एक छोटीशी दंतकथा

छत्रपती संभाजी राजांबद्दल एक कथा सांगितली जाते.
औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे संभाजीराजांची हत्या केली. मात्र तत्पूर्वी त्याने त्यांना, तू मुसलमान होतोस का, असं विचारलं होतं. त्यावर संभाजीराजांनी मोठ्या बाणेदारपणे त्याला उत्तर दिलं, ""तुझी जुलपुकार बेगम ही मुलगी मला देतोस, तर मी धर्मांतराला तयार होतो!''

ही जी कहाणी आहे ती मोठ्या अभिमानाने, संभाजीराजांची धर्मनिष्ठा अधोरेखीत करण्यासाठी सांगितली जाते. बखरकारांनी अगदी रंगवून रंगवून ही कथा सांगितली आहे. पण ही गोष्ट मुळातूनच खोटी आहे. कोणाही समकालिन लेखकाने या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. साकी मुस्तईद खानाने "मआसिरे आलमगिरी'त अथवा भीमसेन सक्‍सेनाने त्याच्या "तारीख-ए-दिलकुशा' या ग्रंथात अशा भाकडकथांचा उल्लेख केलेला नाही.

संभाजीचा जन्म 14 मे 1657चा. मृत्यु 11 मार्च 1689चा. मृत्युसमयी त्याचं वय 32 होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या पाचांपैकी दोन मुली लग्नाच्या होत्या. त्यातील जेबुन्नीसा ही संभाजीपेक्षा 19 वर्षांनी मोठी होती आमि जिबतुन्नीसा ही 14 वर्षांनी मोठी होती.

सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे औरंगजेबाला जुलपुकार नावाची मुलगीच नव्हती! मुळात हे नाव पुरूषाचं आहे!!

(इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998.)

13 comments:

Abhijit Bathe said...

"त्यावर संभाजीराजांनी मोठ्या बाणेदारपणे त्याला उत्तर दिलं, ""तुझी जुलपुकार बेगम ही मुलगी मला देतोस, तर मी धर्मांतराला तयार होतो!''

ही जी कहाणी आहे ती मोठ्या अभिमानाने, संभाजीराजांची धर्मनिष्ठा अधोरेखीत करण्यासाठी सांगितली जाते."

तिच्यायला - असल्या कहाण्या कोण कुणाला सांगतं? मी तरी ही गोष्ट कधी ऐकलेली नाही. जो है नहीं वो कभी था ही नही ये प्रुव्ह करके भाय मेरे are you trying to get a life?

Anonymous said...

मायला, त्या निनाद बेडेकर नावाच्या थोर आणि प्रप्तिष्ठित इतिहाससंशोधकांनी जर ही कहाणी आयकली आसल, तर अभिजीतकुमार तुमी आनी मी कायबी बोलून काय व्हनार?
- राजेन्द्र जगताप

Anonymous said...

Jagtap,

Tumhi Sambhaji Brigade Wale ka?
Te tumachya KIMAN buddhimatte varun kalalech.
For You Kind Info - I am 96 kuli Maratha.
-
R. Deshmukh

Pranav Jawale said...

lol

Anonymous said...

band kar tuzha brigedi blog

sachin patil said...

nice

sanjay kshirsagar said...

कमाल आहे ! इतकी प्रसिद्ध गोष्ट या लोकांना माहिती नाही ?
सभाजीवर लिहिलेल्या प्रत्येक चरित्रात हि कथा भाकड कथा किंवा अभिमानाची गोष्ट म्हणून वापरण्याचा मोह आजवर कोणत्याही लेखकाला टाळता आलेला नाही. किंबहूना, बखरकारांनी संभाजीचा बेडरपणा दाखविण्यासाठी या कथेचा उपयोग केलेला आहे. वास्तविक त्यांच्या राजाच्या शूर आणि धाडसी स्वभावाच्या अनेक सत्यघटना माहिती असताना देखील निव्वळ कपोलकल्पित घटनेला इतकं महत्त्व यावं हे सांभाजीच मोठ दुदैव म्हणायचं !

VIkas Godage said...

९६ कुली मराठा,
तू किती जरी ९६ कुल्यांचा डंका पितावला तरी आहेस तू शूद्राच, विचार तुझ्या कोणत्या पण ब्राह्मण डोस्क्याला तो सांगेन तुला.............

कारण मी पण मराठा आहे पण मला त्याचा अजिबात अभिमान नाही....कारण जात हि तुमच्या सारख्या लोकावर लादून तुम्हाला ब्राह्मण धर्माचे गुलाम केले आहे हेच तुम्हाला कळलेले नाही आजून..........आणि जो पर्यंत गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव होत नाही तो पर्यंत त्याला गुलामीत आनंदच वाटत असतो....

Anonymous said...

hello revolution
ya jagat ekch jat aahe te maenje manoos jat tumchya saarkhya lokani jatiywad aaplaych loka madhe swin flu saar kha pasravla aahe shivaji aani sambhaji rajanchey nav ghenachi
tumchi lieki sudha nahi.

VIkas Godage said...

अन्नोंय्मुस मित्र......मी जे बोललो तेच तू बोलत आहेस तुला समजत आहे पण समजून घ्यायचे नाही , कारण मी अगोदरच म्हणालो मी कोणत्या जातीचा आहे मला त्याचा अभिमान नाही कारण मी ती मनातच नाही...उलट ज्या धर्माने जाती व्यवस्था निर्माण केली तो धर्म किती बेगडी आहे ते ह्या जगाला पटवून द्यायचे काम आम्ही करत आहोत....हा धर्म काय जगातले सगळेच धर्म हे बेगडी आहेत व धर्म हि संकल्पानआच मुली माणसाला गुलाम करण्यासाठी तयार केली आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. माणूस हा धर्म असेल आपण सगळी माणसे कशी काय वेगळी?

Shivraj Harale said...

Revolution........
u r right...
i m totally agree with you!!!

Unknown said...

नाकातून प्राणवायु घेताना हवा हे नाही विचारात कि तुझी जात कोणती?
पाणी पिताना थेंब हे नाही विचारात कि तु कोणत्या जातीचा?
जमिनीवर चालताना जमीन हे विचारात नाही कि तुझे हे पाय ब्राम्हण आहेत कि शुद्र ?
आईच्या पोटातले रक्त जातीभेद नाही शिकवत….
ज्यांनी जी कामे स्वीकारली त्या प्रमाणे जाती ठरल्या…. आणी आजच्या काळात
ह्यावरती भांडुन नक्की सिद्ध काय करणार आहात? ब्राम्हण म्हणुन कोणी तुम्हाला
राष्ट्रपती पदक नाही देणार… क्षत्रीय म्हणुन कोणी बक्षीस नाही देणार … शुद्र असले म्हणुन कोणी पद्मभूषण नाही देणार … स्वतःच्या कर्तुत्वावर जगा….
वैभव पाटील

Anonymous said...


kay hai koni kayhi apli mat madtat ,aho je satya aahe te ranga va na,uach lokana phasvatat.