आपले पूर्वज काय खात असत?

ऋग्वेदातील आर्य हे पशुपालन करणारे टोळी-संघ होते. त्यांचे कांस्य युगात भारतीय उपखंडात आगमन झाले. पशुपालन करणा-या या आर्यांचे मुख्य पशुधन गोधन होते. साहजिकच त्यांच्या भोजनात गायीगुरांपासून मिळणा-या पदार्थांचा स‌मावेश असणार. भारतीय उपखंडात आल्यानंतर या आर्यांनी शेती करण्यासही सुरुवात केली. पशुपालन जीवनपद्धतीमुळे शेती ही मुख्यतः गायी व अश्व यांना चारा देण्याच्या हेतूने करण्यात येत असे. त्यासंदर्भातले एक सूक्त ऋग्वेदात आहे - क्षेत्रस्य पतीना वयं व हितेन जयामसी गामाश्वं पोशयिन्ता स‌नो मुळातिदृशे (4/57)

ऋग्वेदाचा अंतकाळ, यजुर्वेदकाळ ह्या काळातच शेती व्यवस्थेची सुरूवात झाली. ऋग्वेदात फक्त याव (बार्ली) या धान्याचा उल्लेख आहे. यानंतरचा काळ ब्राह्मणग्रंथांचा काळ. या काळात अगोदरच्या मानाने शेतीतंत्र प्रगल्भ झाले होते. शस्यम या नावाने ओळखला जाणारा तांदूळ हे या काळातले मुख्य पीक. यजुर्वेदात तांदूळ, सातू, बोरे, जव, स‌ाळी या धान्यप्रकारांचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे हविर्भागात तूप, दही, मध, काकडी, साळीच्या लाह्या यांचा स‌मावेश आहे.

ऎतरेय ब्राह्मणात तांदूळ व बार्ली यापासून तयार होणा-या धान, करंभ, परिवाप, पुरोडाश, पायस्या अशा पदार्थांची नावे आहेत. शतपथ ब्राह्मणात युवागुं या अन्नपदार्थाचा उल्लेख आहे. तो याव या धान्यापासून तयार करण्यात येत असावा. तैतिरेय ब्राह्मणात पृथुका, स‌क्तु, लाज (लाह्या. लाजाहोम - लज्जाहोम हा शब्द यापासूनच आला.), धाना, मसूस्य आणि करंभ अशा पदार्थांचा उल्लेख येतो. सायनाचार्य या जुन्या टीकाकाराच्या मते हे स‌र्व पदार्थ तांदूळ व बार्ली यांपासून बनविलेले आहेत. दुर्गाबाई भागवत सांगतात, वेदकाळातला पुरोडाश हा पदार्थ आपल्या इडलीसारखीच, पण मऊसा, लुसलुशीत, फारसा न फुगलेला पदार्थ असावा. तो तेव्हाच्या लोकांच्या नेहमीच्या आहारात असे आणि त्याचा नैवेद्य दाखवित असत. मात्र जयंत गडकरी यांच्या मते पुरोडाश हे दूध व लाह्या यांचे असावे.

मांसाहार

मात्र ब्राह्मणकाळात शेतीतंत्र आधीच्या काळापेक्षा प्रगल्भ झालेले असले, तरी धान्योत्पादन हे अजूनही गुजराण करण्याचे मुख्य साधन झाले नव्हते. या काळातही पशुंचे मांस हेच महत्त्वाचे अन्न होते. त्यांत गाय, बैल, मेंढा, बकरा हेच मुख्य मांसाशन होते. विविध यज्ञांचा भाग म्हणून पशुयज्ञ होत. त्यामध्ये नेहमीच्या ग्राम्य पशूंबरोबर हरीण, मोर, तित्तीर, रेडा अशा विविध वन्य प्राण्यांचीही हत्या केली जाईल. श्राद्धसंसंस्कार विषयक समारंभांत बैलाचे मांस खाल्ले जाई. (जोगीराज बसू यांच्या एज् ऑफ ब्राह्मणाज या ग्रंथात ही माहिती दिली आहे.) शतपथ ब्राह्मणात स्पष्ट शब्दांत सांगितले आहे, की 'राजा किंवा ब्राह्मण घरी पाहुणा आल्यास त्या प्रीत्यर्थ बैल किंवा बकरा मारावा.' (राज्ञे वा ब्राह्मणाय वा महोक्शम् वा महाजाम् वा पचेत्). ऎतरेय ब्राह्मणांतही राजा किंवा प्रतिष्ठित गृहस्थ पाहुणा आल्यास बैल वा वंध्या गाय मारावी, असे सांगितले आहे. (मनुष्यराजे आगते न्यास्मिन् वा अर्हती उक्षाणाम् वा वेहतम् ला क्षदन्तः) शतपथ ब्राह्मणाचे एक कर्ते याज्ञवल्क्य म्हणतात - मी गायबैलाचे मांस खातो, पण ते मऊ असेल तरच! शतपथ ब्राह्मणात मांसाशनाची स‌र्वांत चांगले अन्न म्हणून प्रशंसाही केली आहे. (...एतदू परमम् अन्नाद्यम् यन् मांसम्)

