयस्तत्परिपालनाय सकलज्वित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात//१०//

पृथ्वीवर हाहा:कार माजला असता बुद्धावतार झाला.तद्वत छ्त्रपती शिवरायांनी म्लेंच्छांनी सर्व वर्णांची पायमल्ली केली असता गायी व ब्राह्मणादि वर्णाचे देवद्वेष्ट्याकडून रक्शण करून रूढ धर्माचा मार्ग दाखवला.

आणि मुख्यतः या श्लोकावरून गो-ब्राह्मण प्रतिपालक म्हणले जाते,
परंतु यात ब्राह्मण असा अर्थ ब्राह्मण जातीने किंवा इतरांनी घेऊ नये, ब्राह्मण चा अर्थ विद्वान असाच घ्यावा, कारण त्या काळात ब्राह्मण समाजाकडेच बहुतेक सर्व अधिकार होते, त्यामुळे जो ब्राह्मण तो विद्वान असे रूढ झाले असल्याकारणाने असे म्हटले आहे, संभाजी राजांनीही ब्राह्मण जात न म्हणता ब्राह्मण वर्ण म्हटले आहे, ब्राह्मण वर्ण म्हणजे काय ते सर्वांनाच माहिती आहे, ब्राह्मण जातीचा आणि त्याचा दुरान्वयेही संबंध नाही, कारण जात ही जन्माने पडते तर वर्ण हा कर्माने असतो

बहुजन प्रतिपालक आणि कुळवाडी भूषण याला कोणी विरोध केल्याचे आठवते काय?

सुरज महाजन said...

गोब्राम्हणप्रतिपालक : अर्थ व अनर्थ

जेव्हा एखाद्या अंतर्गत समाजाबद्दल मनामध्ये पुर्वग्रह ठासलेला असतो त्यावेळी तो पुर्वग्रह हा डोळ्यावर चढलेल्या झापळाप्रमाणे काम करतो. समोर असणारे ढळढळीत सत्य त्यामुळे पुर्णपणे दिसु शकत नाहि व असे दिसणारे अर्धसत्य हे असत्या पेक्षा घातक असते याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा येतो. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास, कारणमिमांसा करायचा असेल आणि ती गोष्ट ऐतिहासीक असेल तर त्या गोष्टीबद्दल कारणमिमांसा करताना आजच्या काळात लागू होणारी परिणामे गतकाळाला लागु करुन जत कोणी कारणमिमांसा करत असेल तर तो व्यक्ती अशी कारणमिमांसा करण्यास अजुन लायक झाला नाही असे समजले जाते. कारण एखादी गोष्ट एखाद्या पर्टीक्युलर काळामध्ये वेगळ्या अर्थाने वापरली जाऊ शकते किंवा त्या गत काळामध्ये त्या गोष्टीची परिभाशा वेगळी होत असली पाहीजे असा दृष्टीकोण समोर ठेवून गतकाळाच्या सामाजीक, ऐतिहासी आणि माणसीक परिस्थिति लक्षात घेवुन त्या त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि यालाच "ऐतिहासिक अभ्यास" किंवा अशि योग्य परिमाने वापसुन इतिहासाचा अभ्यास करणार्‍यालाच "इतिहास अभ्यासक" असे म्हटले जाते. आणि अशा पद्धतीले केला जाणारा अभ्यासही चिरकाळ टिकतो आणि अभ्यास करणाराही. अब्यथा आज नव नविन असणारे नसणारे शोध लावून स्वत:ला इतिहास अभ्यासक अथवा इतिहास संशोधक म्हणवून घेणारे , झटपट प्रसिद्धीची हाव सुटलेले स्वयंघोषीत इतिहास अभ्यासक आपल्याला आज गल्लो-गल्ली भेटतील परंतु असा अभ्यास आणि अभ्यासक हा क्षणीक असतो हे ते लोक विसरतात.

