सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता!

एखादे असत्य वारंवार सांगितले, की ते सत्यच वाटू लागते. इतिहास वाचताना हे अनेकदा दिसून येतं. मराठ्यांच्या इतिहासातलं असं एक प्रकरण म्हणजे सूर्याजी पिसाळ याची फितुरी. या माणसाने देशमुखीसाठी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या घशात घातली, असा त्याच्यावर आरोप आहे. आज फितुरीचं दुसरं नाव म्हणून त्याचंच नाव घेतलं जात आहे.

या फितुरीची आख्यायिका रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासतीच्या दुस-या, 'स्थिरबुद्धी राजाराम' या खंडात दिली आहे. (पृ.156-157). त्यात म्हटले आहे, -

"शौर्यादि गुणांत मराठे कोणासही हार जाणारे नाहीत; त्यांचे मरण गळेकापू स्वभावात आहे, हा प्रकार रायगड किल्ल्याचे बाबतीत चांगला निदर्शनास आला. किल्ला इतका दुर्भेद्य की लढून तो बहुधा मोगलांस प्राप्त झाला नसता. वेढा घालून आठ महिने झाले, तथापि ईतिकादखानाचे (जुल्फिकारखानाचे) पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. बादशहाने सारखी त्यास निकड लाविली; आणि त्याच्या मागणी प्रमाणे सामान फौजा सर्व काही तयार करून पाठविले. तेव्हा खानाने कपटविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता. त्यास वाईची सुभेदारी देण्याचे आमिष दाखवून खानाने फितूर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्गशीर्ष शु. 2 रविवार ता. 3-11-1689 रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्यावेळी येसूबाईची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. जिवास अपाय करणार नाही अशी खानाकडून शपथ घेववून नशिबाला बोल लावीत ती मुलामंडळींसह खानाचे स्वाधीन झाली."

ही झाली आख्यायिका. वास्तविक सू्र्याजी पिसाळ वतनलोभी होती. संधीसाधू होता. स्वराज्य स्थापनेमागे शिवछत्रपतींचे जे हेतू होते, ते कळूच न शकणारा दगड होता. पण त्याने फितुरी केलेली नाही.

हा गृहस्थ वाई परगण्यातील ओझर्डे गावचा पाटील. संपूर्ण वाई परगण्याचा देशमुख वतनदार बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. शिवाजी राजांच्या कारकीर्दीत वाईच्या देशमुखीवर दत्ताजी केशवजी पिसाळ होता. याचा पुत्र केशव. त्याच्या पत्नीने दीर गंगाजी याचा पुत्र दत्ताजी यास दत्तक घेतले होते. संभाजी राजांच्या काळात, 1688 मध्ये स्वराज्यावर मोगलांनी जोराचा हल्ला केला. वाई परगणा मोगलांच्या ताब्यात गेला. तेव्हा स्वराज्याशी एकनिष्ठ असलेला दत्ताजी परागंदा झाला. त्याचे देशमुखी वतन वाईचा अंमलदार न्याहरखान याने बळकावले. या धामधुमीत सूर्याजीच्या मनाची चलबिचल सुरू होती. त्याने गावचा वसूल सरकारात भरला नव्हता. त्यासाठी रायगडावरून तगादा लावला गेला, तेव्हा सूर्याजी गाव सोडून जो पळाला तो थेट जुल्फिकारखानाच्या फौजेत आला. यावेळी जुल्फिखारखान रायगडावरील मोहिमेवर चालला होता. त्याच्याबरोबर सूर्याजीही रायगड परिसरात आला. याचा अर्थ संभाजीराजांच्या बलिदानापूर्वीच हा माणूस मोगलांना मिळालेला होता.