आज मांसाहार आणि गोहत्या निषिद्ध मानण्यात येत असले, तरी प्राचीन आर्य-ब्राह्मणांसाठी तो धर्मकृत्यांचा एक भाग होता. सत्ययुगातल्या सोळा श्रेष्ठ राजांपैकी एक असा जो रन्तिदेव, तो अतिथीधर्मासाठी खूपच प्रसिद्ध होता. महाभारतातील वर्णनानुसार त्याच्या पाकशाळेत रोज दोन हजार गायींचा वध होत असे. त्यांची ओली चामडी पाकशाळेत ठेवलेली असत. त्यांतून झिरपणा-या पाण्याचा एक प्रवाह बनून मग त्याची नदी बनली. चर्मामधून उगम पावणारी नदी म्हणून तिला चर्मण्वती नाव पडलं! महाभारतातला तो श्लोक असा आहे -

राज्ञो महानसे पूर्वं रन्तिदेवस्य वै द्विज
आहन्यहनि वध्यते द्वो स‌हस्त्रो गवां तथा
स‌मासं ददतो हन्नं रन्तिदेवस्य नित्यशः
अतुला कीर्तिरभवन्नृपस्य द्विजसत्तम
(वनपर्व, 208/8-10 )

गायींचा वध करणा-या या रन्तिदेवाचं कीर्तिगायन कालिदासाने मेघदूतामध्ये केले आहे.

पुढे साधारणतः बुद्धोत्तरकालात गोमांसवर्जनास सुरूवात झाली. पं. राहुल ‌सांकृत्यायन यांच्या प्रतिपादनानुसार, ब्राह्मण हे बौद्धांना आपले जबरदस्त प्रतिस्पर्धी मानीत असत. बौद्ध गोमांसभक्षक होते. म्हणून मग ब्राह्मणांनी गोमांसवर्जन आणि गोब्राह्मणसंरक्षण यांचा प्रचार सुरू केला. धर्मसूत्रांत विविध प्राण्यांचे मांस निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. दूध देणारी गाय (धेनू, अनु दुहा) व बैल यांचे मांस खाण्याच्या निषेधाने याची सुरूवात झाली आहे.


चटणी-कोशिंबिर...

महाभारत काळात (इसवीसन पूर्व सुमारे 300 वर्षे हा मूळ महाभारताचा काळ असल्याचे मत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मांडले आहे. मात्र महाभारताची संस्करणे लक्षात घेता हा काळ इसवीसनाच्या आठव्या-नवव्या शतकापर्यंत येतो.) वराहाचे आणि हरिणाचे मांस लोकांचे आवडते होते. त्याचबरोबर याकाळी भाज्या, आमट्या, चटण्या, कोशिंबिरी, गोड पदार्थ तयार होत होते. तांदूळ, गहू, ज्वारी, सत्तू इत्यादी धान्ये लोकांच्या खाण्यात होती. उत्तम कंदमूळे, फळे, मध, तूप, स‌ुंठ घालून पक्वान्ने तयार करीत.


