"कृष्णावतार' बाजीराव!

छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याने जे राज्य स्थापन केलं ते बुडवलं धाकट्या बाजीरावाने. याच्याइतका विलासी, व्यभिचारी, बेजबाबदार आणि अकार्यक्षम राजा संपूर्ण मराठेशाहीत कधी झाला नव्हता.

कसा होता हा पेशवा? कशी होती त्याची दिनचर्या?

तो शनिवारवाड्यात कधी राहात नसे. कारण काय, तर काही लोकांनी त्याच्या मनात अशी भीती भरवली होती, की नारायणराव पेशव्याचं भूत वाड्यात फिरत असतं. त्यामुळे त्याने शनिवारवाडा वर्ज्य केला होता. त्याचा मुक्काम असायचा बुधवारवाडा, शुक्रवारवाडा आणि फूलशहर म्हणजे फूलगाव या ठिकाणी. शिवाय कोथरूडचा वाडा आणि पर्वती अशी ठिकाणंही होतीच. तो ज्या वाड्यात असायचा तिथं दोन-तिनशे वायका नित्य न्हावयास येत असत. हा न्हाण्याचा समारंभ सकाळी सुरू व्हायचा तो दुपारपर्यंत चालायचा. नंतर जेवणाची तयारी झाली, की मनात येईल त्या वाड्यात तो जायचा. त्याच्या पंक्तिभोजनाच्यावेळी या बायका सतत त्याच्याजवळ बसलेल्या असायच्या.

बाजीराव पेशवा बायकांचा इतका शौकिन की त्यासाठी तो त्याच्या आश्रितांची चार-चार, पाच-पाच लग्नं लावून द्यायचा. म्हणजे या आश्रितांनी आपली एक बायको घरी ठेवून बाकीच्या सरकार वाड्यावर पाठवायच्या. अन्याबा राहतेकर हे असेच त्याच्या एका आश्रिताचं नाव. पुन्हा जो गृहस्थ वाड्यावर बायतो पाठवणार नाही त्याच्यावर श्रीमंतांची इतराजी व्हायची. त्यामुळे अब्रुदार लोकांनी वाड्यात जाण्याचं सोडलं. काहींनी तर पुणंही सोडलं.

बयाबाई दातार, सीता शेंडे, काशी दीक्षित, उमा फडके, ताई पेठे अशा सुमारे दोन-चारशे उनाड बायकांचा थवा वाड्यात असायचा. या बायकांशी शिष्ये, पाणके यांचाही व्यभिचार चाले.

या पेशव्याचं जेवण, शृंगार वगैरे झाला की मग हे पर्वतीस वगैरे देवदर्शनास जायचे. तिथं शास्त्री, पंडित आणि भट यांची कचेरी व्हायची. तिथं काय चालायचं, तर कुणी म्हणायचं, की बाजी हा कृष्णावतार आहे! कुणी म्हणायचं, हा शिवाचा अवतार प्रकटला आहे. या अशा दिनचर्येत राज्यकारभाराला वेळ तो काय मिळणार? फार काय, पण साधी दौत आणि लेखणीही वाड्यात उपलब्ध होत नसे. मग बाकीची तर गोष्टच नको. याचा सर्व कारभार बायकांच्या हातून चाले.

या पेशव्याचा खर्चही मोठा असे. त्यत भोजनावळीचा खर्च सर्वात जास्त. पुन्हा ब्राह्मणांना संतुष्ट करण्यासाठी मोठाली दाने दिली जात. त्यामुळे मग फौजफाटा, पागा, हुजुरात, सरदार, मुत्सद्दी यांना पैसा कोठून मिळणार? हा पेशवा सर्व सरदारांचाही व्देष करीत असे.

असं सगळं असल्यावर राज्य जायला किती वेळ लागणार? 1818 मध्ये ते गेलंही.

संदर्भ -
निवडक लोकहितवादी - संपादक - फडकुले-नसिराबादकर, फडके बुकसेलर्स, 1989, पा. 144.

13 comments:

Anonymous said...

jyaanchyaa kaalaat maraathyanchi senaa atakepaar zende pohochavat hoti tyaa itar peshawayanbaddal aapale kaay mat aahe???sadashivrav bhaau,chimaji appa,thorale baajiraav yaanbaddal kaay mhanane aahe???

Damitr Mazanov said...

