"सुखकर्ता दुःखहर्ता' हे गणपतीचे आजचे रूप. त्याला धर्मशास्त्राने अग्रपूजेचा मान दिलेला आहे. म्हणजे गणपती ही शुभंकर देवता मानण्यात आली आहे. त्याचे हे रूप पाहूनच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले.
प्रश्न असा आहे, की गणपतीचे आजचे हे जे रूप आहे, ते मुळातूनच तसे होते, की शेंदराच्या पुटांप्रमाणे त्याच्यावरही ही "सुखकर्ता दुःखहर्ता'ची पुटे चढविण्यात आली आहेत. दैवतशास्त्रानुसार तरी ते तसेच आहे. म्हणजे हे शास्त्र असे मानते, की गणपती ही देवता यक्षश्रेणीतून उत्क्रांत झाली आहे. यक्ष हे अत्यंत क्रूर असत. माणसांना झपाटणे, त्यांच्या कार्यात विघ्ने आणणे, ती आणू नयेत म्हणून माणसांकडून बली घेणे, माणसांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना आपली पूजा करायला लावणे ही या यक्षांची स्वभाववैशिष्ट्ये. त्यांचे रूपही पाहण्यासारखे आहे. सुटलेले पोट, बेडौल शरीर, माणसाचे शरीर आणि प्राण्याचे शीर ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. गणपतीचे रूप असेच क्रूर आणि स्वभाव विघ्नसंतोषी होता. म्हणून तर गणेश, वि-नायक, विघ्नेश, विघ्नविनायक ही त्याची नावे आहेत. त्याने मंगलकार्यात विघ्न आणू नये म्हणून कार्यारंभी त्याची पूजा करून त्याला संतुष्ट करीत. या पूजेला "विनायकशांती' म्हणत.
पुराणांतून गणेशजन्माच्या विविध कथा सांगितलेल्या आहेत. त्या कथा नीट पाहिल्या तर त्यातूनही गणपतीचे अमंगल रूपच स्पष्ट होते. काही कथांत तो पार्वतीच्या शरीराच्या मळापासून झाल्याचे सांगितलेले आहे. काही कथांमध्ये तो पार्वतीच्या मासिक स्त्रावापासून किंवा त्यातून जन्मला आणि म्हणून रक्तवर्ण झाला, असे म्हटलेले आहे.
असा हा गणपती "स्तेनानां पतिः', मूषकराज म्हणजे चोरांचा प्रमुख आहे. दक्षिण भारतात अनेक भागांमध्ये तो जारण-मारण (भूत-भानामती) या क्रियांसाठी पूजला जातो.
गणपतीची आणखीही एक गंमत आहे. आपण मंगळ हा क्रूर ग्रह मानतो. तो पृथ्वीचा पुत्र आहे असेही मानतो. मंगळाचा रंगही लाल आहे. आता पृथ्वी आणि पार्वती एकरूप आहे. म्हणूनच गणेश आणि मंगल यांचा संबंध आहे. कसा, तर दोघेही पृथ्वी म्हणजेच पार्वतीचे पुत्र. आता गणपतीच्या पूजेत, उपासनेत मंगळवारचे एवढे महत्त्व का ते आले ना लक्षात? मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका किंवा अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारक म्हणजेच मंगळ. या सर्व गोष्टी गणपतीच्या क्रूर रूपाकडेच निर्देश करणाऱ्या आहेत.
तर गणपती मूळचा असा असताना त्याला आजचे सोज्वळ रूप कसे प्राप्त झाले? याचे असे उत्तर देण्यात येते, की भीतीच्या भावनेतून ईश्वरपूजन केले जावे हे समाजधुरीण आणि संतमंडळींना मान्य नव्हते. पण लोकांच्या मनावर या क्रूर देवतांचा जो प्रभाव होता तोही त्यांना दूर करता येत नव्हता. मग त्यांनी काय केले, तर या क्रूर देवतांचे उन्नयन केले. त्यातून गणपतीला आजचे हे "सुखकर्ता-दुःखहर्ता' रूप प्राप्त झाले.
(संदर्भ ः अ. द. मराठे यांचा लेख, मैफल पुरवणी, महाराष्ट्र टाइम्स, 15 सप्टें. 1996)
13 comments:
बरीच खळबळजनक माहिती आहे - पण तशी ती तुमच्या इतर पोस्टस मध्येही आहेच. संदर्भांसकट लेख लिहीलेत हे फ़ारच छान केलंत.
chan mahiti hai kadi asa vichar kela navta ganpatibaddal
pan ase asu pan shakte
This series of articles contain spiritually scientific information about Lord Ganesh
http://www.hindujagruti.org/hinduism/knowledge/category/ganapati
यातले काहीच माहिती नवते !!!फार फार छान
hi mahiti aatanty khoti aahe aapnas jar smaj nasel thr krupa karoon ganeshala badnaam karnacha prayatna karo naye khoti prasiddhi melvna karita kelela ha khatatop bgun ya shudra mansachi keev karavashi vatthe.Ganpati yala sadbuddhi devo hich ganrayacha charni prarthna.
