झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची सत्यकथा

इ. स. 1857 मध्ये भारतातील काही असंतुष्ट संस्थानिक आणि इंग्रज सेनेतील असंतुष्ट सैनिकांनी कंपनी सरकारविरूद्ध बंडाचं निशाण फडकावलं. "शिपायांचं बंड' म्हणून ते ओळखलं जातं. त्या युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने मोठा पराक्रम गाजवला आणि अखेरीस ती शूर स्त्री धारातिर्थी पडली. इंग्रजांनी तिचं संस्थान खालसा केलं, त्यावेळी ती बाणेदारपणे उद्‌गारली होती - ""मेरी झॉंसी नहीं दूँगी!''

1857च्या या बंडला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यात भाग घेणारे सर्वजण स्वातंत्र्ययोद्धे ठरले आहेत. खरं तर त्या बंडाकडे पाहण्याची ही दृष्टीच सदोष आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा त्या कालखंडातला व्यवहार पाहता हेच स्पष्ट होईल, की ही बाई शूर होती. पराक्रमी होती. पण आजच्य अर्थाने ती राष्ट्रभक्त नव्हती. तिला फक्त तिची सत्ता आणि तिचं संस्थान हवं होतं.

पहिल्या बाजीराव पेशव्याने छत्रसालास जी मदत केली, त्याबद्दल छत्रसालाकडून बाजीरावास बुंदेलखंड मिळाला. त्यातील त्यावेळी नेवाळकर घराण्याला मिळालेली जहागिरी म्हणजे झाशी. 1835 मध्ये या घराण्याचा अधिपती रामचंद्रराव याला, संस्थानाने दरवेळी इंग्रजांना जी मदत केली तिचा मोबदला म्हणून "महाराजाधिराज फिदवी बादशहा - जमाइंग्लिश्‍तान' ही पदवी मिळाली व झाशी एक संस्थान बनले.

लक्ष्मीबाईचा पती गंगाधरराव हा इंग्रजांच्या मेहेरबानीने संस्थानाधिपती झाला होता. 1843 साली त्याला राजेपदाचे हक्क मिळाले. लक्ष्मीबाई ही त्याची दुसरी पत्नी. विवाहसमयी तिचं वय 11-12 वर्षांचं होतं आणि मृत्युसमयी (1858) तिचं वय फार तर 23-24 वर्षांचं होतं.

गंगाधरराव 1853 साली वारला. त्यानंतर लक्ष्मीबाईने आपला दत्तक पूत्र दामोदर याला झाशीचा वारसा मिळावा यासाठी कसून प्रयत्न केला. या प्रसंगीचा तिचा मुख्य मुद्दा वंशपरंपरेने आपलं संस्थान इंग्रजांशी किती एकनिष्ठ राहिलं, आपापसात किती प्रेमाचे संबंध राहात आले, यावर बोट ठेवणं हा होता. परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि 1854 साली इंग्रजांनी तिला 60 हजाराचा तनखा मंजूर करून संस्थान खालसा केलं. त्यावेळी तिने ते तिचे ते "मेरी झॉंसी नहीं दूँगी!' हे प्रसिद्ध उद्‌गार काढले असं सांगण्यात येत असलं, तरी त्यावेळी मात्र तिने मुकाट्याने किल्ला खाली करून गावात राहणं पत्करलं. पुढं 57 सालापर्यंत गडबड न करता, अर्ज-विनंत्या-तक्रारी या चक्रात ती फिरत होती. प्रथम तिने पेन्शन नाकारलं. नंतर नाईलाजाने स्वीकारलं.