मद्यपान

आपल्या पूर्वजांना मद्यपान निषिद्ध नव्हते. ऋग्वेदापासून मद्याचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात सोम हा देव आहे. पण मुळात ते आर्यांचे उत्साहवर्धक पेय आहे. सोमवल्ली नावाच्या वेली कुटून ते केले जाई व कुटण्याची क्रिया ग्राव या कठिण दगडाच्या साह्याने केली जाई असे उल्लेख वारंवार येतात. ऋग्वेदात तर एक ग्रावसुक्त आहे. सोमात दूध घातले जाई. पं. राहुल सांकृत्यायन यांच्या मते सोमात घोडीचे दूध मिस‌ळले जाई. यावरून ते आपण समजतो तसे आधुनिक मद्य नाही. ती भांग होय. हा पदार्थ नित्यसेवनात असे.

पुरुषमेध यज्ञामध्ये तेव्हाच्या स‌र्व कारागिरी व्यवसायांचा एकत्रित उल्लेख आहे. त्यात सुराकार म्हणजे दारू बनविणारा याचाही स‌मावेश आहे.

दुर्गाबाई भागवतांनी सीतेबद्दलही अशीच एक रंजक माहिती दिली आहे. त्या सांगतात, की सीता ही क्षत्रिणी होती, मांसाहारी होती. वनवासाला निघताना सुरूवातीलाच शरयू नदी ओलांडून जायच्या अगोदर तिने तेथील देवीची पूजा केली. तिला सांगितलं, की वनवासातून सुखरूप परत आल्यावर मी स्वतः मांसाचा स्वयंपाक करून तुला नैवेद्य दाखविन आणि मद्य देईन. त्याठिकाणी तो पदार्थ कोणत्या प्राण्याच्या मांसाचा वगैरे काही दिलेले नाही. सीता तांदळापासून मैरेय नावाचे मद्य बनवायची, असाही उल्लेख आहे.

कौटिलिय अर्थशास्त्रात मद्य कसे करायचे याची माहिती दिलेली आहे.


प्राचीनांची पाककला

भीम हा खादाड असल्याचे आपणांस माहित असते. पण तो उत्तम स्वयंपाकीही होता. अज्ञातवासात असताना विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणूनच तो नोकरी करीत होता. (म्हणजे हा तर जगातला पहिला सेलेब्रिटी शेफ!) या भीमाच्या खात्यावर दोन छान पदार्थ जमा आहेत. श्रीखंड कसे करायचे हे त्यानेच शोधून काढले. आज आपण खातो त्या फ्रूट स‌लाडचा शोधही भीमानेच लावला आहे. पण त्याचं फ्रूट सलाड दुधातले नव्हते. दही, साखरेत वेगवेगळी फळे घालून ते केलेले असे. त्याला शिखरिणी असे नाव होते. म्हणजे हे आपले शिकरण!

भीमाप्रमाणे श्रीकृष्णही पाकशास्त्र जाणत होता. त्याने घीवर हा पदार्थ शोधून काढल्याचे सांगितले जाते.

पुराणप्रसिद्ध नलराजा याचे तर पाकशास्त्रावर एक पुस्तकच आहे. तो विविध खाद्यपदार्थ करण्यात पारंगत होता. आपण ज्याला मसाले म्हणतो त्याला तो धातू म्हणतो. पाणी थंडगार कसे ठेवायचे, ते सुवासिक कसे करायचे, पाण्याचा बर्फ कसा करायचा हेही त्याने सांगितले आहे. नलराजा हिमालयाजवळ राहणारा. त्यामुळे त्याने हिमालयावरून बर्फ खाली कसा आणायचा, तो साठवून ठेवायचा कसा हेही सांगितले आहे. या नलराजाची आठवण म्हणून आजही धुंधुरमास केला जातो. (धुंधुरमास म्हणजे पहाटे उठून स्वयंपाक करून सूर्योदयालाच जेवायची पद्धत.)

एकंदर तेव्हाचे पुरूष, एवढेच नव्हे, तर राजे वगैरे लोकही पाककुशल असत. आता पुरुषांनी स्वयंपाक करणे यात काही विशेष नाही. आजही लग्नकार्यासारख्या मोठ्या समारंभात स्वयंपाक करायचा असेल, तर तो पुरुषच करतात.


संदर्भ -
- समाज आणि धर्म - ऋग्वेदकाळ ते पुराणकाळ - जयंत गडकरी, ग्रंथाली, पहिली आवृत्ती - 1989, पाने - 7, 10, 45 ते 47.

- ऎसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे, राजहंस प्रकाशन, नोव्हें. 1999, पाने 151 ते 156.

