मराठी साम्राज्याचा कर्ता - मलिक अंबर?

मराठी साम्राज्याच्या कर्तेपणाचा मान मलिक अंबरकडे जातो, असं प्रतिपादन करून ज्येष्ठ लेखक श्री. भालचंद्र नेमाडे यांनी मध्यंतरी हलकीशी खळबळ उडवून दिली होती. हलकीशी म्हणायचं कारण असं, की आजकाल असे वाद घालण्यात कोणाला फारसा रस आहे, असं दिसत नाही. झालेच वाद, तर त्याकडे लक्ष देण्यास येथील माणसांना वेळ आहे असंही दिसत नाही. आणि या माणसांत सगळेच आले. म्हणजे आपले पेपरवाले, लेखक, उरले-सुरले विचारवंत वगैरे सगळेच. असो.

तर मुद्दा असा, की 14 मे 2002 रोजी कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठान येथे श्री. भालचंद्र नेमाडे यांचं भाषण झालं. भाषणाचा विषय "साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण' असा होता. भाषणाच्या ओघात, "हिंदू' ही अस्मिता 1861 नंतर जेव्हा इंग्रजांनी खानेसुमारी सुरू केली तेव्हापासून आली, हा मुद्दा मांडत असताना ते म्हणाले,

""मराठा साम्राज्याची स्थापना कुणी केली असेल तर फार तर आपण शहाजीपर्यंत जातो. शहाजीच्या मागे जाणं आपल्याला परवडत नाही. कारण शहाजीच्या आधी मराठी साम्राज्याचा कर्ता मलिक अंबर असतो. मलिक अंबरनं प्रथम मराठ्यांना राष्ट्रीयत्वाचं भान आणून दिलं. उत्तरेकडच्या "हिंदुस्थानी' मोगलांविरूद्ध दखनी मराठे संघटीत केले, गनिमी कावा पहिल्यांदा यशस्वी रीतीनं शोधून वापरला. शहाजीसारखे सरदार तयार केले. खंडागळे विरुद्ध जाधव, जाधव विरुद्ध भोसले, दरोडेखोर, लुटारु आणि पुंड असे परस्परांशी लढणारे सगळे दखनी मराठे एकत्र करणारा मलिक अंबर महाराष्ट्राच्या आपल्या मध्यवर्ती संस्कृतीत धरायचा नाही?''

गेली अनेक वर्षे श्री. भालचंद्र नेमाडे हे "हिंदू' या नावाची कादंबरी लिहित आहेत. (ही कादंबरी अखेर यंदा प्रकाशित होणार आहे.) त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या वाचन-मनन-चिंतनातूनच त्यांचे उपरोक्त विचार आले असणार. तेव्हा ते उडवून न लावता त्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे. त्या अंगाने इतिहासाचे वाचन व्हायला हवे. मात्र या विषयातील तञ्ज्ञांकडे तो भाग सोपवून आपण प्रथम मलिक अंबरची थोडी माहिती घेऊ या.

अल्लाउद्दिन खिलजी याचा सेनापती मलिक काफूर हा मूळचा हिंदू. त्याने 1313 साली देवगिरीवर स्वारी करून शंकरदेवास ठार मारले आणि देवगिरीचे राज्य दिल्लीला जोडून घेतले. 1318 ला यादवांचे राज्य बुडून महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. त्यानंतर 1347 मध्ये हसन गंगू जाफरखान याने गुलबर्गा येथे आपले स्वतंत्र बहामनी राज्य स्थापन केले. हसन गंगू बहामनी हाही मूळचा हिंदूच होता व आधी तो कुणा शेख जुनैदी याचा चाकर होता. त्याने मुस्लिमांतील शिया पंथ स्वीकारला होता. 1490मध्ये बहामनी राज्याची सत्ता संपुष्टात आली आणि त्याचे पाच तुकडे पडून महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, बेरीदशाही व कुतुबशाही अशा पाच भिन्न शाह्या प्रस्थापित झाल्या.

