गोपाळ गणेश आचवल यांच्यापासून पु. ना. ओक यांनी प्रेरणा घेतली की कसे हे नक्की सांगता येणार नाही, पण ओक यांच्या संशोधनात आणि आचवल यांच्या संशोधनात खूपच साम्य दिसून येते.
ग्रंथाच्या प्रस्तावनेत आचवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकामध्ये त्यांनी मक्केविषयीचा मजकूर पाहिला आणि त्यांना हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मग त्यांनी जयंतराव टिळकांकडून एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाचे खंड आणले. काही संदर्भ पुस्तके विकत घेतली. शिवाय हिंदुधर्माविषयीचा त्यांचा अभ्यास होताच. त्यातून हा 510 पानांचा महाग्रंथ बाहेर पडला. या ग्रंथाची प्रस्तावनाच 140 पाने आहे. या अभ्यासातून आचवल यांना काय सिद्ध करायचे होते तर ते हे, की सर्व जगभर वैदिक धर्म होता.
ग्रंथाच्या पहिल्या दोन प्रकरणात त्यांचा मुख्य भर बायबलवर आहे. बायबलमध्ये कृष्णमयता किती आहे, हे सांगताना ते लिहितात, कृष्णमास आणि ख्रिसमस हे एकच. ख्राईस्ट म्हणजे कृष्ट म्हणजे उटी लावलेला, सेंट जॉन म्हणजे संत जनार्दन, सेंट मऍथ्यू म्हणजे संत माधव.
जुदा इस्कारियट म्हणजे यदुवंशी अक्रूर याने जेजस ख्राईस्ट म्हणजे यशोदा कृष्ण याला हेरोदी म्हणजे हरिविरोधी कंस याच्याकडे मारावयास हवाली केले. ओकांनीही शब्दोत्पत्तीच्या साम्यावर अशाचप्रकारे भर दिलेला आहे.
मुसलमानांविषयीचे आचवलांचे संशोधन तर अफलातून आहे. त्यांच्या संशोधनानुसार मुसलमान हे सेमेटिक म्हणजे सामवेदी. मुसलमान म्हणजे लढाईत मुसलायुध वापरणारे लोक. ते सलाम म्हणतात तो श्रीराम. मुसलमानातले सुनी म्हणजे वैष्णव आणि शिया म्हणजे शैव. मुसलमानांचा शादी हा शब्द सीतेपासून आला. महंमद पैगंबराच्या आईचे नाव अमिना (यमुना) होते. त्याच्या मुलीचे नाव फातमा (पद्मावती) होते. त्याच्या दुस-या बायकोचे नाव Sauda सीता असे होते.
हे काही संशोधन नमुनेही पाहण्यासारखे आहेत. -
इंद्राने जेव्हा अतिवृष्टी केली तेव्हा गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी उचलून धरला. त्या कथेला अनुलक्षून girder (गिरिधर) तुळई असा शब्द आहे. Beam म्हणजे तुळई असा शब्द आहे, तोदेखील ती तुळई भीमासारखी मजबूत असावी, अशा अर्थी आहे.
हिप हिप हुर्रा म्हणजे हे प्रभो प्रभो हरे. (पु. ना. ओक यांनी याची व्युत्पत्ती सीप सीप हरे - शीव शीव हरे अशी दिली आहे.)
हनीमून म्हणजे हनुमान. (हनुमानाप्रमाणे ब्रह्मचर्य पाळणे.)
पेशव्यांच्या दरबारी इंग्लिश रेसिडेन्ट मऍलेट - मारूती होता.
क्रुसेड म्हणजे क्रिश्चन - श्रीकृष्णानुयायांनी मुसलमानांबरोबर श्रीकृष्णाप्रीत्यर्थ केलेले युद्ध.
युरोपियन लोक वृंदावनाला ब्रऍंडिवाईन आणि शंकराला शूमेकर म्हणतात.
जोन ऑफ आर्क म्हणजे जनाबाई.
आता याला इतिहास संशोधन म्हणायचे की काय, हे ज्याने त्याने ठरवावे.
पण एक मात्र खरे, की या पु.ना. स्कूलचा प्रभाव अनेकांवर आहे.
