राम कोण देशीचा? - भाग ३.

रामकथा ही मूळची `रामेसुकथा' आहे असं मत मल्लादि वेंकट रत्नम (आणि अर्थातच भास्करराव जाधव ) यांनी व्यक्त केले आहे. तर हा जो रामेसु आहे तो ख्रिस्तपूर्व तेराव्या शतकात, म्हणजे सुमारे स‌व्वा तीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये होऊन गेला. याचा कालखंड १२९२ ते १३२५. त्याच्या आधी इजिप्तमध्ये अठरा वंशांचे राजे होऊन गेले. हा एकोणिसाव्या वंशाचा, पहिल्या वंशाचा राजा जो मेना त्याचा काळ ख्रिस्त्पुर्व ५५००.या मेना राजाने नाईल नदीला जोडणारे एक मोठे स‌रोवर खोदले. हे स‌रोवर आणि नाईल नदीचा भाग यांच्या मधोमध एक शहर होते. त्याचे नाव मेंफिस. भास्करराव सांगतात, की याचे ग्रीक भाषांतर अजोदा असे होते. त्यावरून - अजोदा-अजोध्या-अयोध्या असे झाले. रामायणानुसार अयोध्या नगरी मनूने वसविली. मेंफिस मेनाने वसविले आणि मेनाचे रूपांतर मनू असे करणे साहजिक आहे. जसे रामेसुचे राम करणे स‌ोपे आहे.

रामायणात अयोध्येचे जे वर्णन आले आहे ते फारच अतिशयोक्त आहे. दशरथाचे राज्य फारच लहान होते. अशा छोट्या राज्याची राजधानी अयोध्येसारखी मोठी नगरी असणे शक्य नाही. या उलट मेंफिस हे मोठे शहर असल्याचे ग्रीक व अरब इतिहासकारांनी िलहून ठेवलेले आहे. अयोध्येत उंटांची, गाढवांची गर्दी होती, असे वर्णन रामायणात येते. हे वर्णन हिंदुस्थानातील शहरांस लागू होणारे नाही. पण इजिप्तमधील अजदोंला ते बरोबर लागू पड़ते.

इजिप्त हा नदीमातृक देश. नाईल वा नील ही मोठी नदी वगळता बकिचा देश स‌पाट वालुकामय, मधेमधे थोडे डोंगर असा. रामायणातील वर्णन अशाच प्रकारचे आहे. रामाला कोठेही मोठे डोंगर चढावे लागत नाहीत. रामाने विंध्य पवर्त पार केल्याचाही उल्लेख रामायणात येत नाही.

अयोध्या स‌रयू नदीवर वस‌ली होती व ती मानस स‌रोवरातून उगम पावली असे रामयणात म्हटले आहे. वास्तविक मानस स‌रोवरातून तीन नद्या उगम पावल्या आहेत. ब्रह्मपुत्रा, स‌तलज व सिंधु . अयोध्या या तीन्हींपैकी कोणत्याही नदीतीरी नाही. आजची अयोध्या गोग्रा नदीवर दाखविली जाते. हीच पूर्वीची स‌रयू म्हणावी, तर हिचा उगमही मानस स‌रोवरातून होत नाही. पण रामायणात अयोध्येविषयीचे जे वर्णन आहे ते अजादोंला बरोबर लागू होते. मेनाने नाईल नदीला जोडणारे मोठे स‌रोवर खोदल्याचे उल्लेख आहेत. या स‌रोवरात नाईल नदीच्या वरच्या भागातूनच पाणी घेतले जात असे. यावर अजादो वसले असल्याने मानससरोवरातून उगम पावलेली नदी असे वर्णन करता येते .

रामायणता श्रृंगबेरपूर असे ठिकाण येते. तेथील राजा गृह हा निषादांचा अधिपती होता. निषाद ही चोरीमारी, लुटमार करणारी जमात होती. इजिप्तमध्ये सेरेन -कबिर असे गाव होते. तेथे तेल-एल-कबिर नावाचा डोंगर आहे. तर हे कबिरी लोकही लुटमार करणारेच होते.

रामायणात चित्रकूट नावाचा पर्वत येतो. आज प्रयागपासून ७५ मैंलांवर एक स‌ाधारणशी टेकडी दाखवितात व हा रामाचा चित्रकूट म्हणतात. वास्तविक रामायणात हे अंतप 20-२५ मैलच असल्याचे सांगितले आहे. चित्रकूटमध्ये दोन पदे येतात. चित्र आणि कूट. चित्र म्हणजे चित्रविचित्र रंगाचा, चकचकीत आणि कूट म्हणजे ढीग किंवा शिखर. चित्रकूट पर्वत म्हणजे `चित्रं कूटं यस्य स‌ः', म्हणजे ज्याचे शिखर चित्रविचित्र किंवा चकचकीत आहे तो पर्वत. पण असा पर्वत किंवा डोंगरसुद्धा प्रयागजवळ नाही. इजिप्तमधील मेंफिस किंवा अजादोंजवळ नदीपलीकडील तीरावर स‌गमर्मराच्या खाणी आहेत. त्या उन्हात फार चकचकीत दिसतात. याला तुरा म्हणतात. यालाच स‌मांतर असा उत्तरेकडे दो शिरी म्हणजे रक्तपर्वत आहे. यालाही चित्रं कूटं यस्य स‌ः - चित्रकूट म्हणता येईल. असे चित्रकूट इजिप्तमध्ये अनेक आहेत. एकंदर हा पर्वत रामायणात आला तो इजिप्तमधूनच.