मोहन मालगावकर यांनी लिहलेले The Devil's Wind [वादळ वारा - मराठी अनुवाद ]या पुस््तकात दुसर््या बाजीरावांचे बिठुर मधील वास््तवाचे काल््पनीक कथन अाहे. या मध््ये नानासाहेब पेशव््यांची गोष््ट सांगितलेली अाहे. या कथना मध््ये तेव््हाच््या कालखंडाचे आणी सामाजिक परीस््थीचे चागंले वर््णन अाहे.

तुमचा ब््लॉग अतिशय माहितिपुर््ण व विस््तारीत आहे.
माझ््या शुभेच््छा

agasheac said...

sadashivrav bhaau,chimaji appa,thorale baajiraav yanchya jivanavarahi drushtishep takava

ManDoba said...

या बाबतीत मी न स इनामदार यांचे मंत्र वेगळा हे पुस्तक वाचायला सांगीन.कादंबरी आहे किती ऐतिहासिक आहे माहिती नाही पण जरूर वाचा,नाना साहेब (दुसरा)यांचे कार्य महत्वाचे आहे,बाजीराव कुठल्या परीस्थिती मधून पेशवा झाला होता???त्याने नाना फडन्विसाला का .............????
आता जर का पेश्व्यानेच राज्य घालवले तर बाकी संस्थानिक काय माशा मारत होते का?दौलत राव शिंदे यांनी किती युद्धे केली ?पळपुटा कोण जो युद्धातून पळतो तोच न???आमचे हे सरदार युद्धातच नाही उतरले...आणि महाराजांनी पेशवाई काढून घेतली त्या नंतर पेशवा ब्रम्हवर्ते ला गेला (अटक होऊन).युद्ध झालीच नाहीत आणि राज्य बुडले असे वाटत असेल न तर तसे नाही ,मराठे (महाराष्ट्रातील लोक!!!!!!! :( )शेवट पर्यंत लढले होते.या पोस्त्शी मी सहमत नाही .

bajirao peshwa yanchya baddal apprasar karu naka peshwaichya kalat satta atakepar geli.chimaji appa, vishwas rao,mele pan wakle nahi.vinakaran dwesh karu naka

milind said...

मस्त!!!!!!!!!!!!!!! साहेब तुम्ही दुसर्या बाजीराव पेशव्याचा कहर चेहरा ... नि त्याची नातीक्ता पुढे आणली ... तुम्हे अभिनानादन करावे तितके थोडे आहे ...

Anonymous said...

दुसरा बाजीराव हे प्रकरण वेगळे होते ..अत्यंत संशयी, व्यभिचारी असलेल्या ह्या पेशव्याचे चरित्र फारसे पुढे आले नाही किंवा येऊ दिले गेले नाही. हा बाजीराव कसा चांगला होता ह्यावर पुस्तके लिहिण्यात आली ( ना स इनामदार), तो परिस्थितीचा कसा बळी होता असेच ह्या पुस्तकातून बिंबवण्यात आले. तसे पाहायला गेले तर ह्या बाजीराव चा काळ फार दूर नाही .. संभाजी विषयी खरे खोटे संदर्भ उपलब्द् होतात पण बाजीराव विषयी मिळत नाहीत ..हि वस्तुस्थिती आहे

Unknown said...

पेशवाईत चांद्रसेनिय कायस्थ प्रभू लोकांचा नाश करण्यात आला .त्यांचेकडून पेशव्यानी ५४ कलमे लिहून घेतली त्यात मी फक्त शुद्रांचेच देव पुजीन वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. सरदेसाईंच्या मराठी रियासत या पुस्तकात याची माहिती आहे पण याबद्दल कोणी पूर्ण माहिती देवू शकेल काय?

Jawaharlal Salunkhe said...

Chandrashekhar Koravi said...

pls provide each n every evidence for what u have stated : 1) rango bapuji guptyannich britishanchi madat ghetlyache itihasat dakhle aahet n pudhe duff ne fasavlyavar yanche dole ughadle. tya veles bajirao peshweekte ladhat hote. 2) peshwyanni ckpnvar atyachar kele yala kay purave ahet ? 3) nanasaheb peshwyanni 2nd marriege kela te panipatvar paisa hava mhanun savkarachya mulishi kela he mahit nastana ugach naste aarop karu naye. ektar ya saglyache jahir purave dya nahitar asli binbidachi statements karu naka