रायगडाचा वेढा गडावरील मंडळींना अगदीच सोसवेना झाला. सर्वत्र निराशेचा अंधार पसरला. अशावेळी येसूबाई आदी मंडळींनी गड मोगलांच्या स्वाधीन करण्याचा निश्चय केला. त्यानुसार उभयपक्षी वाटाघाटी सुरू झाल्या. यावेळी सूर्याजी खानाच्या फौजेत होता. जुल्फिखारखानाने त्याच्यातील 'गुण' ओळखून त्याच्याहाती वाटाघाटीची सूत्रे सोपविली. त्याने ही भूमिका योग्यरीत्या पार पाडून खानाची मर्जी संपादन केली. सूर्याजीची ही कामगिरी वर्णन करणारा एक उतारा आढळतो. -
"तेथे रायगडचे मसलतेमुळे मनसबा करून (सूर्याजीने) मावळीयांची सरदारी केली. गडास मोर्चे लावले व दरामतीत (मध्यस्तीत) पडोन खानास गड हस्तगत करून दिल्हा. ये गोष्टीकरिता खान मशारनिल्हेची कृपा त्यावरी विशेष जाली. खान हजरतीच्या (औरंगजेबाच्या) दर्शनास आले. तेव्हा सूर्याजीची स्तुती हजरतीपावेतो करून सिरनाहाणी करविली. हा अस्करा (ख्याती) लष्करात बहुत जाला..."

एकंदर सूर्याजीची रायगडाच्या पाडावामधील भूमिका मध्यस्थाची आहे. फितुराची नाही. त्याला फितूर म्हणावे, तर तो आधीच शत्रूला जाऊन मिळाला होता. तो स्वराज्याचा शत्रूच होता. आणि याच्या जोरावर त्याने नंतर वाईची देशमुखी बळकावली.

सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे रायगड मोगलांच्या हाती गेल्यानंतर काही काळात तो पुन्हा राजाराम महाराजांच्या सेवेत रूजू झाला. एवढेच नव्हे, तर राजाराम महाराजांनी त्याला वाईची देशमुखी दिली.

त्याचे असे झाले, की रायगड मोगलांच्या हाती लागल्यानंतर बादशहाने जुल्फिकारखानास जिंजी किल्ल्याच्या मोहिमेवर पाठविले. (30 नोव्हेंबर 1689) त्यावेळी सूर्याजी पिसाळही त्याच्याबरोबर गेला. जिंजीच्या वाटेवर असतानाच त्याने वाईच्या पूर्ण देशमुखीचे वतन मिळविले. पण ते जिंजीला पोहचेपर्यंत परिस्थिती बदलली होती. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांच्या फौजांनी मोगलांनी जिंकलेले गडकोट व ठाणी पुन्हा ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. त्यात वाई परगणाही पुन्हा एकदा मराठ्यांच्या अंमलाखाली आला. आणि पुन्हा एकदा दत्ताजी पिसाळ याला वाईची देशमुखी देण्यात आली. जिंजीचा वेढा सुरू असताना ही बातमी सूर्याजीला समजली असावी. येथपावेतो त्याच्या लक्षात वारा फिरल्याचे आले असावे. त्यामुळे मग त्याने राजाराम महाराजांशी संधान बांधले आणि जुल्फिकारखानास आणि मोगली लष्करास गुंगारा देऊन तो किल्ल्यात छत्रपतींच्या दर्शनास गेला. तेथे त्याने राजाराम महाराजांना त्याच्याकडील जुनी आदिलशाही फर्माने दाखविली. ती पाहून राजाराम महाराजांनी त्याला वाईच्या निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या. त्या घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण रामचंद्रपंत आदी प्रधान व अधिका-यांना वाईच्या देशमुखीचा सर्व इतिहास माहित असल्याने तेथे सूर्याजीची डाळ शिजली नाही. तेव्हा तो पुन्हा कर्नाटकात जिंजीला गेला.

तेथे त्याने आता निराळेच डाव लढविण्यास सुरूवात केली. राजाराम महाराजांची सगुणाबाई नावाची अत्यंत सुंदर नाटकशाळा होती. राजा कर्ण हा तिचा मुलगा. तिला आणखी एक मुलगीही होती. या कन्येबरोबर आपल्या मुलाचा विवाह लावण्याचा प्रस्ताव सूर्याजीने महाराजांजवळ मांडला. सूर्याजीसारखा घरंदाज मराठा आपल्या पुत्राचे लग्न दासीकन्येशी लावण्यास तयार झाल्याचे पाहून राजाराम महाराजांनी त्याला आता वाईची सगळीच देशमुखी दिली.

