खंडोबाची कथा - मूळ लेख

खंडोबाची मूळकथा या प्रा. विश्वनाथ शिंदे यांच्या लेखाची लिंक खट्टामिठावर दिली होती. परंतु ई-सकाळची ती लिंक सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे हा लेख मुळातूनच या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे. जिज्ञासूंनी तो जरूर वाचावा. त्यासाठी येथे क्लिक करा -

गोपुराण...


ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील २८ वे सूक्त इंद्राला उद्देशून आहे. त्यात म्हटले आहे, की हे इंद्रा, अन्नाच्या इच्छेने तुझ्यासाठी जेव्हा हवन केले जाते, त्यावेळी यजमान तातडीने दगडाच्या तुकड्यावर सोमरस तयार करतात. तो तू पितोस. यजमान बैल शिजवतात आणि तो तू खातोस. (अद्रिणा ते मन्दिन इन्द्र तुयान्त्सुन्वन्ति सोमान्पिबसि त्वमेषाम । पचन्ति ते वृषभाँ अत्सी तेषां पृक्षेण यन्मधवनहूयमान : | - ऋग्वेद १०.२८.३ ) या इंद्राला बहुधा बीफ अतिशय प्रिय असावे. याच मंडलातील ८६व्या सूक्तातील एका ऋचेत इंद्राचे उद्गार आले आहेत. तो म्हणतो – इंद्राणीद्वारा प्रेरीत यज्ञकर्ते माझ्यासाठी पंधरा बैल शिजवतात. मी त्यांचे मांस खातो आणि त्याने माझे पोट भरते. ते माझे पोट सोमरसानेही भरतात. (उक्षणों ही में पंचदंश साकं पंचंती: विश्तिम् | उताहंमदिंम् पीव इदुभा कुक्षी प्रणन्ती में विश्व्स्मान्दिन्द्र |)

सध्या गोमाता भलतीच चर्चेत आहे. राज्यात गोवंशहत्याबंदी कायदा लागू झाला आहे. तो देशातही लागू करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर गोहत्येबाबतची ही प्राचीन ग्रंथांतील माहिती उद्बोधक ठरेल...
लोकप्रभाच्या ३ एप्रिल २०१५ च्या अंकातील रवि आमले यांचा टाचणी आणि टोचणी या सदरातील लेख...