- वोल्गा ते गंगा - राहुल सांकृत्यायन, लोकवाड्मय गृह, दहावी आवृत्ती 2006, पाने 27, 164, 165, 167.

17 comments:

Anonymous said...

visoba,
tumhi tumachi mate mandat nahi. ya vad-vivadat tumhala kahich mat nahi ka?

tumchya navane search kele asta ek 'let us bhankas' asa blog sapadala. to khapre.org var hota. tohi tumchach ka?

ajachi post bari vatali.
lihit raha.
- sharad purohit.

Anonymous said...

YAAT NAVIN KAAY AAHE?
ITIHAASAACHAARYA RAJWAADE MHANAALE HOTE KI SHIVAAJI MAHAARAAJAANAA BHAVAANI MAATENE TALWAARCH KA DILI? BANDOOK KA NAAHI DILI? TYAA TYAA KAALAAT MAANSE UPLABDHA SAMAGRICHACH VAAPAR KARTAAT.
ARYA KAALAAT TE LOK KAAY THALIPITH AANI LONI KHAANAAR HOTE KA? KI PURANPOLI?MODAK? KI HAKKA NOODLES? MANSAAHAAR KARNAARI MAANSE SHRAM KITI KARIT? HEART, BLOOD PRESSURE CHA TRAAS ASNAARYAANAA DOCTOR TELA-TUPA BAROBARCH MAANSAAHAAR VARJYA KARAAYLAA KA SANGTAAT? KAALAANTARAANE TAYAAR HONAARI SHRADDHA (GAYIBABAT)HI PUSOON TAKNYAAT KAY ARTHA? ITIHAAS MHANJE SHRADDHAA-BHEDACHE SAADHAN HOU DYAAVE KAA? PURVI YAJMAANAANE PAAHUNYAALA AAPLI PATNI SHEJ-SOBAT MHANOON DENYAACHI PRATHAA HOTI. YAAT MAHILEVARCHYA ANYAAYAACHI PALEMULE DISTAAT.PAN TI PRATHAA AAPAN PRAMAAN MAANU SHAKAT NAAHI.ITHHAAS MANDANE TULANENE SOPE AAHE.TYAAVAR BHAASHYA KARANE MAHA KATHIN. TE TAR KARAAYCHE NAAHI ASE TUMHI THARVOON TAAKLE AAHE.SHUDHHA ITIHAASAACHYAA SOVLYAAT TUMHI ASE KITI DIWAS VAAVARNAAR AAHAAT? ITIHAAS GHADVAAYLA KADHI BAAHER PADNAAR AAHAAT? BORU-BAHAADDAR KI MADHALA NISHFAL BORU LAVKAR GALOON PADO YA SHUBHECHHA!

dipak40 said...

tumhi kaay khaataa halli bail kii. undir.baaki undir khaanyaas tumachi kaahi harakat naselch

dipak40 said...

marathit kase lihaayache ithe

Priyabhashini said...

या सर्वांत मीठाचा उल्लेख नाही. आपल्या पूर्वजांना मीठ माहित नव्हते आणि मिरचीही (मिरची तर बरीच नंतर आली. द. अमेरिकेतून) त्यामुळे चटण्या, कोशिंबीरी कसे बनवत असावेत हा प्रश्न आहे. महाभारतकाळी साखरही माहित नसावी.

असो, प्रतिसादांवरील आपली मते आणि प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत.

Anonymous said...

he mhanaje bare aahe. visoba fakt itihas mandato mhanun tyala nav thevnyat kay arth ahe? tyane ase kuthe mhatale ahe ki aajhi tasech vaga mhanun.
pan yevadhe tari kara, ki ugach nak var karun sovalyachya goshti sangu naka. eke kali yach arya-bhat lokani mans-matan khanaryana asprushya tharvile hote.
mi mhanato purviche lok mansahar karit ani daru peet he vachun yevadhya lokanchi mastake ka bare garam zali.
mhane itihasane shraddha modu nayet. ka mhanun? tya yethil bhatanchya soyichya ahet mhanun?
visoba, tumhi tumche kaam chalu theva. ha itihas jyanna mahit nahi tyanna samajala pahije...

.. said...