6 जून 1857 रोजी झाशीचा उठाव झाला आणि लक्ष्मीबाईने झाशीचा कारभार ताब्यात घेतला. पण नंतर तिने या घटनेसंबंधी इंग्रजांना स्पष्टिकरण दिलं आणि मग कमिशनरच्या हुकुमान्वये ती इंग्रजांच्या वतीने झाशीची कारभारीण बनली. फेब्रुवारी 1858 पर्यंत तिने इंग्रजांच्यासंबंधीचं मित्रत्त्वाचं धोरण बदललं नव्हतं असं मानण्यास जागा आहे. मार्चमध्ये इंग्रजी फौजांनी झाशीकडे कूच केलं. त्यावेळीही लक्ष्मीबाईने आपलं म्हणणं इंग्रजांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी ज्यावेळी तिच्यासमोर निश्‍चित स्वरुपात अशी वस्तुस्थिती उभी राहिली की झाशी संस्थान परत मिळणार नाही. इंग्रजांचा आपल्यावर विश्‍वास नाही. त्यांना शरण जाऊन मानहानीकारक जिणं जगावं किंवा फासावर चढावं हा एक मार्ग; किंवा लढून विजय प्रस्थापित करावा अगर हौतात्म्य पत्करावं हा दुसरा मार्ग, त्यावेळी तिने दुसरा मार्ग स्वीकारला आणि इथून पुढं तिने अतिशय शौर्याने लढा दिला.

संदर्भ -
परिचय - नरहर कुरुंदकर, इंद्रायणी साहित्य, 1987, पा. 117-118.

17 comments:

Dhananjay said...

Mee Kurundkarancha chahata ahe. Tyanchi 4-5 pustake wachali ahet. Kurundkaranchi ankhi pustake havi aslyas kuthun milatil he sangu shakal kaay? Any library/book shop link would be helpful. Thanks.

. said...

धनंजयजी,
तुम्ही गुरूजींचे चाहते आहात हे वाचून खूप बरं वाटलं. त्यांची अनेक पुस्तकं पुण्याच्या इंद्रायणी स‌ाहित्य - (OMKARESHWAR MANDIR CHOWK, TILAK ROAD PUNE
411030 MAHARASHTRA t: 24458598) या प्रकाशनस‌ंस्थेने प्रसिद्ध केली आहेत.

Majestic Book Stall
J. Shankar Sheth Road
Khetwadi
Mumbai - 400004
Landmark: Near Girgaum Church
Phone: 022-23882244

या पत्त्यावरही त्यांची पुस्तके मिळू शकतील.

सर्किट said...

मला वाटतं हे पोस्ट कथानायिकेवर जरा अन्याय करणारं आहे.

प्रत्येक व्यक्तिचा स्वभाव हा अनुभवांतून बदलत इव्हॉल्व्ह होत असतो. तो स्वभाव पूर्वी कसा होता हे पाहून नाक मुरडून बदललेल्या नव्या व्यक्तीला कमी लेखणं पटत नाही.

उदाहरणार्थ :
सत्याचे प्रयोग सुरु करण्यापूर्वी बापूजींनी लहानपणी चोरी केली होती, आणि खोटंही बोलले होते. त्यांना अफ़्रिकेत रेल्वेतून ढकलून दिल्यानंतर ते गुमान सामान उचलून घरी गेले होते, तिथेच रेल्वे-स्थानकावर त्यांनी सत्याग्रह सुरु केल्याचे ऐकिवात तरी नाही. भारतातल्या गरिबांची दैना पाहून त्यांनी अनावश्यक वस्त्रे त्यागून फ़क्त पंचा वापरायला सुरुवात केली वयाच्या ३५/३७ व्या वर्षी. पण म्हणून, गांधीजी महान नव्हतेच काही, ते तर अनुक्रमे चोर, खोटारडे, भित्रे, आणि (वयाच्या ३५ व्या वर्षीपर्यंत) तिकडे गरीब खितपत पडलेले असताना हे मात्र खुश्शाल सूटाबुटात फ़िरणारे होते - असं आपण म्हणतो का कधी?

उदाहरण दुसरे : सुमारे ५० खून, आणि २५० अटेम्प्टेड-मर्डर, आणि त्याहून जास्त दरोडे आणि लुबाडणुकीचे आरोप असलेल्या वाल्मिकींना कायद्याच्या कचाट्यात आणण्या ऐवजी राजे रामचंद्र यांनी त्यांच्याशी प्रेमाचे घरघुती संबंध ठेवले. त्यांची पत्नी आणि २ मुले तर तिच्या माहेरी गेल्यासारखे तिथे जाऊन रहायचे. वाल्मिकींनी राजांवर कौतुकांचा वर्षाव करणारी महाकविता लिहीली, म्हणून त्यांच्या पापकॄत्यांकडे डोळेझाक करण्यात आली असा दाट संशय आहे! - हे ऐकायला कसं वाटतं?