राजाराम महाराजांनी दत्ताजीकडील देशमुखी काढून घेतल्याचा जो रोखा उपलब्ध आहे, त्यात ते म्हणतात - "सूर्याराऊ पिसाळ... हे मोगलाईतून स्वामीसंनिध येऊन आपल्या वतनाचे वर्तमान विदीत केले.... सूर्याराऊ पिसाळ याणी ... मोगलाईमध्ये मबलग पैके खर्च करून दिवाणात सीरणी देऊन फर्मान करून घेतले, अलीकडे स्वामीच्या पायापासीही येकनिष्ठा धरून संनिध येऊन सेवा करीत आहेत...."

पण यानंतरही देशमुखीची वाद काही मिटला नाही. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी दत्ताजीस त्याचे वतन परत केले. तेव्हा मग सूर्याजी पुन्हा मोगलांना जाऊन मिळाला. मोगलांनी वाईचे ठाणे पुन्हा जिंकले असावे. त्यावर इस्माईलखान मखा याची ठाणेदार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सूर्याजीने त्याला हाताशी धरले. परगण्याचे देशपांड्यांसारखे वतनदार व दत्ताजी यांना बोलावून त्यांना कैद केले आणि त्यांच्याकडून सूर्याजीच्या निम्म्या वतनाचा महजर तयार केला. याच महजरात सूर्याजीने वतन सोडविण्यासाठी एक लक्ष बावीस हजार सातशे रूपये खर्च केल्याचा उल्लेख आहे.

या काळात औरंगजेब बादशहाची छावणी विशाळगडाच्या पायथ्याशी होती. दत्ताजीने तेथे जाऊन फिर्याद नोंदविली. औरंगजेबाला त्याची बाजू न्याय्य वाटल्याने त्याने सूर्याजीने केलेल्या सेवेकडे न पाहता दत्ताजीला त्याच्या वतनाचे फर्मान दिले, एवढेच नव्हे, तर इस्माईलखान मखा याची वाईच्या ठाणेदारपदावरून बदली करून तेथे यासीनखान याला पाठविले. दत्ताजी वाईस येऊन वतनदारी अनुभवू लागला.

इकडे सूर्याजीही इरेस पेटला. छावणीत जाऊन त्याने खूप लटपटी-खटपटी केल्या. मुसलमान धर्म स्वीकारल्यास बादशहाची मर्जी प्रसन्न होते हे त्याला माहित होते. तेव्हा बादशहाची मेहेरबानी मिळविण्यासाठी तोही मुसलमान झाला. पण दत्ताजीची बाजू इतकी न्याय्य होती, की औरंगेब बादशहाने सूर्याजीने धर्मांतर केले तरी त्याला वतन काही दिले नाही.

हे प्रकरण नमूद करून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, "जी गोष्ट मराठ्यांच्या छत्रपतींना (राजाराम महाराजांना) जमली नाही तो औरंगजेबाने करावी, आणि तीही सूर्याजीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर करावी, याची मराठ्यांच्या इतिहासकारांनी खास दखल घेतली पाहिजे.

सूर्याजीचा हा वतनलोभ, त्यासाठी त्याने केलेली कारस्थाने हे सर्व तेव्हाच्या मराठा वतनदारांच्या प्रवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहे.

आणि अखेरीस येथे एक बाब नमूद करायलाच हवी, की भलेही सूर्याजी पिसाळ रायगडचा फितूर नसेल, पण तो त्याच्यासारख्या अनेक वतनदारांप्रमाणे स्वराज्यद्रोही मात्र निश्चित होता.

संदर्भ -
- मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993, पृ. 109 ते 120.

20 comments:

Priyabhashini said...

Your blog is too good. I have been reading it for past few days and I admire your style and sincerity.

shobhansh said...

good artical

sanjay kshirsagar said...

अप्रतिम !
अव्वल दर्जाच्या संदर्भ साहित्याचा वापर करून समतोलपणे लिहिलेला हा लेख आहे !!

Pranav Garware said...

sadhya gele kityek varshe .. Brahman aani marataha ya wadatun baryach goasthina virodh hoat aahe .. mag te ramdas swami aso kiwa suryaji pisal .. ya donhi jatitalya gatbaji mule khara Shivaji rahato vegala ... hech durdaiv ..

