रामायणाविषयी आणखी काही...


'खट्टामिठा'मध्ये रामायणासंबंधीच्या एकूण चार पोस्ट आल्या आहेत. त्यातील पहिल्या पोस्टमध्ये वाल्मीकींनी वर्णिलेला राम आणि लोकमानसात असलेली रामाची प्रतिमा यांत असलेला फरक नोंदविला आहे. त्यानंतर ब-याच काळाने 'मी राम कोण देशीचा?' या तीन पोस्ट लिहिल्या. रा. रा. भास्करराव जाधव यांच्या 'रामायणावर नवा प्रकाश' या पुस्तकातील माहिती त्यात आहे. हे भास्करराव जाधव कोण असा प्रश्न अनेक वाचकांना पडला असणार. तेव्हा ते आधी सांगतो. महात्मा फुल्यांच्या स‌त्यशोधक स‌माजाचे अनुयायी असलेल्या भास्कररावांनी एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. 1895 ते 1921 या काळात त्यांनी करवीर दरबारात सेवा केली. पहिल्या व दुस-या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. ब्राह्मणेतर पक्षाचे ते संस्थापक होत. स‌र्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी वेदांसकट स‌र्व महत्त्वाच्या स‌ंस्कृत ग्रंथांचे परिशिलन केले होते. त्यांचा पिंड ज्ञानोपासकाचा होता.

त्या काळात रामायणाविषयी पंडित, अभ्यासकांमध्ये चाललेल्या वादात भास्करराव जाधव यांनी भाग घेतला. 1934 ते 1936 या कालखंडात त्यांनी ज्ञानमंदिर, महाराष्ट्र शारदा या नियतकालिकांमध्ये लेख लिहून टीकेचे मोहोळ उठविले. रामायणावर नवा प्रकाशमध्ये त्यांच्या या लेखांचेच स‌ंकलन केलेले आहे.

राम हा मूळचा इतिप्तमधला हा निष्कर्ष मल्लादि वेंकटरत्नम यांचा. त्यांच्या ग्रंथाधारे भास्कररावांनी काही लेख लिहिले. ते या ब्लॉगमध्ये अतिशय स‌ंक्षेपाने मांडले आहेत. राम हा मूळचा इजिप्तचा म्हटल्यावर आणि रामेसिसच्या कथेवरूनच रामकथा रचली असे म्हटल्यावर, साहजिकच एक प्रश्न येतो, की मग वाल्मिकी रामायणात जी अन्य पात्रे येतात, उदाहरणार्थ स‌ीता, रावण, हनुमानादि यांचे मूळ कुठले? भास्कररावांनी त्याबाबत त्यांच्या लेखांमध्ये काहीही माहिती दिलेली नाही. त्यासाठी आपणांस मल्लादि वेंकटरत्नम यांच्याकडेच जावे लागेल. (खंत याचीच की अद्याप त्यांचा ग्रंथ काही मला मिळू शकलेला नाही.)

मात्र भास्कररावांनी त्यांच्या लेखांमध्ये रामायणातील वाल्मिकींपासून स‌र्व महत्त्वाच्या पात्रांविषयी स‌ंशोधनात्मक लिहिलेले आहे. तेव्हा त्यांचा ग्रंथ मुळातूनच वाचावयास हवा.

मूळात रामायण या महाकाव्याचेच अनेक पाठभेद, रामाच्या वेगवेगळ्या कथा आपल्याकडे आहेत. म्हणजे वाल्मीकींचे रामायण हे तर झालेच. पण स‌ंस्कृतमध्ये आनंद रामायण, अद् भुत रामायण, अध्यात्म रामायण इत्यादि रामायणे आहेत. रघुवंश, प्रसन्नराघव, उत्तर रामचरित अशी काव्ये आहेत. महाभारतात रामकथा आहे. हरिवंश, भागवत यामध्येही काहीशा फरकाने ती आहे. तुलसीदासाचे रामायण आहेच. जैन आणि बौद्धांचीही वेगळी रामायणे आहेत.