वयाच्या १२ व्या वर्षी लग्न होवून, २०/२२ व्या वर्षी विधवा झालेल्या मुलीला कितीसं कळत असेल? स्वार्थ आणि स्वसंरक्षण हे निसर्गाने दिलेले गुण (बरं, अवगुण म्हणा पाहिजे तर) आहेत. तिने लग्न केलं, राणी झाली. नवरा गेला, मुलाला, राज्याला सांभाळायचा प्रयत्न केला.

गेल्या ६० वर्षांपासून हॉकी हा राष्ट्रीय खेळ असताना एखाद्या ’चक दे’ ने स्टिम्युलेट केल्याशिवाय आपल्याला हॉकीची स्टिक खेळण्यासाठी हातात घ्यावीशी वाटली नव्हती कधी. तसंच १८५७ च्या बंडाने राणीतला स्वाभिमान आणि देशप्रेम, कदाचित झालेल्या अपमानाच्या सूडाची भावना जागी केली, आणि ती लढली! मरेपर्यंत लढली.

तिच्या वयाच्या मानाने तिला आलेली समज, आणि स्वभावात झालेला बदल हे सारं तर बापूजी आणि वाल्मिकी यांच्यापेक्षा जलदगतीने झालं होतं.

पोस्टच्या शेवटच्या २ वाक्यात तुम्ही तिचं कौतुक केलंयत ते योग्यच, पण त्या आधी लिहीलेलं वर्णन तिला नाहक कमी लेखणारं आहे, असं वाटतं.

(शांत डोक्याने, आणि हिंदू धर्म व जाज्ज्वल्य देशप्रेम, वगैरेने न ’पेटता’ मी हे लिहीलं आहे. इतिहासाकडे फ़ॅसिस्टपणे, इमोशनल विचार करून न पहाता, फ़क्त ऑब्जेक्टिव्हली पहावे, हा तुमचा व्ह्यू मलाही पूर्णपणे पटला आहे, आणि तसंच करुनही मला वरील कॉमेण्ट लिहाविशी वाटली, हे मी नमूद करु इच्छितो.)

Abhijit Bathe said...

सर्किट ची कमेंट वाचुन रहावलं नाही म्हणुन ही कमेंट.

"मला पुस्तकांतून स‌ापडलेलं हे उघडं नागडं स‌त्य
ते आजचं स‌त्य आहे. कोण जाणे ते उद्या खोटंही ठरेल. पण म्हणून ते आजच नाकारण्यात काय हशील आहे?" असं म्हणुन सुरु केलेला ब्लॉग स्तुत्यच असणार यात शंका नाही. मी इथे वाचलेला हा पहिला आणि एकमेव लेख.

सर्वप्रथम काही स्पष्टिकरणं:
१) संदर्भ म्हणुन दिलेलं पुस्तक मी वाचलं नाहिये त्यामुळे त्यावर काही बोलणं उचित नाही.
२) झाशीच्या राणीबद्दल अभ्यासक्रमात जेवढं शिकवलं तेवढंच मला माहिती.
३) ते आणि ’बुंदेले हरबोलोंके मुंह सुनी हमने कहानी थी...’

तर कमेंट -

फक्त हा लेख वाचुन कमेंट लिहायची तर माझ्या ज्ञानात भर टाकणाऱ्या तीन गोष्टी.
१) लक्ष्मीबाईंचा जन्म - सुमारे १८३४.
२) लग्न - सुमारे १८४६
३) वैधव्य - सुमारे १८५३
४) मृत्यु - १८५८

