राम - आपला आणि वाल्मिकींचा

लोकांच्या, आपल्या दृष्टीकोनातून राम हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. तो सर्वगुणसंपन्न आहे, मातृपितृभक्ती, पितृप्रेम,

बंधुप्रेम, शौर्य, न्यायबुद्धी आदी सर्व बाबतीत राम म्हणजे एक आदर्श आहे. तो मर्यादा पुरूषोत्तम आहे, एकपत्नीव्रती, एकवचनी, एकबाणी आहे. तो प्रजाहीतदक्ष, थोर न्यायी राजा आहे. आपला राम आपल्यासाठी भगवान आहे. पण रामायणकर्त्या वाल्मिकींचा राम कसा आहे? वाल्मिकींनी रामाचे जे चरित्र सांगितले आहे, ते खरोखरच आश्‍चर्यजनक ठरणारं आहे. कारण त्यांच्या आणि आपल्या रामात खूप खूप अंतर आहे.

ते कसं?

दशरथाने रामाला वनवासात धाडण्याचा आपला निर्णय सांगितल्यानंतर वाल्मिकींचा राम लक्ष्मणाला म्हणतो, ""जी व्यक्ती सदोदित आपल्याच इच्छांचे पालन करीत आहे, तिला एखादा मूर्ख तरी वनात पाठविल काय?''
इथं आपल्या पितृभक्त रामाने दशरथाला "मूर्ख' म्हटलेलं आहे. कैकेयी दशरथाची हत्या करील अशी भीतीही वाल्मिकींच्या रामाने एका ठिकाणी व्यक्त केली आहे.
रामाचं बंधुप्रेम असं, की "मी वनवासावरून परत येईपर्यंत तुम्हीच राजगादी सांभाळा. तिच्यावर दुसऱ्या कोणाला बसू देऊ नका,'" असं त्यानं दशरथाला सुचविलं होतं. (अरण्यकांड-34) दुर्दैवानं राम वनवासाला निघाला, त्याच दिवशी दशरथाचा मृत्यु झाला.

रामाला वनवासाला जाताना सीतेला बरोबर न्यायची इच्छा नव्हती. हे त्याचं पत्नीप्रेम समजायचं, तर त्यावेळी तो तिला सांगतो, की "तू जपून राहा. विशेषतः शत्रुघ्न आणि भरताकडे भ्रातृभावाने पाहा किंवा वत्सलपणे पाहा. भरताची मर्जी राखून राहा.'
यात गैर काय आहे, असं कोणी म्हणेल, पण दिरांनी भावजयीला भावामागे पत्नी म्हणून स्वीकारणे किंवा वडिल भावाच्या पत्नीकडं इतरांनीही त्याच भावनेने पाहणं, या प्रथा अस्तित्वात असणाऱ्या भूमीत रामकथा जन्मली आहे, हे लक्षात घेतलं, की भरताची मर्जी राखून राहा या रामाच्या उपदेशाचा अर्थ लागतो. ही अतिशयोक्ती म्हणायची किंवा इथं ओढून-ताणून तसा अर्थ लावण्यात आला आहे, असं म्हणायचं तर रावणवधानंतर स्वतः रामाने सीतेला अगदी स्पष्ट शब्दांत हेच सुचविलं आहे. त्यावेळी हा राम सीतेला म्हणाला होता ः ""हा संग्राम मी तुजसाठी केला नाही. मी तो स्वतःवरचा कलंक टाळण्यासाठी केला.... तुझा स्वीकार आता कोणता शीलवान पुरूष करील? तू वर्षभर परपुरूषाकडे राहिली आहेस. आता तुला दहा दिशा मोकळ्या आहेत... आता तू इच्छा असेल, तर लक्ष्मणाकडे जा किंवा भरताकडे जा. शत्रुघ्न, सुग्रीव किंवा बिभिषण यांच्याजवळ राहावेसे वाटले तर त्यांच्यापाशी राहा.''