या स‌र्व रामकथा आहेत, त्यांचा आशय जरी सारखा असला, तरी तपशीलांत मात्र त्या खूप वेगवेगळ्या असल्याचे दिसते. त्यातही स‌ीता आणि रावण यांच्या स‌ंबंधांबाबत खूपच भिन्न माहिती मिळते. वाल्मीकी रामायणानुसार स‌ीता ही जनकाची कन्या. जनकाला ती जमीन नांगरत असताना सापडली. परंतु महाभारतातल्या रामकथेत ती जनकात्मजा म्हणजे जनकाची औरस कन्या असे म्हटले आहे. काश्मीरी रामायण, खोतानी रामायण या ग्रंथात ती रावणाची कन्या आहे. शेट लालचंद हिराचंद यांनी लिहिलेल्या 'वाल्मिकी रामायण - एक स्वतंत्र विचार' या पुस्तकातही ती रावणाची कन्या असल्याचे मत मांडले आहे. आनंद रामायण व भावार्थ रामायणात ती अग्निसंभवा असल्याचे म्हटले आहे. तर दशरथजातक आणि जावा-सुमात्रामधील रामायणे ती दशरथकन्या असल्याचे सांगतात.

भास्कररावांनी त्यांच्या स‌ंशोधनासाठी वाल्मिकी रामायण हा ग्रंथ आधारभूत मानलेला आहे. मात्र आधुनिक विद्वानांच्या मते वाल्मीकी रामायण प्रथम पाच कांडांचे म्हणजे अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंतचे होते. बालकांड व उत्तरकांड ही नंतरची भर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या रिडल्स ऑफ राम वरून मोठा वाद झाला होता. वास्तविक त्यावरून वाद होण्याचे काही कारण नव्हते. कारण त्यात त्यांनी रामाबद्दल जे काही लिहिले होते, त्याचा आधार बहुतांशी उत्तरकांडच होते. पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचे 'द रामायण - ए ट्रू रिडिंग' हे अतिशय वादग्रस्त पुस्तक. त्याचा आधारही वाल्मीकी रामायणच आहे. यातून त्यांनी काढलेले निष्कर्ष भाविक, श्रद्धाळू मनास निश्चितच धक्कादायक आहेत. कारण वाल्मीकी रामायणच धक्कादायक आहे.

ज्यांना असा धक्का स‌हन होणार नाही, त्यांच्यासाठी मग 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन' सारखी पुस्तके आहेतच. 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन'मध्ये पांडुरंगशास्त्री आठवलेंनी वाल्मीकींनाही अभिप्रेत नसलेला राम आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यांच्या रामायणाच्या वाचनानुसार -
"रामकाळात प्रजेला मत द्यावयाचा अधिकार होता.... अर्थव्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी जातीव्यवस्था रामराज्याने मान्य केली होती.... स‌र्व लोक देवासमान होते. स‌र्व लोक स‌ज्जन होते... रामायणात स्त्रियांची अवस्था उत्कृष्ट होती... ब्राह्मण रामराज्याचे आधारस्तंभ होते... " खरंतर पांडुरंगशास्त्रींच्या मते रामायणात वाईट असे काही व कोणी नव्हतेच. अगदी कौसल्यासुद्धा. (वास्तविक पांडुरंगशास्त्रींचे या पुस्तकाचा हेतू त्यांना अभिप्रेत असलेल्या जातीसंस्थात्मक व्यवस्थेची, वर्णव्यवस्थेची आवश्यकता प्रतिपादीत करणे हाच आहे. पण तो मुद्दा वेगळा.)


तर हे म्हणजे एकदम भास्कररावांच्या उलट झाले.
एकंदरच रामकथेची अशी अवघीच गंमत आहे. पुढे मागे त्याबाबत लिहिणे होईलच...


------------------------------------------------------------
वाचन शिफारस -
- रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य स‌ंस्कृती मंडळ, मुंबई, पाने - 340, किं. 145 रू.
- वाल्मीकी रामायण - एक स्वतंत्र विचार - लालचंद हिराचंद, मँजेस्टिक प्रकाशन, गिरगाव, मुंबई, पाने 72, किं. 45 रु.
- महात्मा रावण - डॉ. वि. भि. कोलते, स‌ुगावा प्रकाशन, पुणे, पाने - 16, किं. 10 रू.
- श्री वाल्मीकी रामायण-दर्शन - पांडुरंगशास्त्री आठवले, स‌द्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई, पाने - 218, किं. 10 रु.
- The Ramayan (A True Reading) - Periyar E. V. Ramasami, Dravidar Kazhagam Publications, Chennai, Pages - 58, Donation 30 Rs.
- Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 4 - Compiled by Vasant Moon, Education Department, Gov. of Mah., Pages - 360, Price - 35 Rs.
- www.valmikiramayan.net

8 comments:

Unknown said...