कुठल्याही प्रकारे ’न पेटण्याचा’ प्रयत्न न करता -
झाशीचा इतिहास गेला तेल लावत. संस्थानांची मिंधेगिरी गेली मसणात. मला फक्त ही पोरगी दिसते जिचं बाराव्या वर्षी लग्न झालं, जे होऊन ती दुसरी बायको झाली, अजाणत्या वयात राणी झाली. (बाराव्या वर्षी मला एक फॉर्मल पत्र लिहिता यायचं नाही - तिला कदाचित प्रोटोकॉल म्हणुन तरी बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या असतील).
१९ व्या वर्षी ती विधवा झाली.
आज २९ व्या वर्षी मला माझ्या भाड्याच्या घरातुन कुणी निघुन जा म्हटलं तरी मी त्याची आई-माई काढीन, लक्ष्मीबाईने राणी बनल्यानंतरही हे कसं सहन केलं असेल याची कल्पना करवत नाही. तिने सुरुवातीला तनखा नाकारला होता असं मला या लेखातच कळलं - म्हणजे तिने स्वत:चा किल्ला सोडण्यात हा मुद्दा नसणार असं मला इतिहासतज्ञ नसुनही (किंवा म्हणुनच) वाटतं.
वय वर्ष १९ ते २३ या काळात तिने आक्रस्ताळेपणे युद्ध वगैरे न पुकारता, स्वत:च्या जनतेला राजकीय महत्वाकांक्षेचा आणि तदनुसार अपरिहार्य हिंसेचा बळी न बनवता मुरलेल्या मुत्सद्दीपणे इंग्रजांशी वाटाघाटी केल्या. अर्थात तिचे सल्लागार तिच्या बरोबर असणारच, पण नेता म्हणुन जबाबदारी तिचीच होती.
जेव्हा वाटाघाटींमधुन अन्याय दूर करता येत नाही हे दिसलं तेव्हा तत्कालीन राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन तिने अन्याय्य आणि परकीय सत्ता उलथवुन टाकण्याचा पराक्रमी प्रयत्न केला.
२३ वर्षाची ही मुलगी तत्वासाठी, स्वातंत्र्यासाठी, स्वत:च्या घराच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेते, ते वापरते आणि त्या तत्वासाठी रणांगणात स्वत:च्या जिवाची पर्वा करत नाही....आणि तिला "झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा त्या कालखंडातला व्यवहार पाहता हेच स्पष्ट होईल, की ही बाई शूर होती. पराक्रमी होती. पण आजच्य अर्थाने ती राष्ट्रभक्त नव्हती. तिला फक्त तिची सत्ता आणि तिचं संस्थान हवं होतं." ही कमेंट मिळते?

तिच्यावरच्या एका कवितेने, तिच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या कुठल्याही पुतळ्याकडे पाहुन जर ती माझं रक्त अजुनही तापवु शकत असेल - तर ती ’राष्ट्रभक्त नव्हे - राजकारणी’ कशी असु शकेल?

नरहर कुरुंदकर एक इतिहासकार आहेत. त्यांनी नक्कीच इतिहासाचं ’असं असं झालं’ असं विश्लेषण केलं असणार. वर म्हटल्याप्रमाणे मी हे पुस्तक वाचलं नाहिए - त्यामुळे त्यांनी ते कसं केलंय या विषयी मतप्रदर्शन अयोग्य.
पण त्यांनी शोधलेल्या फॅक्ट्सचा असा अविचारी वापर करुन ताळतंत्र नसलेली कन्क्ल्युजन्स काढणं आणि "माणूस म्हणून जगण्यासाठी... माणुसकी नावाचं स‌त्य जपण्यासाठी." - असं पोस्ट लिहिणाऱ्या महान लेखका -

लानत है!

Abhijit Bathe said...

माझी आधिची कमेंट ही माझी हे पोस्ट वाचल्यानंतर झालेली पहिली प्रतिक्रिया.
मी अजुन २ लेख वाचले आणि तुम्ही कुठलाही लेख लिहिण्यापुर्वी भरपुर अभ्यास आणि विचार करुन, पौराणिक, ऐतिहासिक संदर्भांना सद्य परिस्थितीचा संदर्भ देऊन उत्तम लेख लिहिताय.
मी दोनच लेख वाचलेत पण कधी एकदा आणखी लेख वाचतोय असं झालंय. पण असं असतानाही हा लेखातले गर्भित निष्कर्ष खटकले असंच म्हणीन मी. पण तरिही या लेखातली मतं कुरुंदकरांची कि तुमची हे कळलं नाही.
यावर थोडी चर्चा होऊ शकेल का?

Tulip said...