तुमचा अभ्यास अतिशय दांडगा दिसतोय आणि इतके प्रक्षोभक विषय मांडण्यासाठी हे जे माध्यम निवडले आहे तेही उत्तम.
आपल्या लेखात आर्यांचा उल्लेख आलाय आणि ते भारतीय उपखंडात "आले" असाही उल्लेख आहे. ते इथे "आले" की ते मूळचे इथलेच हा एक बराच विवादात्मक मुद्दा आहे. ते इथे आले म्हणताना तुम्ही कुठल्या पुस्तकांचा आधार घेता आहात? यावर थोडा अजून प्रकाश टाकाल तर बरे होईल कारण हा एक विषय खूप "prejudiced" मतांमुळे झाकोळला गेलाय.
बाकी इकडे पण आगपाखड करणार्‍यांची कमी दिसत नाहीये! :)

. said...

adi,
thanks.
pan ek durusti aahe... maza abhyas kahi tasa dandaga nahi. vachan tevadhe bare ahe itkech.

aryanchya agamanabaddal nakkich yethe nakkich vichar karu ya.

dusari gost mhanaje ya blog cha mul hetu evadhach ahe, ki 'lokpriy' itihasachya palikadehi kahi aste. te pustakatun dadalele aste. te samor yave.
mazi hi bhumika mi suruvatilach mandaleli ahe.
bas yavadhech.
- apala visoba.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

महाभारतात दारूचे उल्लेख आहेत. क्र्ष्ण व अर्जुन दारू पीत असल्याचे उल्लेख आहेत. यादव सगळेच दारूप्रिय होते व दारूमुळेच त्यांचा संहार झाला.
बौद्धधर्मीय हे गोमांसभक्षक होते हे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही. अहिंसा परमो धर्म: हे तत्व प्रतिपादणारा समाज अहिंसकच असणार. त्यांच्या अहिंसेचे हिदुधर्मीयाना आकर्षण वाटू लागल्यामुळे ब्राह्मणसमाजाला हिंसा सोडावी लागली व यद्नयामध्ये धान्य, तूप वगॆरेचा वापर सुरू झाला असणार. जगातील सर्व मानवसमाज शेतीची प्रगती होईपर्यंत मांसभक्षक होते तसेच आपले पूर्वजही होते यात नवल नाही.

Anonymous said...

संत सावता माळी हे ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० चा आहे आणि त्यांनी इ. स. १२९५ मधे देह ठेवला. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे वारकरी होते. सावता माली यांचा प्रसिद्ध अभंग-

कांदा, मुळा, भाजी
अवघी विठाबाई (विठाई) माझी

लसूण, मिरची, कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी

ऊस, गाजर, रताळू
अवघा झालासे गोपाळू

मोट, नाडा, विहीर, दोरी
अवघी व्यापिली पंढरी

सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायी गोविला गळा

मिरची भारतात निदान इ. स. 1200 पूर्वीपासून माहिती असावी.

तुकाराम चिंचणीकर said...

वेदाकाळी लोक काय होते व नव्हते ह्या सर्व आक्षेपांना उत्तर देणारा माझा लेख ! http://pakhandkhandinee.blogspot.in/2015/09/blog-post.html?m=1

वेदांत मांसभक्षणाचा पुसटसा देखील उल्लेख नाही.

तुकाराम चिंचणीकर said...

मननस्मृतीमध्ये मांसभक्षणाचा उल्लेख आहे किॅवा नाही हे खंडण करणारा माझा दुसरा लेख http://pakhandkhandinee.blogspot.in/2015/11/blog-post.html?m=1

तुकाराम चिंचणीकर said...

मधुपर्कात गोमांस किंवा कोणतेही मांस खरेच आहे का ह्या आक्षेपांस उत्तर देणारा माझा लेख ! http://pakhandkhandinee.blogspot.in/2016/05/blog-post_96.html?m=1

Unknown said...

Chinchanikar tumche naav Tukaram nahi he chhatithok pane sangu shakto..

baki tumche blogs vachle, tumche pratiwad avadale.

तुकाराम चिंचणीकर said...

अहो दादा माझे नाव तुकाराम ठेवलं माझ्या आजोबांनी. माझा जन्मच तुकाराम बीजेचा म्हणून तुकाराम ! तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जातच बघायची सवय असल्यावर कसं व्हायचं राव !

असो !

Unknown said...

Whatever stated by you is totally baseless... without having any evidence read Ved once again...

Unknown said...

Yes absolutely right sir