अयोध्येजवळ नंदिग्राम असल्याचा उल्लेख रामायणात येतो. पण अयोध्येजवळ नंदीचे देऊळ असल्याचा दाखला मिळत नाही. इजिप्तच्या प्राचीन इतिहासात या नंदिग्रामचा उलगडा होतो. इजिप्त अर्थात मिसर देशी ऑसिरिस नावाचा देव होता. आपला शंकर आणि ऑसिरिस‌ स‌ारखे वा एकच. या देवाला बैल स‌ोडलेले असत. त्यांना ऑसिरिसचेच अवतार मानत. हे नंदी त्यांच्याकरीता बांधलेल्या खास देवळात ठेवित. नंदी मेले की त्यांच्या ममी करून त्या एका भुयारात ठेवल्या जात. स्राबो नावाच्या ग्रीक इतिहासकाराने या देवळाचे वर्णन करून ठेवले आहे. त्यानुसार मॉरिएट या स‌ंशोधकाने शोध केला असता, 1850 मध्ये हे एपिसचे (नंदीचे) देऊळ व नंदींची ममी ठेवण्याची जागा सापडली. ही जागा मेंफिसजवळच्या स‌क्कारा या गावी होती. तेथे जमिनीखाली खडकात लेणी कोरून बैलांच्या ममी ठेवीत. रामायणातील नंदीग्राम म्हणजे हे स‌क्कारा गाव असावे. दुसरी एक विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे एपिस व बसव हे शब्द एकच आहेत. बसव हा द्रविडी भाषेत नंदीचा वाचक आहे. यानुसार चित्रकूट आणि नंदिग्राम ही दोन्हीही आर्यावर्तातील नव्हे, तर इजिप्तमधील असावीत असा पुरावा सापडतो.

रामायणातील लंकेबाबतही असाच गोंधळ आहे. रावणाची राजधानी लंका म्हणजे स‌िंहलद्विप (आजची श्रीलंका) मानली जाते. परंतु रामायणात दिलेले लंकेचे वर्णन स‌िंहलद्विपाशी मुळीच जुळत नाही. रामेश्वरापासून ते शंभर योजने दूर नाही. ते मोठ्या उंच डोंगरावर वस‌लेले नाही. आर्य लोकांना माहित असलेल्या लंका बेटाचा उल्लेख ज्योतिषशास्रात येतो. हे शहर विषुववृत्तावर अवंतीच्या थेट दक्षिणेस होते. पहिला अक्षांश या दोन स्थळांतून जात असे. श्रीलंका विषुववृत्तावर नाही आणि अवंतीच्या दक्षिणेस नाही. तेव्हा लंका याचा अर्थ कोणतेही बेट असा घ्यावा लागेल.

राम वनवासाला निघाला त्यावेळी भरत त्याच्या आजोळी केकय देशात होता. हा देश नेमका कोणता ? भरताला बोलावण्यासाठी जे दूत पाठविले ते बाल्हिक देशातून गेले असे वर्णन आहे. हे आजचे बाल्ख शहर असावे असा अंदाज करता येतो. केकय देशाचा राजा व भरताचा आजा याचे नाव अश्वपती. या नावालाही मोठा अर्थ आहे. अयोध्याकाण्डातील सर्ग 70, श्लोक 19 त 23 नुसार अश्वपतीने भरताला जी देणगी दिली, त्यात उत्तम चित्रविचित्र कंबले, वाघासारखे बळ अस‌लेले कुत्रे आणि स‌ोळाशे घोडे होते. शिवाय त्यात उत्कृष्ट रीतीचे सामानसुमान घातलेले शिघ्रगामी खर असे धनही होते. खर म्हणजे गाढव. त्याला धन म्हटलेले आहे. म्हणजे ते केकेय देशातील प्रतिष्ठेचे वाहन होते, हे स्पष्ट होते. यावरून हा केकय देश आर्यावर्तातील नसून, हिंदुकुश पर्वताच्या पलीकडील असावा. इतकेच नव्हे, तर आजचा अफगाणिस्तान आणि इराण हा देशही पूर्वी आर्यांचाच असल्याने तो त्याही पलीकडील (?) असावा. तेथून सात दिवसांत भरत अयोध्येस परतला ही गोष्ट स‌ंभवनीय मानायची असल्यास अयोध्या आज दाखवितात ती नस‌ून तिकडेच कोठेतरी - मेंफिस येथे असावी.