वरिलप्रमाणे तत्कालीन परिस्थितिचा अभ्यास न करता , आजच्या परिस्थितिची परिमाने गतकाळाला लावून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी गतकाळातील अनेक गोष्टिंबद्दल आपण कोड्यात पडतो. उदा. "गो-ब्राम्हण-प्रतिपालक" हा शब्द ! आज आपल्याला या शब्दाचा अर्थ अनेक स्वयंघोषीत इतिहास अभ्यासक गाई आणि ब्राम्हणांचा प्रतिपाळ करणारा असा सांगीतला जातो. याच्या पुढे जाऊण ते लोक हा शब्द नाकारतात कारण त्यांचा प्रतिवाद आहे की शिवराय हे फक्त गाई आणि ब्राम्हणांचा प्रतिपाल करणारे होते का ? तसेच याच्या ही पुढे जाऊन हे लोक शिवरायांना "बहुजन प्रतिपालक" वगैरे बिरुदे लावतात . कारण त्यांना गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द "संकुचीत" व "जातिवादी" (एका जातीचा उदो उदो करणारा) असा वाटतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे तत्कालीन परिस्थितिचा अभ्यास न करता किंवा एखाद्या पर्टीक्युलर जातीच्या द्वेशाची झापळे डोळ्यावर असता काय होते हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.

तत्कालीन परिथिति काय सांगते ? : इ.स. ७११ पासुन हिंदुस्थानवर इस्लामची पहिली स्वारी झाल्यापासुन पुढे जवळ जवळ ९०० वर्षे भारतभर इस्लामी पाशवी अत्याचार कोणत्या पद्धतीने इथल्या हिंदुंवर अत्याचार, लुटालूट , मंदिर-विहारे-गुरुद्वारे यांचे विध्वंस , बाटवाबाटवी करत होते हे सांगत बसण्यात वेळ खर्च करत नाही. आणि हा विषय इथे घेण्याचे कारणही नाही. जणावरांमध्ये सर्वात दुबळा अथवा गरिब असा समजला जाणारा प्राणी व हिंदुंना पवित्र असणारी गाय ! हिंदुंचा स्वाभिमान दुखवण्यासाठी मुसलमान गाईंची कत्तल करत , व पुढे गौमांस हे मुसलमानांचे आवडते अन्न झाले. त्याचप्रमाणे हिंदु धर्मामधे "धर्म" वाचवण्यासाठी आग्रेसर असलेला ब्राम्हणवर्ग असल्यामुळे या वर्गावर मुसलमान लोकांचा नेहमीच डोळा होता कारण धर्म टिकवून ठेवणार्‍या समाजाचे खच्चीकरण केले असता इतर लोकांचे खच्चिकरण व्हायला सोपे जाते हा माणसशास्त्राचा अगदी सुरवातीचा नियम आहे. थोडक्यात हिंदु धर्मियांचे माणसिक खच्चीकरण करण्यासाठीचे मुसलमानांकडून जे प्रयत्न होत होते त्यामद्ये मुसलमानांद्वारा गोमांसभक्षण व ब्राम्हण समाजाची बाटवाबाटवी त्याचप्रमाणे मंदीरांची लुटालूट , जाळपोळ व मंदिरे उध्वस्त करणे अशाप्रकारची निति होती. आक्रमक मुसलमानांच्या दृष्टीकोणातुन विचार करता त्यांना इस्लामचा प्रचार करायचा होता, इथल्या भारतियांपुढे दोनच मार्ग होते एक म्हणजे इस्लामचा स्विकार आणि दुसरे म्हणजे मरणला कवटाळणे मग आवश्यक नाही की तो हिंदुच असला पाहीजे मुसलमानांच्या दृष्टीकोणातुन इतले बौद्ध , जैन, शिख, पारसी हे सर्व शत्रु म्हणजे काफीर होते. या सर्व समाजातील धर्माचा धागा जिवंत ठेवणारा जो "पुरोहितवर्ग" तो त्या काळातील आक्रमक मुसलमानांच्या प्रमुख टार्गेट होता.


पुर्ण लेख इथे वाचा : http://jwalant-hindutw.blogspot.in/2013/04/blog-post.html

Pokal Bambu said...

गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते याचा सरळ अर्थ घ्यायचा झाल्यास शिवाजी महाराजांनी गोहत्येस प्रोत्साहन दिले काय? ब्राह्मण ही जात (किंवा वर्ण ... जे पाहिजे ते) नष्ट करण्याचा किंवा ब्राह्मणांना वैरी मानण्याचा वटहुकुम राजांनी काढला होता काय?

रामदास पवार said...

आले की नाही मराठीत लिहता अजूनही तुम्हाला?

एस विजय said...