श्री.अभिजीत पाटील said...

अप्रतिम लेख आहे.
क्रुपया हा लेख वाचा आणि प्रतिक्रिया द्या.
धन्यवाद !
http://marathikattaa.blogspot.in/2012/06/suryaji-pisal-fitur-navhech.html

Satish Pisal Deshmukh said...

अप्रतिम लेख आहे.
धन्यवाद !

Unknown said...

I don know from where Mr. Pawar got this information. most sources say that suruaji pisal was killedar of raigad who opened gates of raigad for mughals. western historians who has nothing to do with so called maratha-bramhin cold war also say same.

Unknown said...

it is wrong to say that yesubai on raigad could not hold raigad even in 9 months of seize. I want to remind u that small forte of ramshej near nashik fought with mughals for long 7 years. Raigad was much more well defended and well equiped. Also it was capital so pride of maratha kingdom. so maratha would have defended it at all costs. Marathas were furious at time as aurngzeb had just killed Sambhaji maharaj in cruel way. All these things indicate that fall of raigad was due to some traitairy.

Anonymous said...

This column looks mature but actually it is not. ..

Unknown said...

I like this a lot. Thank you for sharing. I'm always looking for upcycles like this. In the end, you don't know it was a shipping pallet to begin with!
IPL 2016 time table Schedule
KXIP New Players List
T20 cricket Live Streaming 2016 Score Online

Unknown said...

Ipl t20
baaghi box office collection
http://www.happyfathersdayquotesimage.com/
Ipl t20
baaghi box office collection
http://www.happyfathersdayquotesimage.com/
Ipl t20
baaghi box office collection
http://www.happyfathersdayquotesimage.com/

Unknown said...

सूर्याजीने एव्हड्या माकड उड्या मारल्या हे आपणच सांगतात. त्यामुळे तो नक्कीच फितूर असला पाहिजे. म्हणतात ना धूर असला म्हणजे नक्कीच अग्नी कुठेतरी असतोच.

Unknown said...

Pl.correct ur info Gawade ji.........& check it from Authentic sources . Jaitoji Katkar was Raygad Killed at that time . Above information given by Dr.Pawar is true.

Unknown said...

धुर आणि अग्नीचा संबंध देऊन तर इतिहास चुकीचा लिहला,

Aryan said...

केवढे￰ मोठे राजकारण खेळला औरंग्या एक बाजूला सूर्याजी पिसाळ हाणून मारून मुसलमान बनवला नाहीतर त्याच्या स्वार्था पायी तो मुस्लिम झाला म्हणजे त्याच्यासाठी मुस्लिम बनवण्यास आपण जोर जबरदस्ती न करता सूर्याजींचे स्वार्थी धोरण कामास आले.आणि राहता राहिले वतन दोन भावांची भांडणे लावली ना आणि सूर्याजी स्वतःची स्वतः बदनाम झाला म्हणून त्याला परत हिंदू धर्मात स्थान मिळणार नाही त्याच्या पिढ्या आजून पण मुस्लिमच असतील..औरंग्या चांगला नव्हता तो वाईटच होता त्याचा उद्देश वाईटच होता..जय शिवराय

Unknown said...

दरिद्री सूर्याजी पिसाळ

Unknown said...

स्वराज्यात फितुरी करणारे सर्वात जास्त सरदार हे मराठा समाजातील होते हे मात्र त्रिवार सत्य आहे
त्या इंग्रजांची राणी इंग्लंडमध्ये बसून राज्य करत होती कधी तलवार हाती घेतली नाही तिच्या विरुद्ध कधी गद्दारीचा नामोनिशाण नाही. आम्हाला एकापेक्षा एक पराक्रमी राजे लाभले पण त्यांना फंद फितुरीचे ग्रहण लागले नसते तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केले असते

Unknown said...

If Suryaji Pisal's intention was only to get the Power,
In 2019 we have also found many such Suryaji in the new Government of Maharashtra.

Unknown said...

काळत नसेल तर कोणाबद्दल वाइट बोलू नये आपली लायकी नाय तेवडी

Unknown said...

अभ्यास पुर्ण माहिती