भास्करराव जाधव यांनी आपल्या लेखांमध्ये अधिक स‌विस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी ती मूळातूनच वाचावी. ही स‌र्व माहिती देऊन भास्करराव म्हणतात, ``एकंदरीत रामायणात जी गावे हिंदुस्थानात अमुक ठिकाणी होती असे ठाम स‌ांगता येत नाही, त्याच गावांचा पत्ता इजिप्तच्या भूमीत बरोबर लागतो. यावरून रामायणकथा आर्यावर्तात मुळीच घडली नसून ती इजिप्तात घडली असे मल्लादि वेंकट रत्नम म्हणतात हेच खरे दिस‌ते."

मात्र भास्कररावांनी केवळ रामायणातील भूगोलच तपासून हे मत व्यक्त केलेले नाही. त्यांनी रामायणात वर्णन केलेल्या चाली, प्रथा, रूढी, रामाचे व रामायणातील अन्य पात्रांचे आचरण यांचाही अभ्यास केला असून, त्यावरून राम हा आर्यावर्तातील नव्हे, असे स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानात आल्यानंतरची आर्यांची स‌ंस्कृती आणि तत्पूर्वीची त्यांची स‌ंस्कृती यात भेद होता. तो रामायणात दिसतो असे ते सांगतात. याचे काही दाखले येथे पाहू या.

ते सांगतात, "अग्नीत आहुती देण्याच्या तुपातील अवशिष्ट तूप पिण्याची रूढी आर्यांत नाही. ते तूप मागाहून होमात घालावे लागते. रामायणात सांगितलेली चाल (शेष राहिलेले आज्य प्राशन करणे - अयोध्याकाण्ड, स‌र्ग 6, श्लो. 1 ते 4) परदेशाची आहे. कोणत्याही यज्ञ वगैरे विशेष कृत्यांत तुपाचे हवन सांगितले आहे. पण अवशिष्ट तूप यजमानाने प्राशन करणे हा विधी आम्हांस तरी कोठे आढळलेला नाही. फक्त वाजपेययज्ञात यजमानावर हुतशेष आज्याने विधिपूर्वक अभिषेक करण्यात येतो असे सांगितले आहे... पुराणात इजिप्तात होम हा पशूच्या मांसाचा आणि वनस्पतीचा करीत. त्याबरोबर मद्यही थोडे ओतीत व धूप जाळीत. यज्ञात मद्याचा उपयोग आमच्याकडील सोमरसा सारखाच देवाच्या नावाने थोडे अग्नीत टाकावयाचे व बाकीचे ऋत्विजांनी पिऊन टाकावयाचे, असा प्रघात होता. रामायण ग्रंथ बुद्धोत्तर कालात तयार झाला. बुद्धाच्या शिकवणीने यज्ञातील हिंसा व स‌ोमासारखे उन्मत्त करणारे म्हणजे अंगावर येणारे पेय नाहीसे झाले. मद्यसेवनही बंद झाले. मग त्याचा नैवेद्य स‌ोडणे व अवशिष्ट पिणे ही चाल इकडेच नव्हतीच. यामुळे तिकडील काव्याचे रूपांतर करताना मद्याच्या बदला तूप हवन केले गेले असे वर्णन करावे लागले व त्याबरोबर अवशिष्ट तूप पिण्याचा प्रसंग रामावर आला."

स‌र्वांत विचित्र चाल पाहावयास मिळते ती अयोध्याकाण्डात. (सर्ग 66) त्यातील हे श्लोक पाहा -
तैलद्रोणअयां तदामात्याः स‌ंवेश्य जगतीपतिम्
राज्ञः स‌र्वाण्यथादिष्टाः चक्रूः कर्माण्यनन्तरम् ।।14।।
न तु स‌ कालनं राज्ञो विना पुत्रेण मंत्रिणः
स‌र्वज्ञाः कर्तुंनीषुस्ते ततो रक्षति भूमिपम् ।।15।।

याचा अर्थ असा - तदनंतर तेलाने भरलेल्या एका कढईमध्ये अमात्यांनी त्या भूपतीला निजविले आणि वसिष्ठादिकांची आज्ञा झाल्यावर राजाच्या स‌र्व पुढल्या कर्माची व्यवस्था ते करू लागले. (14). त्या स‌र्वज्ञ मंत्र्यांना पुत्रांवाचून राजाचे प्रेत नेणे योग्य न वाटल्यामुळे ते भूपतीला तेलाच्या कढईत ठेवून रक्षण करीत बसले. (15).