माझ्या मते गो म्हणजे गोचर किंवा दोनापेक्षा जास्त पाय असलेला म्हणजेच जनांवरान पासून ते ब्राह्मण म्हणजे त्या काळी जाती ऐवजी विद्वान या सर्वांचा प्रतिपालक म्हणजे त्यांच्या वाडीलांसारखा

पूर्ण अर्थ असा लावता येईल - जनावरांपासून ते विद्वानान पर्यंत सर्वांचा मुख्य पालक म्हणून संरक्षण किंवा देखभाल करणारा राजा

एस विजय said...

माझ्या मते गो म्हणजे गोचर किंवा दोनापेक्षा जास्त पाय असलेला म्हणजेच जनांवरान पासून ते ब्राह्मण म्हणजे त्या काळी जाती ऐवजी विद्वान या सर्वांचा प्रतिपालक म्हणजे त्यांच्या वाडीलांसारखा

पूर्ण अर्थ असा लावता येईल - जनावरांपासून ते विद्वानान पर्यंत सर्वांचा मुख्य पालक म्हणून संरक्षण किंवा देखभाल करणारा राजा

Unknown said...

सर्व मराठे ज्याप्रमाणे महाराजांच्या बाजूने नव्हते, त्याचप्रमाणे सर्व ब्राह्मणही त्यांच्या बाजूने नव्हते. अनेक जण विरूद्धही होते.तुम्हीच लिहिल्या प्रमाणे, राज्याभिषेकला ब्रह्मनानि विरोध तर केला पण सोहळा ही त्यांनीच पूर्ण केला..

lovemumbai said...

काय फरक पडतो. महाराजांना दूषण देणारी तरी पदवी नाही ना? बरे असे म्हटलें म्हणजे महाराजांनी इतरांची काळजी घेतली नाही का? अहो, महाराज हि अशी व्यक्ती होऊन गेली कि जिने अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि लोकांना स्वाभिमानाने जसे जगता येईल हे शिकवले. आपल्या मोडेन पण वाकणार नाही वृत्तीचे बीज त्यांनी रुजवले. आपण फक्त माज आहे मला मराठी असण्याचा म्हणतो पण त्यासाठी निरंतर करावे लागणारे श्रम आणि जबाबदारी विसरतो. एकमेकांवरील आपसातील हेवेदावे विसरून महाराष्ट्र समृद्धीचे विचार मंथन आपण करू तरच आपण महाराजांचे नांव घेऊ, त्यांचे नांव अधिक मोठे करू. बाष्कळ गप्पा पुऱ्या झाल्या असे नाही वाटत?

lovemumbai said...

काय फरक पडतो. महाराजांना दूषण देणारी तरी पदवी नाही ना? बरे असे म्हटलें म्हणजे महाराजांनी इतरांची काळजी घेतली नाही का? अहो, महाराज हि अशी व्यक्ती होऊन गेली कि जिने अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि लोकांना स्वाभिमानाने जसे जगता येईल हे शिकवले. आपल्या मोडेन पण वाकणार नाही वृत्तीचे बीज त्यांनी रुजवले. आपण फक्त माज आहे मला मराठी असण्याचा म्हणतो पण त्यासाठी निरंतर करावे लागणारे श्रम आणि जबाबदारी विसरतो. एकमेकांवरील आपसातील हेवेदावे विसरून महाराष्ट्र समृद्धीचे विचार मंथन आपण करू तरच आपण महाराजांचे नांव घेऊ, त्यांचे नांव अधिक मोठे करू. बाष्कळ गप्पा पुऱ्या झाल्या असे नाही वाटत?

Unknown said...

छत्रपती हे तरी मान्य आहे का?

Unknown said...

suraj Mahajan , pls do not play with words , If moguls wanted to convert Hindustan in to muslin country they could have done it easily in 900 year. Kings and Emperors rule any country for wealth that is the prime reason among st many other reasons spreading religion is secondary one ...Temples always has very large wealth and are easy to attack.

प्रबोधन मंच श्रीगोंदा said...

धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या बुधभूषण ग्रंथाच्या दहाव्या श्लोकात शिवरायांनी गायी व ब्राम्हणांचे रक्षण केले असे म्हटले आहे.

"येन क्शितितले कलावविकलं बुद्धावतारं गते
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छै: समादिते
भूयस्तत्परिपालनाय सकलज्वित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात//१०//"
.
अर्थ:- पृथ्वीवर हाहा:कार माजला असता बुद्धावतार झाला.तद्वत छ्त्रपती शिवरायांनी म्लेंच्छांनी सर्व वर्णांची पायमल्ली केली असता गायी व ब्राह्मणादि वर्णाचे देवद्वेष्ट्याकडून रक्शण करून रूढ धर्माचा मार्ग दाखवला.