(यातील बेरीदशाही स्थापन करणारा कासीम बेरीद हा प्रथम महंमद शहापाशी एक गुलाम होता. विजापुरचा युसूफ आदिलशहा हाही पूर्वी तुर्क गुलाम होता. तो इराणातून 1459 साठी दाभोळला आला आणि तीस वर्षात स्वतंत्र राजा बनला. इमादशाही स्थापन करणारा फतेहल्ला इमादशहा हा मूळचा हिंदू ब्राह्मण होता. विजयनगरबरोबर झालेल्या एका लढाईत तो मुसलमानांच्या कैदेत पडला. नंतर तो मुसलमान झाला. निजामशाही स्थापन करणारा अहंमद निजामशहा हाही एका ब्राह्मणाचा मुलगा. विजयनगरचा एक ब्राह्मण भिमाप्पा बहिरू याचा मुलगा लढाईत कैदी झाला. मग त्याला मुसलमान करण्यात आले. त्याचे नाव ठेवले मलिक नाईब निजाम उल्मुक. अहंमद निजामशहा हा त्याचा मुलगा.)

तर मलिक अंबर या पाच शाह्यांपैकी निजामशाहीचा वजीर होता. हाही मूळचा गुलाम. बगदादच्या एका व्यापाऱ्याच्या गुलामीत तो होता. त्या व्यापाऱ्याने याला निजामशाहीचा वजीर चंगीजखान याला विकले. पुढे आपल्या कर्तृत्त्वाने तो त्याच निजामशाहीचा वजीर बनला. लखूजी जाधवराव, मालोजी व शहाजी भोसले, बाबाजी काटे असे अनेक सरदार त्याच्या हाताखाली पराक्रम करीत असत. हा मोठा कर्तबगार मुत्सद्दी होता. औरंगाबाद हे शहर त्याने वसविले. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याची "मलिकंबरीतह' या नावाने ओळखली जाणारी वसुलीपद्धत.

1607 ते 1626 या दरम्यान त्याने दक्षिणची शेतवार पाहणी व मोजणी करून प्रतवारी बसविली आणि जमिनीच्या उत्पन्नाप्रमाणे दोन पंचमांश हिस्सा घासदाण्याच्या रूपाने वसूल घेण्याचा खुद्द गावाशी ठराव केला व वसुलाची जबाबदारी पाटलावर टाकली. 1614 नंतर त्याने काही ठिकाणच्या दरसालच्या वास्तविक उत्पन्नाच्या मानाने एक तृतीयांश नगदी वसूल घेण्याचा प्रघात सुरू केला. त्याने प्राचीन ग्रामसंस्थांचे पुनरुज्जीवन केले. कुणब्यांना मिरासपत्रे देऊन म्हणजे जमिनीचे मालक बनविले. त्यांना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे हक्क दिले. पाटील, कुलकर्णी व इतर ग्रामअधिकारी यांची वतने वंशपरंपरागत करून दिली. त्याने गावाला पड जमिनीतून वनचराई व गायराने काढून दिली आणि बाकीची जमीन "गावसंबंधी' किंवा "गाववर्दळ' म्हणून गावाच्या दिमतीला लावून दिली. ही वसूलपद्धतीची सुधारणा "मलिकंबरीतह' म्हणून ओळखली जाते.

मलिक अंबरचा गौरव करताना "गावगाडा'कार त्रिंबक नारायण आत्रे म्हणतात, ""कुणब्याचा किंबहुना कुणब्याअडाण्यांचा काळीशी एकजीव केल्यावाचून सरकारसाऱ्याची शाश्‍वती नाही, हे तत्त्व मलिकंबरने पूर्णपणे हृदयात वागविले आणि अजूनही लोक त्याचे गुण आठवितात.''

तर असा हा मलिक अंबर. तो मराठी साम्राज्याचा कर्ता असल्याचे जे मत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले आहे, ते म्हणूनच गांभीर्याने घेतले पाहिजे.

संदर्भ -
- "साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण' - भालचंद्र नेमाडे, लोकवाङ्‌मय गृह, पहिली आवृत्ती 2003, पृ. 14-15.
- "महाराष्ट्र संस्कृती' - पु. ग. सहस्त्रबुद्धे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, द्वितीयावृत्ती 1994, पृ. 248, 251, 263, 275.

19 comments:

Vishal Khapre said...
This comment has been removed by the author.
Abhijit Bathe said...

Good Article. I had no idea about Malik Ambar. How does it matter who is given credit for Marathe shahi - I wasnt aware if anyone was given credit for it either.
I find this article very informative and unbiased. If you keep writing such articles and not take leaps of faith in your personal judgements, I would like to think that your blog is important.

Anand Kale said...

तुमचा ब्लोग खुपच रोचक आणि माहितिपुर्ण आहे यात वादच नाही...

मी तर तुमचा मनोगतावरहि फ़ान आहे ...

पण एक खटकले.. तुम्हि पुस्तके somehow missguide करतात असे म्हटले आहे... पण तुमचा प्रत्येक लेख हा पुस्तकांवरच आधारित पुरावे
देतो आहे . ;)

तरिहि लेख येत राहु द्या...