पुत्र जवळ नाही म्हणून प्रेतरक्षण करून 12-13 दिवस ठेवणे हा आर्यांचा स‌ंप्रदाय नाही... पण राम व रामायण ही दोन्हीही अनार्य स‌ं‌स्कृतीची व त्यांच्या देशात प्रेताची ममी करण्याचा स‌ंप्रदाय होता. यावरून दशरथ व त्याचे पुत्र इजिप्शियन स‌ंस्कृतीचे होते असे अनुमान निघते.

10 comments:

Yogesh said...

jhakaas visoba. maanala. :)

faarach surekh.

yeu dya ajun

केदार जोशी said...

माहीती चांगली आहे. ती आपण लिहुन काढता याबद्दल धन्यवाद. मला काही प्रश्न आहेत. भास्करराव जाधवांचे मत त्यावर वाचायला आवडेल.
१. हनुमान "त्या" रामायनात होता का? कसा?
२. त्यातील रावण कोण?
३. सितेला त्यातही अग्नीपरीक्षा द्यावी लागली का?
४. अश्वमेधाचे वर्णन लागु पडते का?
५. विष्णू अवतार म्हणुन रामाला मान्यता आहे. तिकडेही तसे काही होते का? की आपल्या लोकांनी उगीच अशी मान्यता दिली.

तात्पुरते ईतकेच. मी ही ते पुस्तक घेउन वाचेन पण अमेरिकानामक देशात ते लवकर उपलब्ध होईल की नाही सांगता येत नाही. माहीती बद्द्ल परत एकदा धन्यवाद.

Unknown said...

Dear friend, good posting, hope i will get more literature from ur blog.

once again Thanks for sharing the literature

Anonymous said...

khalil batami vacha ani hasa...

भारतीयांशी रामाचे रक्ताचे नाते - अडवानी
नवी दिल्ली - भारतातील नागरिकांचे आणि रामाचे रक्ताचे नाते आहे, पण सध्याचे केंद्रातील सरकार हे समजू शकत नाही, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवानी यांनी "यूपीए' सरकारविरुद्ध पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप सेतुसमुद्रमचा मुद्दा लावून धरणार असल्याचे श्री. अडवानी यांच्या टीकेवरून स्पष्ट झाले आहे.

भारतात रामाचे अस्तित्व होते, याचा कोणताही पुरावा नसल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षी सप्टेबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावरून सरकारवर मोठी टीका झाली. तोच धागा पकडत श्री. अडवानी यांनी सरकारला पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतात रामाचे अस्तित्व नव्हते, असे सरकार म्हणूच कसे शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतर कोणत्याही देशात असे घडले नसते, हे फक्त भारतातच घडू शकते, असे सांगत भाजप जातीयवादी पक्ष नसल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. हिंदूत्व ही केवळ छोटीशी संकल्पना नसून, जीवन जगण्याची ती एक पद्धत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
http://www.esakal.com/esakal/esakal/rightframe.html

Waman Parulekar said...

best of luck for next posting

Anonymous said...

BHASKAR JADHAV TU ADHI HE SANG TU KON AHE ANI NANTAR KOTHE BOLAYALA SURUWAT KAR .ETHE KHOTHE CHALAT NAHI .AMCHYA DHARMACHA DWESH KARUN AMCHA DEV,DHARAM ,SANSKRUTI MEETWAYACHA DAW AJUN KUNACHACH YESHSWI ZALA NAHI.ATAPARYAT ASE KITI AIREGAIRE ALE ANI GELE.

GD said...

Ramayanat lihilay ki ravan vimanane aala hota.... aani aata hi link bagh... egypt madhye aeroplane model sapadale hote.... dated 200BCE...

http://www.world-mysteries.com/sar_7.htm

Krish said...

पुत्र जवळ नाही म्हणून प्रेतरक्षण करून 12-13 दिवस ठेवणे हा आर्यांचा स‌ंप्रदाय नाही...
[b]
So you agree that they waiting for sons to come and they burned it :D
this both things were not in egypt ,
today also they wait for relatives to come and Son only burns the dead body of father. do people keep there heads somewhere else when they make and promote some illogical things ? funny some people are actually appreciating such illogical crap :\

Shirish said...

tumhi ji mahiti dili aahe tyat krupya हनुमान & रावण yanchi mahiti purva ...

Anonymous said...

kontyahi thos puravya shivay phaltu afava pasarau naka...tumhi ramayanatil sthalanchi ijipt deshatil sthalanshi tulana kartay tya aivaji bharatatil sthalanshi tulana ka karu shakat nahi? tumchya ekandarit lekhana varun tumchya manat ajibat deshprem tar disun yet nahich parantu ijipt desha baddal vilakshan prem disun yete.. naitik drushtya tumhala bharat deshat rahanyacha kontahi hakka naahi...SAAGAR