Unknown said...

चुक महाराज गोब्राह्मण प्रतीपालक नव्हते हेच खरं सगळ चुकीचं मांडल त्या पुरंदरेने... 👺

Unknown said...

बहुजन समाज हा अजूनही अभ्यासू समाज नाही. शिकतो परंतु अभ्यास करत नाही. गो ब्राह्मण प्रतिपालक हे विशेषण महाराज स्वतःला लावून घेतील असे नाही पण विशेषणे हि कायम दुसरी लोकच लावतात. त्यामुळे ब्राह्मणांनी प्रेमाने एखादे विशेषण दिले असेल तर त्यात वाईट वाटून घेण्याचे काय आहे ? ब्राह्मणांचा दुस्वास असेल तरच असे वाद निघू शकतात. आणि असे विशेषण दिले म्हणजे तुम्हाला ब्राह्मणांचे संरक्षण करत बसायला पाहिजे असे नाही . ब्राह्मण स्वतः सिद्ध आहेत. शिवरायांच्या काळातील परिस्थिती आता नाही. ब्राह्मणांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी क्षत्रियावर अवलंबून राहावे लागत नाही.

Unknown said...

काम नाही या लोकांना, मी ब्राह्मण नाही. शिवाजी महाराज सगळ्यांचे राजे होते. माझ्या राजांनी कधी कुणाची जात पहिली नाही आणि म्हणून मी पण पाहत नाही. विषय संपला,
ब्रिग्रेडि तुमचा ज्ञान तुमच्याकडे ठेवा. जी लोक जात पाहून काम करतात ते या जगात काही टिकू शकणारं नाहीत.
-जितेंद्र , अमेरिकेवरून

Unknown said...

छत्रपती शिवाजी महाराज फक्त छत्रिय कुलावतंस व ते गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते

जय शिवराय

Unknown said...

एकतर पानसरेंनी अभ्यास केला नाही नाहीतर,फेकाफेकी केली आहे.
शिवभारत हे कवी परमानंद यांनी लिहिलेले असून शिवकालीन सर्वात विश्वासार्ह ऐतिहासिक साधन म्हणून समजले जाते.शिवचरित्र त्यातूनच
सांगितले जाते.
यात पहिल्याच पानावर शिवरायांचा उल्लेख करताना यवनांचा(मुसलमान) कर्दनकाळ आणि देवब्राह्मण (तेव्हा ब्राह्मणांना देवब्राह्मण असे
म्हणत) आणि गायींचा रक्षणकर्ता असे संबोधले आहे.ह्या दोन विशेषणांव्यतिरिक्त कौतुक करणारी अनेक विशेषणेही त्यांनी शिवरायांसाठी
वापरली आहेत.
संदर्भ.भाग १ , शिवभारत अध्याय पहिला,पान पहिले.
https://drive.google.com/file/d/0BxLaOziNb169Qm8zTDdzQ3o2MVE/view
तसेच,
छत्रपतींचे वंशज पहा काय म्हणून स्वत:चे वर्णन करतात.गोब्राह्मणप्रतिपालक.!!! सातारचे एक वंशज शाहू महाराजांची लग्नपत्रिका पहा.
साल १९३९.
https://drive.google.com/file/d/1e57ka6ZNS5CibfG1qaeKYX-27IEkWzq7/viewUnknown said...

maharaj gobramhan pratipalak nhavte te sarvanche raje hote............

Unknown said...

मुळात "शिवाजी" हे एकेरी ऐकणे वाचणे "छत्रपती श्री" हे न जोडता, म्हणजे, कानात तप्त शिस ओतल्या सारखं वाटतं...

Unknown said...

आता ज्योतिबा फुले काय लिहितात. " मुसलमान लोकांनी धूर्त आर्या भटांच्या कोरीव दगडांच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानु दास केलेल्या शूद्रादि शूद्रांचे कळप चे कळप त्यांच्या तावडीतून सोडउन मुसलमान करून त्या सर्वांस आपल्या धर्मात सामील करून घेतलें " धर्मांतर केले, किती तर कळप चे कळप . अजून पुरावे इतिहासाचे पानां वर आहेत.