पोस्ट अभ्यासू आहे ह्यात वादच नाही. फक्त हा अभ्यासूपणा थोडा लेन स्टाईल झाल्यासारखा वाटतोय.
कोणत्याही प्रकारे भावनेच्या आहारी न जाताही नुसता तर्कानिष्ठित विचार केल्यावरही मला सर्किट आणि अभिजितची प्रतिक्रिया संपूर्णपणे पटते. कोवळ्या वयात अन्यायाविरुद्ध पेटून उठणे आणि शौर्याने संकटाचा सामना करणे हेच फक्त नाही तर उलट निट मुद्देसूद विचार करुन वाटाघाटींचेही तारतम्य भान आधी बाळगण्याचा सुजाणपणा थक्क करणारा आहे. राष्ट्रभक्तीशी त्याची सांगड न घालता सुरुवातीला केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी तिने असे केले हे सत्य वगैरे मानले तरी सर्किटने त्याच्या उदाहरणांमधून त्याचे केलेले विश्लेषण संपूर्णपणे पटते.

Anonymous said...

राणी आजच्या अर्थाने राष्ट्रभक्त नव्हती याच्या समर्थनार्थ असे म्हणता येईल की राष्ट्राची संकल्पना त्या काळी संदिग्ध होती. पण तिला फक्त तिची सत्ता आणि तिचं संस्थान हवं होतं असे म्हणणं oversimplification वाटतं.

. said...

मित्रांनो, पहिल्यांदा एक कबुली देतो, की मला खूप बरं वाटतंय. (म्हणजे अगदी अभिजीतरावांनी दिलेल्या शिव्या खाल्ल्यानंतरही!) बरं वाटतंय ते याचंच की हा स‌र्व उपद्व्याप करण्यामागचा माझा हेतू हाच होता, की एकतर इतिहासालाही दोन बाजू असतात हे ध्यानी यावं आणि त्यावर चर्चा व्हावी. वादे वादे जायते तत्वबोधः वगैरे हे अर्थात त्यात आलंच.

तर मुद्दा असा, की 1947नंतर एवढी वर्षं झाली. पण आपण अजूनही आपण आपल्या थोर इतिहासाकडे पाहायचे असले, की त्या किंवा त्याआधीच्या स‌ालांमध्ये जाऊन बसतो! गुलाम राष्ट्र पेटून उठावं म्हणून स‌ांगितला गेलेला इतिहास वेगळा असतो. त्या इतिहासकथनामागील प्रेरणा वेगळ्या असतात. त्याच प्रेरणा घेऊन आज इतिहास स‌ांगत बसणे हा काळावरच नव्हे तर इतिहासावरही अन्याय आहे!

दुसरी बाब म्हणजे कुरुंदकर गुरूजींनी झाशीच्या राणीबाबत कोठेही वाईट उद्गार काढलेले नाहीत वा तिच्या पराक्रमाबद्दल स‌ंशय घेतलेला नाही. (आता कुरुंदकरांबरोबर माझं नाव घेणं फारच हे दिसेल म्हणून त्याचा उल्लेख टाळतोय. पण मलाही या मर्दानी रानीबद्दल आदरच आहे.)

झाशीची राणी वा अन्य लोक यांचं बंड हे केवळ हिंदुस्थानच्या आझादीस‌ाठी चाललेलं होतं हे आकलन खरं नसून, या बंडामागे देशाची आझादी, धर्मस‌ंरक्षण, स‌ंस्थानाची मालकी येथपासून वेतनवाढ वा पलटणीत मिळणारी पक्षपाती वागणूक ते लूटमार येथपर्यंत अनेक हेतूंनी प्रेरीत झालेल्या शक्ती होत्या. कुरूंदकर गुरूजींना दाखवून द्यायचे आहे ते हेच.

आता यात झाशीच्या राणीला काहीही दोष देता येणार नाही. आम्हाला एकराष्ट्रत्त्वाची जाणीव व्हायलाच मुळी एकोणिसावे शतक उजाडावे लागलेले आहे. त्या शूर मुलीमध्ये ती जाणीव नव्हती म्हणून तिला नाव ठेवणे योग्य नाहीच.तसेच तिच्यामध्ये ती जाणीव होती असा आरोप करणे हेही तेवढेच अयोग्य आहे.