Ganpati Bappa Morya.
ya jawai shodh kadhnara koan maha murkh asel te mahit nahi .. pan ethe loak shivaji maharajanbaddal pan waeet lihitaat aani chukiche purave dakhawtaat .. tar ashya babtit Ganpati baddal ase chukiche lihayala far awghad nahi .. marathe sahebani changala publiciti stunt kela 1996 madhye aani tumhi asech karun 2011 madhye prasiddhi milawu pahata ...
durdaiv hech ki aapan loakach aaplya devala badnaam karayla pudhe asato ..
atishay gharedi prawrutti aahe
काही कथांमध्ये तो पार्वतीच्या मासिक स्त्रावापासून किंवा त्यातून जन्मला आणि म्हणून रक्तवर्ण झाला, असे म्हटलेले आहे. <<<
मासिक स्त्रावात अमंगल काय? आईच्या पोटात ९ महिने काढून जन्माला आलेले तुम्ही आम्ही सगळेच त्यावर पोसून जन्माला आलो आहोत.
चलता है, दुनिया है !
श्री शालिवाहन शके १९३४, नंदननाम संवत्सर ( चैत्री २०३९, कार्तिकी २००८ ) निज भाद्रपद शुल्लपक्ष, अयनांश २४/०२/२०. दिनांक १९ सप्टेंबर, २०१२ ला ज्या देवाणे ही सृष्टी र्निमाण केली आहे त्या देवा पैकी एक श्री शंकराच्या पत्नी ज्या अंगरक्षणासाठी निर्माण केल्या गेलेल्या चौसष्ट योगिणी,अष्टसिध्दिना चार विभागात विभागुण त्याच्या दोन सिध्दि म्हणजेच उजवी सिध्दि व डावी रिध्दि, व चौसष्ट योगिणीचा एक रुप मह्णजे एक अवलोकिक शक्ति आपल्या स्वरक्षणासाठी निर्माण केली गेली. ब्रम्हाचे काम म्हणजे विश्वाची निर्मिती, विष्णूचे कामे म्हणजे निर्मितीला चालणा देने व विश्वचक्रामधिल झालेले अव्यवस्थित काम सुव्यवस्थित पणे चालु ठेवणे, तसेच श्री शकराचे काम म्हणेजे अतिरेक्त झालेल्या व जिवाणा ह्या विश्वातुन बाहरे काढणे, तसेच आर्शिवाद देणे, श्री विष्णूनि वेगवेगळे दाह अवतार घेतले आहेत, त्यातून अनेकाना मार्गदर्शन करुन त्यांना ह्या सुष्टीला जिवदान मिळवून दिले आहे. आता त्या विष्णू समोर एक मोठे आव्हान आहे ते म्हणजे चौसष्ट योगीणी व कला, अष्टसिध्दि, ह्या सर्वगोष्टीनी मिळवून एक माहन शक्ति ची निर्मिती ह्या जगात श्री शंकराच्या पत्नी पार्वतीने उभी केली आहे. जर ह्या शक्तिने ह्या विश्वाला आव्हान केले तर काही आपल्या विश्वाचे खरे नाही. part two in next day...
jE AIKAV TE NAVALACH !
Murtipujecha itihas barach ranjak aahe. Takshashilepasun jo dharma jagabhar pasarala tyacha aekahi vicharvantane vichar kela nahi tyamule jagatik itihasat barach gondhal zalela aahe. Anek vidvan taxashilela yeun shikun gele parashi dharmacha sansthapak zoraster jyuncha moses va yesu he taxashiles yeunach shikale. taxashila nashta zalyane anekanna taxashila sanskrutichi mhanaje brahamananchya sanskrutichi khari olakha koni karun deyilka ?
Jeetendra Sonawane said... Bramha Nirmata,Vishnu Palankarta ani Shiv nashtakarta, Bramha putra Kali upadrav karta, ani apan janma gheun jivantpani jaatibhed, dharmabhed anchewar aadharlelya samajvevastha anusar jivan jagtana watel te haal apeshta sahan karaycha fakta Bramha-Vishnu ani Mahesh ya tighaancha full to timepass honyasathi?
गणपती हा देव आहे पण तो क्रूर नाही आहे तुमचा लेख मला अजिबात पटला नाही
जाहिर निषेध😠😠😠😠😠😠😠
Post a Comment