म्हणजे सीतेची काहीही चूक नसताना, रामाला तिच्याबद्दल संशय होता. सीता या रामाला चांगलीच ओळखून अशली पाहिजे. म्हणूनच तो जेव्हा "भरताची मर्जी राख' असे सांगतो तेव्हा ती अत्यंत संतापून त्याला "स्त्रैण', "शैलूष' म्हणजे "बायल्या' अशी विशेषणे वापरते. ""भरताची मर्जी राख असे सांगणारा आपला नवरा बाईच्या जीवावर जगणाऱ्या अधम पुरूषासारखा वागतो आहे,'' (अयोध्याकांड - 30) असे त्यावेळी सीता तीव्र संतापाने म्हणते.

वाल्मिकींच्या रामाने वालीची हत्या तर झाडाआड लपून केली आहे. अगदी योजनाबद्ध कट रचून केलेली हत्या असं त्या हत्येचं स्वरूप होतं.

रावणवधानंतर राम अयोध्येचा राजा झाला. पण त्यानंतर त्याने स्वतः असा राज्यकारभार केलाच नाही. सकाळपासून दुपारपर्यंत वाल्मिकींच्या रामाची पूजाअर्चा व अन्य कर्मकांडे चालत आणि त्यानंतरचा काल तो कधी विदूषक तर कधी जनान्यात व्यतीत करीत असे, (उत्तरकांड -43.1) असं स्वतः वाल्मिकींनीच नमूद करून ठेवलेलं आहे. त्यांचा राम मद्यही पीत असे. (उत्तरकांड-42.8)

एकूण काय, तर आपला आणि वाल्मिकींचा राम यात खूपच फरक आहे. खरं तर हे सगळं स्पष्टपणे नमूद करून वाल्मिकींनी आपल्या रामाची बदनामीच केली आहे! कोणी आजपर्यंत त्यांच्याविरूद्ध निषेधमोर्चा कसा काढला नाही, हे एक कोडंच म्हणायचं!

संदर्भ ः
द रामायण - ए ट्रू रिडिंग ः पेरियार ई. व्ही. रामस्वामी (अधिक स‌ंदर्भासाठी पाहा - http://en.wikipedia.org/wiki/E._V._Ramasami_Naicker)
डॉ. बाबासाहोब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस - खंड 4 - संपादन - वसंत मून
सीतेची शोकांतिका ः अरुणा ढेरे, लेख - सा. सकाळ दिवाळी अंक "94

7 comments:

सर्किट said...

जबरदस्त! हे असलं सत्य पचवण्यापेक्षा आहेत त्या समजुती कायम ठेवून जगणं जास्त सोपं आणि समाजासाठीही फ़ायदेशीर आहे, नाही कां? :)

A woman from India said...

आपला राम हा बुधकौशिक ऋषिंच्या रामरक्षेशी मिळता-जुळता आहे असे वाटते.
अर्थात रामरक्षा हे एकेकाळचे बालगीत असावे वाटते. कारण त्यात शरिराच्या प्रमुख अवयवांची नावे, डावी, उजवी, समोर अशा बाजुंचे वर्णन आढळते.लहान मुलांना आपण असंच शिकवतो नाही का?(यावर आपले काय मत आहे?)
तसेच तुलसी रामायणाचाही जनमानसावार फार मोठा प्रभाव आहे.

Unknown said...

Ram hi vyakti nasun to jaganyacha adarsha ahe
va apala ram sadhya jasa ahe tasa rahane apalyasathi va sarva bhartiyansathi fayadeshir ahe


mag ase satya baher lokat nahi pasarale tar uttamacha ahe

Krish said...

Utterkand Valmikini lihala hota whya re thombya ??
dagda , mahit nahi kahi ani chalala pandit banayala

Krish said...

लहान मुलांना आपण असंच शिकवतो नाही का?(यावर आपले काय मत आहे?)

___
dokyawar parinaam zala aahe tuzya :D ramrakshecha khara naav "vajrapanjar kavacha" aahe. uchal devi kavach nahitar hanumaan kavach tyat suddha aangachi naave yetat . pratek aagawar devi shaktichi sthapana keli jaate . kaay te doka ani kay ti aakkal . kon pan uthato ani blog banwat basato aaj kaal :p

Unknown said...

कावळ्याची नजर नेहेमी गुवावर

Unknown said...

कावळ्याची नजर नेहेमी गुवावर