... तुमचा आनंद

Yogesh said...

Atishay surekh lekh.

Hya lekhabadddal kevaL aikale hote. pan lekh vachun khoop anand jhala.

सिनेमा पॅरेडेसो said...

shodhun kadlach.

zakkkas ahe ha prakar

test said...

I dont know how to thank you for educating me on Malik Anbar, I think Marathi historian purposely downplayed his contribution to the foundation of Maratha Empire, I have never ever heard his name & his agriculture policies which seems inspired Shivaji as well, cause Shivajis agriculture polices made him so popular and Lokancha Raja.

Anonymous said...

मलिक अंबर हा नि:संशय मोठा कर्तबगार सेनानी व प्रशासक होता. आपला लेख त्याची उत्तम ओळख घडवतो. पण त्यास मराठा साम्राज्याचा कर्ता असे म्हणण्याऐवजी तो त्याच्या उदयास काही अंशी कारणीभूत ठरला असे म्हणणे जास्त योग्य वाटते. त्याचा मुग़लांशी संघर्ष हा मुख्यतः निज़ामशाही वाचविण्यासाठी होता, ज्याला त्याने दखनी विरुद्ध (उत्तर) हिंदुस्थानी असे परिमाण दिले. या अर्थी तो दखनी अस्मितेचा कर्ता म्हणता येइल.

केदार जोशी said...

Malik Amberalaa laa kartaa mhanun tumhee shivaajeear anyaay karat aahaat. khare tar shahaajeelaa paN karataa mhaNane chukeeche THarel. mRunamay ne liheelyaa pramaane tyaane phakt daxeen virdhd uttar ase raajakaaraN kele aahe. phaara tar to dRaShaTaa vajeer hotaa ase mhaNataa yeIl.
tyaache Iteehaasaateale sthaana maatra pakke aahe paN kartaa mhaNane chukeeche Tharel.

Unknown said...

chan article aahe,
pan nijamshahi koni vachavli? fackta eekch sardar sarvan sobat ladhat hota. aani te mhanje Shahaji Raje. koni malik ambar nahi.aani Shahaji Rajanich nijamachya mulala gadivar basavla hota.

nikhil bapat said...

brahman musalman jhale tar sambhaji brigade la sodnar nahit

sachin said...

mazya knowledge nusar bhalchandra nemade yanchya matashi mee sahmat ahe

Anonymous said...

जरी मलिक अंबर ने दाख्खनेतल्या मराठ्यांना एकत्र करून दिल्लीशी लढा दिला तरी तो हिंदवी स्वराज्याचा प्रणेता कसा होऊ शकतो.
त्याने स्वताच्या फायद्या साठी मराठ्यांचा वापर केला.
हिंदवी स्वराज्य हि कल्पना शाजीराजांचीच आहे. जिजामातेने आणि शिवरायांनी तिला वाढवले हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
उगीचच काही तरी खोट काढून वाद निर्माण करायचा हि बाम्नानाची जुनी सवय आहे.
ह्याचा जाहीर निषेध
हिंदवी स्वराज्याचा प्रणेता कुणी मुस्लीम आहे ह्यासारखी हास्यासपद गोष्ट कोणती असू शकेल.

जय जिजाऊ जय शिवराय

Anonymous said...

Marathaji, bas jhale atta. hi site kahi pracharachi site nahi. Lekhakane sandarbh det mahiti lihili ahe. Aniket sonawane.

MANGESH BHOSALE said...

ANOTHER THING REGARDING MALIK AMBAR--
He was originally HABASHI (African Muslim)
He originated 'Gorilla war' popularly known as 'Ganimi Kawa' first time in India..
which was further followed by Shiwaji Maharaj...


MANGESH BHOSALE

Anonymous said...

Thank you for another wonderful post. The place else could
anybody get that type of information in such a perfect method of
writing? I have a presentation subsequent week, and I'm at the look for such information.

my blog post; best online casinos

Anonymous said...

What's up, everything is going nicely here and ofcourse every one is sharing facts, that's in
fact excellent, keep up writing.

my website :: jailbreak iphone 5

Anonymous said...

MALIK AMBAR KAY AMHALA sheti shikwayala ala hota kay ?

Sanjay Deshmukh kamangaokar said...

Tumhi purvi hech dhande kelet. Dharm badlun hinduncha chhal kelat. Vichar changla ahe. Naske aambe baher gelech pahije

K Ram said...

Sunder mahiti