I've been reading your posts on Ramayan and I find them quite interesting. Thanks for sharing this info with us.

Vishal

Anonymous said...

मी तुमच्या अनुदिनी मधील सगळे मजकूर वाचून काढले. मला सांगा हे सगळे ऐतिहासिक कथा, गोष्टी याला काही पुरावा आहे काय? तसेच आपण जे म्हणतो ते स्कंद पुरण , भागवत, हरिपाठ, वेद, संतांच्या ओव्या अभंग, लीळाचरित्र म्हणजे सगळेच आता या क्षणाला कोठे उपलब्ध आहे काय? म्हणजे ते शाषनाने जतन करून ठेवले आहे काय? तसेच तुम्ही अनिता पाटील (http://anita-patil.blogspot.in/) यांची अनुदिनी तुम्ही तिघांनी वाचल काय? तुम्ही जे लिहिता त्याच्या बरोबर उलट ती लिहून सर्व ब्राह्मण लोकांवर खूप घाणेरडे आरोप करीत आहे.
Pramod

Anonymous said...

exactly anita patil wrote so much dirty about bramhin. im nt a bramhin prson bt its rediculs to hate some cast like this. anyways ur blog is really very informative





Vinayak yadav said...

Manuski mhanaje kay

Vinayak yadav said...

apan swataha kiti pustak lihili ahet, ki dusryanich ka lihili te sanganar ahe

Vinayak yadav said...

Ramayan amachi shradhha ahe,
Engrajanchya chatyano khabardar

mohan. ancur. @gmail. said...

रामायणाबद्दल थोडा वेगळा विचार करायला हरकत नाही. विंध्य पर्वताच्या उत्तरेस आर्य व दक्षिणेस रावणाचे म्हणजे मूळ भारतीयांचे राज्य अशी विभागणी असल्याने आर्यांनी विंध्य ओलांडून दंडकारण्यात यायला प्रारंभ केला. दक्षिणेस यज्ञ मुळातच नवा असल्याने रावणाच्या राज्यातील दंडकारण्यातील आदिवासीनी यज्ञात विघ्न आणण्यास प्रारंभ केला. वाली व सुग्रीव यासारख्या बलाढ्य राजांचे राज्य दंडकारण्यात होतेच. अशा वेळी वनवासात जाण्यासाठी राम विंध्य ओलांडून दंडकारण्यात आला. त्याचा हेतू यज्ञ करणा-याना संरक्षण द्यावे असा असावा. त्याला त्याच्या राज्यात परत पाठवावे या हेतूने रावणाने त्यवेळी असलेल्या पद्धतीप्रमाणे सीतेस आपल्या ताब्यात ठेवले. सीतेवर रावणाने अत्याचार कधीच केले नाहीत. रावणाच्या विरोधकाना सुद्धा हे मान्य आहे. रामाने दंडकारण्यातील सुग्रीवाच्या मदतीने रावणावर आक्रमण केले. वाली सुग्रीव ही माकडे नव्हती. काहीं आदिवासीमध्ये तोंडावर मुखवटा घालून युद्ध करण्याची पद्धत अजूनही आहे. त्याप्रमाणे माकडासारखा मुखवटा घालून त्यांच्या सहाय्याने बिभिषणास मदतीस घेऊन रावणाचा पराभव झाला. रामायणाचा काळ सात हजार वर्षापूर्वीचा आहे. त्याकाळी ओहोटीस सध्याचा अ‍ॅडम्स ब्रिज उघडा पडत असावा. त्यावरून श्रीलंकेस सैन्य गेल्याने रावणाचा पराभव झाला असल्याची शक्यता आहे. हनुमान हा वाटाड्या अत्यंत हुषार व दोन्ही भाषा बोलणारा वकील या नात्याने रामास मदत करीत होता. आकाशमार्ग, संजीवनी अशा बाबी वजा केल्या तर एका समूहाने दुस-या समूहाबरोबर केलेले सांस्कृतिक युद्ध एवढा अर्थ रामायणातून निघतो.

Unknown said...

विसुभाऊ , सडक्या मेंदूची दाद द्यावयास पाहिजे. अजून किती दुर्गंधी पसरवाल .