मध्यंतरी एक कादंबरी वाचली. 'पाताळयात्रा' नावाची. लेखक आहेत अनिल ज. पाटील. (उन्मेष प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 2002, पाने 276, किं. 200 रु.) अतिशय मनोरंजक, रहस्यमय अशी ही कादंबरी. हातात घेतली तर वाचल्याशिवाय खाली ठेववणार नाही अशी. बळीराजाला वामनाने पाताळात लोटले या कथेवर ही कादंबरी आधारलेली आहे. पाताळ म्हणजे पेरूदेश आणि तेथे बळीला धाडण्यात आले, असे कल्पून लिहिलेली ही कादंबरी एखाद्या इंग्रजी रहस्यकथेच्या तोडीस तोड अशी आहे. या कादंबरीत रा. रा. पु. ना. ओक यांच्या ऋणाचा निर्देश केला असून, अन्य ग्रंथांप्रमाणेच ओक यांच्या काही पुस्तकांचाही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केलेला आहे.
रा. रा. अनिल पाटील यांनी पेरू, तेथील इन्का संस्कृती आणि वैदिक व द्रविडी संस्कृती यांत नाते असल्याचे कादंबरीत दाखविले आहे. एकूणच मोठे मनोरंजक, तितकेच गंभीर असे ते आहे.
ते वाचल्यानंतर वाटते, की पुना स्कूलच्या अंगाने जाण्यापेक्षा इतिहाससंशोधकांनी अधिक गंभीर मार्ग चोखाळला तर किती बरे होईल.
संदर्भ -
- आगळं-वेगळं - स. गं. मालशे, सुपर्ण प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती 1986, पाने 146 या पुस्तकातील विश्वव्यापी वैदिक संस्कृती हा लेख.
6 comments:
ha blog lihinara prani hind virodhi aahe. ase kitihi lekh aale tari hindu culture great hote hi fact pusali janar nahi. Oak ani Achaval yanche sanshodhan ha cheshtecha vishay nahi. Vaidic dharm hach kara puratan dharm ahe, he ata u.s. & russia nehi manya kele asun, tyavar tethe sanshodhan kartat ase pujy pandurang shastri athavale yanni lihun thevalele ahe. visoba te ekada neat vacha mhanaje tumachi kujaki buddhi sanmargavar yeil.
- Arati Joshi, Navi Mumbai.
Aho Arati Bai, jara daman ghyal ka? Hya blog lihinaaryanna tumhi tar chakka hind virodhi ghoshit kelay... tehi kaahi vichaar na karata. Me suddha tumchya saarakhaach ek vaachak aahe, aani tumhi yanche aadhiche blogs vachale asatil tar tyat te kothehi hind virodhi vaktavya karat naahit. ulat tyaancyaa likhanatun tyanchaa abhyaas kiti dandaga aahe tech lakshaat yete. aani pratyek likhaanaachyaa shevatee tyanni sandharbh suddha dile aahet. tevha aapali buddhi jagevar thevun paristhitee kaay aahe/hoti he jaanun ghyayachaa prayatna karavaa. aani tumhaalaa kahi vichaar patlech naahit tar sodun dyave kinvaa kahi puravya nishi charchaa karavi. ugaach kunavar aarop karu nayet. bagha patate ka te.
To Blogger - I really keep waiting for your blogs. I eagerly read it everytime and really appreciate your work. Keep it up!!
- Amol P.
Bakichya post sarakhi hi post informative/new to learn nahi vatali...
Vyaktinvar lihine avoid karun history madhil kalpana/prasanga etc. yavar kahi navin prakash takata yeiil ase kahi lihave...
tumachya kadun majhya apeksha aata vadhalya aahet.. ;-)
Navin information/clarifications chya pratikshet..
tumacha blog chan ahe.navin mahiti vachayala milate.asech lihit raha..keep it up!
Chakali
http://chakali.blogspot.com
ओकांच्या निष्कर्षांना संशोधन म्हणायला जीभ रेटत नाही. जगातील सर्व मायथॉलॉजींमध्ये बरीच साम्ये आहेत. यावरून सर्वांचा एकमेकांशी संबध जोडायचा तर कठीण होईल. यासंबंधी एक उत्कृष्ट पुस्तक म्हणजे जोसेफ कँपबेल यांचे
The Hero with a Thousand Faces. यात सर्व प्रमुख धर्मांच्या कथांमध्ये किती साम्ये आहेत ते पुराव्यासकट सांगितले आहे.
प्रिय आरतीबाय,
काय इथे हिंन्दु विरोधी लिखाण झाले आहे? किती सुंदर माहिती इथे आपल्याला उपलब्द करुन दिल्याबद्दल लेखकाचे आभार मानतो.अशीच माहिती भविष्यात दिलीस तर आम्ही तुझे आभारी असु. आता राहिली कुजकी आणि सडकी बुध्दी कोणाला काय बोलावे हे तुम्हाला समजत नाहि...तुमच्या स्वाध्याय परिवार सत्तेसाठी जे काय चालु आहे ते सग़ळे जग बघत आहे. विसोबा आम्ही तुझ्याबरोबर आहे.
अभय
Post a Comment