माझ्यावरचा एक आरोप मात्र मला मनःपूर्वक अमान्य. लिखाण वेगळ्याच लेनमधून चाललंय असं ट्युलिप यांनी म्हटलंय. कुणाची बदनामी करणं हा या ब्लॉगचा हेतू नाहीये. आणि माझ्या माहितीनुसार लेन यांनी शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्या स‌ंबंधाने जे लिहिले आहे, ते त्यांचे (पक्षी - लेन)मत नव्हते, तर त्यांनी यासंबंधांविषयी महाराष्ट्रातील विशिष्ट वर्गात काय बोलले जात आहे याची नोंद आपल्या ग्रंथात केली आहे.

असो. चर्चा, अगदी पेटून बिटून झालीच पाहिजे. स‌र्किटराव, अभिजीत, मृण्मय... दिलखुलास लिहिल्याबद्दल धन्यवाद!

Anonymous said...

Rani Lakshmibai was active in sending and receiving war messages to other princely states and planning the war. She was in touch with all sardars and rulers participating in it.

Laine has just recorded gossip about Shivaji Maharaj. Kurundkar has not written anything negative about Rani Lakshmibai. But using his reference, Visoba decides that Rani was not a rashtrabhakta but just interested in her sansthan and satta? And he calls it "Satyakatha"! After seeing comments exposing him, Visoba says he also respects the Rani. Visoba, you are worse than Laine.

I wonder what was in the comment above that you deleted.

The author's motive behind this blog is questionable. His mud-slinging reeks of a hidden agenda which is anti-nationalistic atleast.

Hemant said...

"1857च्या या बंडला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यात भाग घेणारे सर्वजण स्वातंत्र्ययोद्धे ठरले आहेत. खरं तर त्या बंडाकडे पाहण्याची ही दृष्टीच सदोष आहे."अस लिहिन म्हन्जे सावरकरानवर अरोप केल्या सारख झाल हो
शेवटी ईतिहास म्हणजे स्वार्थी धडपड हे राष्ट्र प्रेम वगेरे
थोथ्नाड आहे mob-mentality , Indivisual येतो तेन्व्हा मी मी मी माझा फायदा माझा विकास हाच इतिहास आहे. त्या बायीने स्वतःच्या स्वार्था साठी केलेली धडपड्च ईतिहास आहे आणि आम्हाला अभिमान आहे त्याचा


And those who are talking about nationalism are fanatics and thinks that Shivaji, Lakshibayi are not human beings but the Gods and they will not accept the truth.

What is wrong if some one want to protect her "Sansthan", it is like I am protecting my house, why the heck you are draging nonsense Nationalism inbetween

Anonymous said...

rani is great. just i m trying my coments on this blog. ek stri ladhvayee apaya prajesathi ladhate mhanje praja hich tiche rashtra mhanun blog karnaryani ti rashtrbhakta navhati ase manu naye.
mal ticha abhiman vato. jai maharashtra.

Anonymous said...

dukra kahi pan litos ka re

Anonymous said...

Lekh lihitana nidan tyabaddal tartamya balgun lihave ase maze mat aahe...

"Sansthan mukatyane khalsa kela..." he vakya manala na patnara aahe... ani kunalahi Virashree cha ase statement lihun apman karnyacha adhikar ajibat nahi...

sanstan khalsa tyani kuthlya paristhitit khalsa kela asel he pahahyla tumhi tithe nevtat...
tyamule krupaya ase statements baddal far vichar-vimarsh kiva vad na ghalta te kadhun taknya yavet..

Anonymous said...

विसोबा,
सुंदर ब्लॉग... आणि सुंदर comments! ;-)

विसोबा,
तुमची comment पण आवडली!
"वादे वादे जायते तत्वबोधः" :)

लेन वरून आठवलं..
त्यावरती पण लिहा कधीतरी...

umesh said...

झाशीच्या राणीला दम देऊन युढात उतरवल ..ते शिपायानी ..म्हणजे तिला बांदात सामील हो नाहीतर आहे ते पण राज्य जात ..असा निरोप दिला होता ..त्यामुळ तिने युढात सामील व्हायचा निर्णय घेतला

Unknown said...

नमस्कार मी श्री लोकरे .
झाशीची राणी ची अधिक माहिती मिळू शकेल का ?
माझा क्रमांक ९६९९८९४४५०

Unknown said...

अजून झाशीच्या राणीचा काही अपमान करायचा शिल्लक राहिल्यास तोही उरकून टाका .